Swapna Shastra: माणसाला स्वप्न (dream) पडतात म्हणजे नेमके काय होते? त्याला पडणारी स्वप्ने इतरांना का समजत नाहीत? एकदा पडलेले स्वप्न आपणास पुन्हा का पाहता येत नाही? हे आणि असे अनेक प्रश्न माणसाला (Human) अनादी काळापासून सतावत असतात. त्याचबरोबर स्वप्न पडणं हा काही मानसिक आजार आहे की काय असं अनेकांना वाटतं. परंतु सहसा स्वप्न बघण्याला एक सामान्य प्रक्रिया मानली जाते. परंतु ग्रीससारख्या (Greece) प्राचीन संस्कृती (Ancient culture) असलेल्या देशात स्वप्न पाहणे म्हणजे दैवी चिन्ह किंवा काही शक्तींचा हस्तक्षेप मानला जातो इथल्या सभ्यतेत स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की देव तुम्हाला एखाद्या गोष्टीचा किंवा तुमचा ज्याच्यावर विश्वास आहे अशी शक्ती जी तुम्हाला संकेत देऊ इच्छित आहे की, येत्या काळात तुमच्या आयुष्यात काय घडेल. म्हणून या स्वप्नामध्ये काही गोष्टी दिसल्यास त्यातून अर्थ काढला जातो.
आपण स्वप्नामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी पाहतो. प्रत्येक स्वप्न आपल्याला काहीना काही संकेत देत असते (Dream Meaning)असेही बोलले जाते. मात्र हे स्वप्न समजून घेण्यासाठी ते आपण कोणत्या अवस्थेत आणि कोणत्या वेळेले पाहिले आहे हे माहिती असणे गरचेचे असते. स्वप्न शास्त्रानुसार स्वप्नाला भविष्य देखील म्हटले जाते. आपल्या प्रत्येक स्वप्नाला अर्थ असतो. या स्वप्नाचा आपल्या आयुष्यावर प्रभाव पडत असतो. तसेच काही तुमच्या स्वप्नात काही प्राणी दिसले तर त्यातून वेगवेगळे अर्थ-तर्क काढले जातात. त्यातील एक प्राणी म्हणजे कावळा. आपल्या स्वप्ना कावळा दिसण याचा अर्थ हे आपण जाणून घेऊ. कावळा (Crow) हा अशुभ मानला जातो. याचा संबंध मृत्यूचे देवता यमराजसोबत असल्याचे मानले जाते.
गरुड पुराणात सांगितल्यानुसार, कावळा हा अशुभ असतो. यामुळे स्वप्नात जर कावळा दिसला तर काही तरी वाईट घडेल याचे संकेत असतात. मात्र कावळा स्वप्नात दिसण्याचा अर्थ प्रत्येक वेळी अशुभ संकेतच असते असे नाही. अनेकवेळा कावळा स्वप्नात दिसणे हे शुभ देखील असू शकते. हे सर्व स्वप्नात नेमके काय दिसले आणि कावळा कशा प्रकारे दिसला यावर अवलंबून असते.
Read Also : टोमॉटोनंतर सरकार स्वस्त करणार कांदा, उचलणार 'हे' पाऊल
स्वप्नामध्ये जर तुम्हाला उडणारा कावळा दिसला असेल तर हे स्वप्न चांगले नाही. यामुळे तुम्हाला मानसिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुम्ही कोणत्याही एखाद्या अडचणीत अडकू शकतात. यामध्ये तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया जाईल. एवढेच नाही तर तुमच्या नोकरीमध्येही संकट येऊ शकते.
स्वप्नात कावळा डोक्यावर बसलेला पाहणे अशुभ मानले जाते. स्वप्नात कावळ्याला डोक्यावर आलेले पाहणे हे मृत्यूचे (Death)संकेत असतात. तुमच्या घरात किंवा स्वतः तुमच्यासोबत काही तरी अघटीत घडू शकते. या अशुभ स्वप्नापासून बचाव करण्यासाठी तुम्ही महामृत्यूंजचा मंत्र जाप करावा.
Read Also : शौचालयाचा खड्डा खणायला गेले अन् खजिना घेऊन पळाले
3. कावळा पकडलेला दिसणे
स्वप्न शास्त्रात सांगितल्यानुसार, जर तुम्ही कावळ्याला हातात पकडलेले पाहिले तर हा तुमच्यासाठी शुभ संकेत असतो. अशा प्रकारचे स्वप्न पाहण्याचा अर्थ असतो की, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांच्या सर्व गरजा पूर्ण होणार आहेत.
Read Also : काच फुटणं शुभ की अशुभ, जाणून घ्या त्यामागचं रहस्य
जर तुम्हाच्या स्वप्नात कावळा आला आणि तो भीतीदायक आवाज काढत असेल किंवा रडत असेल तर हा शुभ संकेत नाही. याचा अर्थ तुमच्या घरात काही तरी वाईट होणार आहे. खरेतर हा संकेत मृत्यूचे सूचक आहे.