Vastu Tips: या दिशेला शौचालय असणे असते अशुभ, होऊ शकतो मोठ्या संकटाचा सामना 

Vastu Tips in marathi | हिंदू धर्मामध्ये वास्तुला खूप महत्त्व आहे. एखादे शुभ कार्य करण्याच्या आधी देखील वास्तुचा विचार केला जातो. वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना वास्तूनुसार काम करणे किती महत्त्वाचे आहे याबाबत कल्पना असते. तसेच वास्तूच्या विरूद्ध काम करणाऱ्यांना नुकसान सहन करावे लागते.

Having toilet on the south side is a big problem
या दिशेला शौचालय असणे असते अशुभ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिंदू धर्मामध्ये वास्तुला खूप महत्त्व आहे.
  • एखादे शुभ कार्य करण्याच्या आधी देखील वास्तुचा विचार केला जातो.
  • दक्षिण दिशेला शौचालय असणे अशुभ असते.

Vastu Tips in marathi  | मुंबई : हिंदू धर्मामध्ये वास्तुला खूप महत्त्व आहे. एखादे शुभ कार्य करण्याच्या आधी देखील वास्तुचा विचार केला जातो. वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना वास्तुनुसार काम करणे किती महत्त्वाचे आहे याबाबत कल्पना असते. तसेच वास्तूच्या विरूद्ध काम करणाऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. आज आपण वास्तुशास्त्रामध्ये शौचालय कोणत्या दिशेला बांधले पाहिजे आणि कोणत्या दिशेला बांधल्याने नुकसान होऊ शकते याबाबत भाष्य करणार आहोत. (Having toilet on the south side is a big problem). 

अधिक वाचा : केवळ दलित असल्याने दिली जाते अशी वागणूक - सुधाकर शृंगारे

दक्षिण दिशेला शौचालय असणे असते अशुभ 

जर तुमच्या घरात दक्षिण दिशेला शौचालय असेल त्याला तिथून हटवून दक्षिण-पश्चिम दिशेला घेण्याचा प्रयत्न करा. कारण दक्षिण दिशेला शौचालय बांधल्याने कीर्ती आणि धनाची मोठी हानी होते. घरातील मुलीला अपयशाला सामोरे जावे लागते. जीवनातील ऊर्जा संपल्याचा भास होत राहतो आणि तुमच्या डोळ्यांना सतत त्रास जाणवू लागतो. लक्षणीय बाब म्हणजे सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान सतत त्रासदायक मेसेज येत राहतात. दरवर्षी उन्हाळी हंगामात शासकीय विभागाकडून नोटिसा येत असल्याने नाहक त्रासाला सामोरे जावे लागते.

दरम्यान, काही मजबुरीमुळे दक्षिण दिशेला शौचालय असेल तर त्याचा परिणाम कमी करण्यासाठी शौचालयाच्या दारावर तांब्याचे पान लावल्यास फरक पडेल. या वास्तु टिप्सचा अवलंब करून तुम्ही नक्कीच या समस्येपासून तोडगा मिळवू शकता. वास्तुशास्त्रामध्ये दक्षिण दिशेला खूप महत्त्व आहे, दक्षिण दिशेला चुकीची कार्यपद्धती अवलंबल्यास मोठे नुकसान होऊ शकते. 

अधिक वाचा : बाबासाहेबांच्या १३१व्या जयंतीनिमित्त १३१ किलोचा केक कापला

दक्षिण दिशेला ही झाडे लावल्याने आर्थिक संकट येते 

तुळशीचे रोप - तुळशीचे रोप घरात ठेवणे खूप शुभ असते. ही रोपे घरात लावल्याने सुख-समृद्धी येते. वास्तुशास्त्रानुसार तुळशीची लागवड कधीही दक्षिण दिशेला करू नये. कारण या दिशेला तुळशीचे रोप लावल्याने आर्थिक स्थिती बिघडते. त्याची लागवड नेहमी पूर्व, उत्तर किंवा पूर्व-उत्तर दिशेला करावी.

शमीची वनस्पती - वास्तुशास्त्रानुसार शमीचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. खर तर या दिशेला शमीचे रोप लावल्यास आर्थिक समस्या उद्भवू शकतात. ही वनस्पती पूर्व किंवा ईशान्ये दिशेला लावावी. या दिशेला लावलेल्या शमीच्या रोपामुळे वास्तुदोष दूर होतात.

रोझमेरीची वनस्पती - वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये रोझमेरीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. याशिवाय ही वनस्पती शारीरिक आणि मानसिक समस्या दूर करण्यासाठीही उपयुक्त आहे. वास्तुशास्त्रानुसार ही वनस्पती दक्षिण दिशेला लावू नये.

मनी प्लांट - वास्तुशास्त्रानुसार घर आणि ऑफिसमध्ये मनी प्लांट लावणे शुभ असते. तसेच वास्तुशास्त्रानुसार मनी प्लांटचे रोप दक्षिण दिशेला लावू नये. आग्नेय कोनात म्हणजेच दक्षिण पूर्व दिशेला मनी प्लांटची लागवड करणे शुभ असते. 

केळीचे झाड - केळीचे झाड भगवान विष्णुला खूप प्रिय असते असे मानले जाते. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला केळीचे रोप लावू नये. ते ईशान्ये दिशेला लावणे सर्वात योग्य आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी