दररोज ३० मिनिटे पायी चालण्याचे आहेत 'हे' फायदे

लाइफफंडा
Updated Aug 02, 2020 | 18:57 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपण आपल्या जीवनात स्वतःला तंदुरुस्त आणि उत्साही ठेवण्यासाठी अनेक उपाय करतो. यात जिमला जाण्यापासून महाग डाएट अशा अनेक गोष्टी येतात. पण काही उपाय असेही आहेत की जे वापरून आपण सहज स्वतःला फिट ठेऊ शकता.

Health benefits of walking
पायी चालण्याचे फायदे 

थोडं पण कामाचं

  • पायी चालण्याला आपल्या जीवनाचा महत्वपूर्ण भाग बनवा
  • वजन कमी करण्यात हे सहाय्यकारी असते
  • अनेक गंभीर आजारांची लक्षणे दूर करते

जीवनात तंदुरुस्त (healthy) राहण्याचे हजारो उपाय आहेत. पण यातील अनेक उपाय रोजच्या आयुष्यात (daily life) लागू करणे कठीण असते. आजकाल जिम कल्चर (gym culture) खूप प्रसिध्द आहे. आपल्याला जर असे वाटत असेल की रोज जिममध्ये तासंतास घाम गाळणे आणि कमी कॅलरी (low calorie food) असलेले खाणे हाच तंदुरुस्त राहण्याचा एकमेव उपाय आहे तर आपण चुकत आहात. आरोग्यदायी जीवनाचा आणि तंदुरुस्त राहण्याचा एक सोपा उपाय आहे रोज सकाळी किंवा संध्याकाळी तीस मिनिटे फिरणे (daily walk) आणि सक्रीय जीवनशैलीचे (active lifestyle) पालन करणे.

एका संशोधनात या गोष्टीचा खुलासा झाला आहे की जर आपण सातत्याने हलका व्यायाम करत असाल आणि दररोज साधारण अर्धा तास पायी चालत असाल तर आपल्याला याचे उत्तम परिणाम दिसतील. याने आपल्या तब्येतीत सुधारणा होईल आणि आपण अनेक आजारांपासून सुरक्षित राहाल. जाणून घ्या याचे अनेक फायदे.

1. मासिक पाळी दरम्यानच्या वेदना कमी करते

अनेक महिलांना मासिक पाळीच्या वेळी खूप वेदनांचा सामना करावा लागतो. यादरम्यान त्या स्वतःला आराम देण्यासाठी अनेक उपाय करतात. पण पाळीच्या दिवसांत घराच्या अंगणात, सोसायटी किंवा बागेत १५ मिनिटे आरामात फिरल्यास या वेदना कमी होण्यास मदत होते.

2. पायी फिरण्याने वाढू शकते आपले आयुष्य

जीवन आणि मृत्यू खरेतर आपल्या हातात नसतात. पण काही छोट्या उपायांनी आपण स्वतःला तंदुरुस्त ठेऊ शकता. यातील एक म्हणजे दररोज काही मिनिटांचे पायी फिरणे. प्रसिध्द नियतकालीक ‘द लॅन्सेट’मध्ये 2011त प्रसिध्द झालेल्या एका अहवालानुसार दररोज 15 मिनिटे आणि एका आठवड्यात किमान 90 मिनिटे पायी फिरणाऱ्यांचे आयुष्य तीन वर्षांपर्यंत वाढू शकते. आणखी एका संशोधनातून असा खुलासा झाला आहे की सातत्याने पायी फिरणाऱ्यांचे आयुष्यमान इतरांच्या तुलनेत जास्त असते.

3. पायी फिरणाऱ्यांना मधुमेह होण्याची शक्यता कमी होते

पायी फिरण्याने शरीरात इन्सुलिनचा वापर योग्य पध्दतीने करू शकते. जर आपल्याला मधुमेह होण्याची शक्यता असेल किंवा आपल्याला याचा त्रास असेल तर काही मिनिटे पायी फिरणे आपल्यासाठी आरोग्यदायी आहे.

4. पायी फिरणे आपल्याला सांधेदुखीपासून वाचवेल

जास्त वय असलेल्यांनी दररोज 15 मिनिटे आणि आठवड्यात किमान एक तास पायी फिरल्यास ते स्वतःला सांधेदुखीपासून वाचवू शकतात. 2019मध्ये American Journal of Preventive Medicineमध्ये प्रसिध्द झालेल्या एका अहवालात त्यांनी 49 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि सांधेदुखी असलेल्या 1564 लोकांवर संशोधन केले. त्यांना दररोज 15 मिनिटे पायी फिरण्यास सांगण्यात आले. काही आठवड्यांनंतर यातील अनेकांची सांधेदुखी कमी झाल्याचे आणि शरीरात उत्साह वाढल्याचे दिसून आले.

5. पायी फिरल्याने आपले मस्तक ताजेतवाने राहते

दररोज काही वेळ पायी फिरल्यास आपण ताजेतवाने राहता. यामुळे आपण आपली कामेही अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. अनेक मनोवैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार दररोज काही वेळ पायी फिरल्यास सुस्ती आणि अधिक चिंतेची अनेक लक्षणे दूर होतात.

6. वजन वाढण्यावर नियंत्रण 

दररोज अर्धा तास पायी फिरणाऱ्यांची पचनशक्ती सुधारते आणि त्यांच्या जास्त कॅलरीज खर्च होतात. पायी चालणे हा हृदयासाठीही सोपा व्यायाम मानला जातो, ज्यामुळे वजन संतुलित राहण्यास मदत होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी