Home Remedies: मच्छरांनी तुम्हालाही केले आहे हैराण, तर करा हे ५ घरगुती उपाय

लाइफफंडा
Updated Apr 13, 2022 | 14:51 IST | टाइम्स नाऊ मराठी

Mosquito Home Remedies । उन्हाळ्यात तुम्हाला जेवढा गर्मीचा त्रास जाणवत नाही त्याहून जास्त त्रास मच्छरांचा होत असतो. मच्छर मारण्याची कॉइल संपताच हे डास आपल्यावर हल्ला करू लागतात. रात्रीच्या वेळी तर सर्वत्र मच्छरांचा वावर असल्याचे पाहायला मिळते.

Here are 5 home remedies to get rid of mosquitoes
मच्छरांनी तुम्हालाही केले आहे हैराण, तर करा हे ५ घरगुती उपाय  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • फोडलेल्या लसणांचा वास मच्छरांच्या डोळ्यांना सहन होत नाही.
  • पुदीनाच्या सुगंधाने मच्छरांना त्रास होतो.
  • सोयाबीन तेल देखील मच्छरांना तुमच्यापासून ठेवते.

Mosquito Home Remedies । मुंबई : उन्हाळ्यात तुम्हाला जेवढा गर्मीचा त्रास जाणवत नाही त्याहून जास्त त्रास मच्छरांचा होत असतो. मच्छर मारण्याची कॉइल संपताच हे डास आपल्यावर हल्ला करू लागतात. रात्रीच्या वेळी तर सर्वत्र मच्छरांचा वावर असल्याचे पाहायला मिळते. प्रत्येक वेळी त्यांच्यापासून दूर राहण्याची काळजी घेतली जाते आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले तरीही मच्छर कोणत्या ना कोणत्या कोपऱ्यात लपून बसतात. (Here are 5 home remedies to get rid of mosquitoes). 

 हे घातक डास फक्त संधी शोधत असतात आपला नाश करणारे औषध कधी संपेल आणि कधी आपण हल्ला करू. या डासांमुळे सर्वांनाच त्रास होतो. कधीकधी असे वाटते की गर्मी सहन करणे शक्य आहे परंतु ते डास नाही. आजाराला निमंत्रण देणाऱ्या डासांनी तुमचीही अशी वाईट अवस्था केली असेल तर मग हे काही घरगुती उपाय तुमच्यासाठी उपयोगी ठरू शकतात.

अधिक वाचा : राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल

मच्छरांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies to Get Rid of Mosquitoes) 

लसुण - फोडलेल्या लसणांचा (Garlic) वास मच्छरांच्या डोळ्यांना सहन होत नाही. लसणाच्या काही पाकळ्या कुस्करून पाण्यात उकळा. त्यानंतर याला स्प्रेच्या बाटलीत भरा आणि घरात सर्वत्र शिंपडा. असे केल्यास घरात असलेले सर्व मच्छर पळून जातील. 

कॉफी - मच्छर अंडी घालू शकतात किंवा प्रजनन करू शकतात त्यामुळे अशा ठिकाणी पावडर किंवा कॉफी ग्राऊंड ठेवा. अशाने मच्छर आणि त्यांची अंडी मरतील. 

पुदीना - पुदीनाच्या सुगंधाने मच्छरांना त्रास होतो. घरभर पुदिन्याचे तेल शिंपडा. असे केल्याने मच्छर तुमच्या घरापासून दूर राहतील. 

कडुलिंबाचे तेल - शरीरावर मच्छरने हल्ला करू नये आणि तुमच्यापासून दूर राहण्यासाठी कडुलिंबाचे तेल (Neem Oil) पाण्यात मिसळून किंवा बॉडी लोशनमध्ये मिसळून शरीरावर लावा. त्यामुळे मच्छर तुमच्या आजूबाजूला देखील फिरकणार नाहीत. 

सोयाबीन तेल - सोयाबीन तेल देखील मच्छरांना तुमच्यापासून ठेवते. रात्री अंगावर सोयाबीन तेल लावून झोपल्यावर मच्छर चावू शकणार नाहीत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी