International Women's Day 2021: 'या' आहेत भारतातील सर्वात प्रभावी महिला ज्यांनी इतिहास बदलला

लाइफफंडा
Updated Mar 07, 2021 | 16:31 IST | टाइम्स नाऊ मराठी

दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला जातो जेणेकरून महिलांना त्यांचा सन्मान दिला जाऊ शकेल, त्यांचे हक्क देता येतील. महिलांना असे सांगता येईल की त्यांना या समाजात बरोबरीने जगण्याचा हक्क आहे.

International Women's Day
International Women's Day 2021: या आहेत भारतातील सर्वात प्रभावी महिला ज्यांनी इतिहास बदलला  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • महिलांच्या सन्मानासाठी साजरा केला जातो महिला दिन
  • महिलांना समाजात बरोबरीचे हक्क देण्यासाठी झाली होती सुरुवात
  • भारतातील या पाच महिलांनी बददला जगाचा चेहरामोहरा

दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवस (International Women’s Day) साजरा केला जातो जेणेकरून महिलांना (women) त्यांचा सन्मान (honor) दिला जाऊ शकेल, त्यांचे हक्क (rights) देता येतील. महिलांना असे सांगता येईल की त्यांना या समाजात (society) बरोबरीने (equality) जगण्याचा हक्क आहे. हक्कांबद्दल बोलायचे झाले तर महिला आपल्या हक्कांसाठीची लढाई अनेक शतकांपासून लढत आहेत. तर जाणून घेऊया भारतातील अशाच सर्वात प्रभावशाली महिलांबद्दल (powerful women) ज्यांनी इतिहास बदलून टाकला.

झाशीची राणी लक्ष्मीबाई

झाशीच्या राणीचा म्हणजे लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1935 रोजी झाला होता. त्यांनी इंग्रज राजवटीविरुद्ध अशी कडवी झुंज दिली की इंग्रजही तिचे शौर्य पाहून अवाक झाले. ती शेवटपर्यंत इंग्रजांशी लढत राहिली. याच लढाईत वयाच्या तेविसाव्या वर्षी तिने आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या या बलिदानासाठी तिला संपूर्ण देश नेहमीच स्मरणात ठेवेल.

Jhansi ki Rani| Rani Laxmi Bai Birth Anniversary: Queen who defended Jhansi  to her dying breath, made British quake in boots | Trending & Viral News

सरोजिनी नायडू

13 फेब्रुवारी 1879 रोजी हैदराबाद इथे सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला. त्या कवयित्री होत्या आणि बंगाली भाषेत त्या लिहीत असत. फक्त 14 वर्षाच्या असताना त्यांनी सर्व इंग्रजी कवींच्या कवितांचा अभ्यास केला होता. भारतीय समाजातील वाईट प्रथांबाबत त्यांनी भारतीय महिलांना जागृत केले. जालियनवाला बाग हत्याकांडामुळे व्यथित आणि क्रोधित होऊन त्यांनी 1908मध्ये त्यांना मिळालेला 'कैसर-ए-हिन्द' पुरस्कार परत केला. त्या उत्तर प्रदेशच्या पहिल्या महिला राज्यपालही झाल्या.

Sarojini Naidu's 141th birth anniversary today - Times of India

इंदिरा गांधी

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी नेहरूंच्या घरात झाला. त्या लहानपणापासूनच स्वातंत्र्यलढ्यात सक्रीय होत्या. त्यांनी लहानपणीच ‘बाल चरखा संघा’ची स्थापना केली आणि असहकार आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेस पक्षाच्या मदतीसाठी 1930मध्ये मुलांच्या सहयोगाने वानरसेना स्थापन केली. सप्टेंबर 1942मध्ये त्यांना कारागृहात टाकण्यात आले. 1947मध्ये त्यांनी महात्मा गांधींच्या मार्गदर्शनात दिल्ली दंगलींमुळे होरपळलेल्या भागात काम केले. ऑगस्ट 1964 ते फेब्रुवारी 1967पर्यंत त्या राज्यसभेच्या आणि नंतर चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या सत्रात लोकसभेच्या सदस्या होत्या.

indira gandhi: Latest News, Videos and indira gandhi Photos | Times of India

कल्पना चावला

आपला भारत देश आजही देशाच्या या मुलीवर गर्व करतो. घराच्या चार भिंतींच्या बाहेर पडून कल्पनाने चंद्रावर स्वारी केली. ती अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला होती. फक्त 35व्या वर्षी तिने पृथ्वीला 252 प्रदक्षिणा घालून जगाला चकित केले. तिने सहा अंतराळवीरांसह कोलंबिया TS-87 या यानातून उड्डाण केले. आपल्या पहिल्या यात्रेदरम्यान कल्पनाने 1.04 कोटी मैलांचे अंतर पार करत साधारण 372 तास अंतराळात घालवले. 1 फेब्रुवारी 2003 रोजी तिचे यान पृथ्वीवर परतत असताना त्या यानाशी संपर्क तुटला आणि पृथ्वीच्या वातावरणात शिरताना घर्षण झाल्याने स्फोट होऊन यात तिचे निधन झाले.

Udham Singh Nagar college to be renamed after Kalpana Chawla | Dehradun  News - Times of India

मदर तेरेसा

या एक अशा महिला होत्या ज्यांनी नेहमीच शांततेसाठी प्रयत्न केला. कोलकाता शहरात राहून एका आश्रमाद्वारे त्यांनी अनाथ मुलांना मदत केली, त्यांच्यावर उपचार केले. जेव्हा एका पत्रकाराने त्यांना विचारले की भारताबद्दलचे त्यांचे मत काय आहे, तेव्हा त्या म्हणाल्या की मी सर्व धर्माच्या माणसांवर प्रेम करते. मदर तेरेसा यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्नही प्रदान करण्यात आला.

Mother Teresa: Latest News, Videos and Mother Teresa Photos | Times of India

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी