Vinayak Chaturthi Marathi Wishes : 'विनायक चतुर्थी'च्या मराठमोळ्या शुभेच्छा

Happy Vinayak Chaturthi 2022 share marathi wishes on Facebook, Instagram, WhatsApp, Twitter and other Social Media platform : भक्तांच्या आयुष्यात येणारे विघ्न बाप्पा दूर करतात. विनायक चतुर्थीनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा द्या.

Vinayak Chaturthi
विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • 'विनायक चतुर्थी'च्या मराठमोळ्या शुभेच्छा
  • चतुर्थी तिथी गणपतीला प्रिय
  • विनायक चतुर्थीला गणपतीची पूजा करावी

Happy Vinayak Chaturthi 2022 share marathi wishes on Facebook, Instagram, WhatsApp, Twitter and other Social Media platform : प्रत्येक महिन्याच्या अमावस्येनंतर येणार्‍या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात. यंदा सोमवार 26 डिसेंबर 2022 रोजी यंदाच्या वर्षातली शेवटची विनायक चतुर्थी आहे. ही पौष महिन्यातील विनायक चतुर्थी आहे. विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा केली तर गणपती प्रसन्न होतो अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे. 

चतुर्थी तिथी गणपतीला फार प्रिय आहे. विनायक चतुर्थीला गणपतीच्या सिद्धिविनायक रुपाची पूजा केल्यस बुद्धी, सिद्धी, ज्ञान आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. कुटुंबात आनंद निर्माण होतो. कुठलेही काम करताना गणपतीचे स्मरण केले जाते. आपल्या भक्तांच्या आयुष्यात येणारे विघ्न बाप्पा दूर करतात. विनायक चतुर्थीनिमित्त आपल्या मित्र मैत्रिणींना आणि नातेवाईकांना मराठीतून शुभेच्छा द्या.

धर्म-कर्म-भविष्य । आध्यात्म । भविष्यात काय

Daan Tips: या वस्तूंचे चुकूनही नका करू दान, नाहीतर होतील वाईट परिणाम

Name Astrology : 'या' नावांच्या मुलांचा मेंदू कॉम्प्युटरपेक्षा वेगाने काम करतो

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा..
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा..

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला..
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी..!
सर्व गणेश भक्तानां

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

भालचंद्रा, कृपाळा तू लंबोदरा,
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा

विनायक चतुर्थीच्या शुभेच्छा

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी