ऐकलं का! महिला पत्रकार काय म्हणते, शाकाहारामुळे सुधारलं लैंगिक जीवन

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jan 23, 2022 | 18:18 IST

सध्या लोकांमध्ये शाकाहाराविषयी जागरूकता वाढत आहे. (Vegetarian Diet) शाकाहाराच्या फायद्यांबाबत जगभरात अनेक ठिकाणी संशोधन (Research) देखील केली जात आहेत. अनेक अभ्यासकांनी शाकाहाराचे फायदे पटवून दिले आहेत. शाकाहार किती प्रमाणात चांगला आहे,

vegetarianism has improved Physical Relation
तुम्ही मांसाहार करता का? मग तुमची 'ती' इच्छा संपणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये हाय कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड अॅनिमल फॅट असते. ज्यामुळे आपल्या धमन्या बंद होतात.
  • जे लोक शाकाहारी अन्न खातात त्यांच्या शरीराचा गंध चांगला असतो आणि ते मांसाहार करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आकर्षक असतात.
  • मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केल्याने आपल्या शरीरातील सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढू शकते.

नवी दिल्ली : सध्या लोकांमध्ये शाकाहाराविषयी जागरूकता वाढत आहे. (Vegetarian Diet) शाकाहाराच्या फायद्यांबाबत जगभरात अनेक ठिकाणी संशोधन (Research) देखील केली जात आहेत. अनेक अभ्यासकांनी शाकाहाराचे फायदे पटवून दिले आहेत. शाकाहार किती प्रमाणात चांगला आहे, याविषयी 'द सन' (The Sun) या ब्रिटीश वृत्तपत्राची (British newspaper) पत्रकार जॉर्जेट काली (Journalist Georgette Kali) यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे. तिने सांगितले की, जेव्हापासून त्यांनी व्हेगन आहार (Vegan Diet) घेणे सुरू केले तेव्हापासून त्यांचे लैंगिक जीवन अधिक चांगले झाले आहे. याबाबतची सविस्तर पोस्ट तिने इन्स्टाग्रामवर लिहिली आहे.

पालेभाज्या, अंजीर, भोपळ्याच्या बिया, लाल मिरची, डार्क चॉकलेट आणि बदाम या सर्वांमध्ये ब जीवनसत्त्वे आणि झिंक भरपूर प्रमाणात असतात. हे टेस्टोस्टेरॉन (सेक्स हार्मोन) पातळी आणि लैंगिक इच्छा वाढवतात. त्यांच्या सेवनाने सेक्सची इच्छा वाढते. मांस, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थांमध्ये हाय कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड अॅनिमल फॅट असते, ज्यामुळे आपल्या धमन्या बंद होतात. यामुळे आपल्या शरीराच्या खालच्या भागात रक्ताचा प्रवाह मंदावतो, ज्यामुळे पुरुषांमध्ये नपुंसकता वाढत असते. 

दरम्यान पत्रकार जॉर्जेट कालीने शाकाहार आणि मांसाहार जेवण केल्यानंतरचा अनुभव आपल्या वाचकांशी शेअर केला आहे. जॉर्जेट कालीने सांगितले की, तिने एके दिवशी मांस खाल्ले आणि तिच्या प्रियकरासोबत झोपायला गेली, पण अंथरुणावर जाताच त्या दोघांना झोप लागली. त्यांच्या सोबत असे अनेकवेळा होत असे. यानंतर मात्र महिला पत्रकाराने मांसाहार पूर्णपणे सोडून दिला आणि ती पूर्णपणे शाकाहारी बनली. तिने सांगितले की, 'गेल्या सहा महिन्यांपासून मी शाकाहारी आहे. शाकाहारामुळे माझ्या कंबरेची जाडी देखील सुधारली आहे. माझी एनर्जी लेव्हल तसेच माझी संभोगाची इच्छादेखील वाढली आहे.

आता आम्ही बेडवर दीर्घकाळ एकमेकांवर प्रेम करू शकतोय. माझ्या जोडीदारानेही शाकाहारी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की, आता तो माझ्यावर पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करू लागला आहे. त्यांनी पुढे सांगितले की, हे फक्त तिचे मत नाही तर त्यामागे एक शास्त्र आहे. मुख्यतः शाकाहारी पदार्थ खाल्ल्याने रक्ताभिसरण वाढते, त्यामुळे संभोगाची  इच्छाही वाढते असा अनुभव देखील त्यांनी शेअर केला आहे.जॉर्जेट काली यांनी पुढे सांगितले की, जर तुम्हाला लवकर आणि चांगले परिणाम हवे असतील तर व्यायामासोबतच फ्लेव्होनॉइड्स युक्त आहार घ्या. यासाठी स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि सफरचंद या फळांचा आहारात समावेश करा.

अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, फ्लेव्होनॉइड्स युक्त आहार (Diet) पुरुषांमध्ये 20 टक्क्यांहून अधिक इरेक्टाइल डिसफंक्शनचा धोका कमी करू शकतो. एका संशोधनात असे दिसून आले आहे की, मांस आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन न केल्याने आपल्या शरीरातील सेरोटोनिन हार्मोनची पातळी वाढू शकते. हे हार्मोन आपल्याला आनंदी ठेवण्यास मदत करतो ज्यामुळे आपण आपल्या प्रियजनांवर प्रेम करू शकतो. सेक्स आणि सेंट यांचे जुने नाते आहे. एका संशोधनात असे समोर आले आहे की, जे लोक शाकाहारी अन्न खातात त्यांच्या शरीराचा गंध चांगला असतो आणि ते मांसाहार करणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आकर्षक असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी