चीन : तुम्हाला गर्लफ्रेण्ड नाही म्हणून तुमचे आई-वडील कधी तुम्हाला ओरडलेत का? तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न आहे. आपल्या देशात तरी असं शक्य नाहीमात्र, चीनमध्ये असं घडतं. गर्लफ्रेण्ड नसल्यास पालक ओरडतायेत. त्यामुळे पालकांच्या रागवण्यापासून वाचवण्यासाठी तरुण मुलं रेंटवर गर्लफ्रेण्ड घेतात. चीनमध्ये अनेक अँप्सच्या मदतीने अशी गर्लफ्रेण्ड रेंटवर मिळवता येते.
चीनमधील तरूण सुट्टीसाठी जेव्हा घरी जातात तेव्हा रेंटवर अर्थातच भाड्याने गर्लफ्रेण्ड आणतात. अन्यथा त्यांच्या पालकांच्या आणि नातलगांच्या प्रश्नांना त्यांना तोंड द्यावं लागतं. अनेकदा तरुणांना लग्नाचे महत्व आणि गर्लफ्रेण्ड या विषयावर पालकांकडून खूप ऐकावं लागतं.
भाड्याने गर्लफ्रेण्ड आणणारी व्यक्ती त्या मुलीला स्पर्श करू शकत नाही. ती मुलगी त्या व्यक्तीला फक्त भावनिक आधार देईल. गर्लफ्रेण्ड असल्यासारखं वागेल.
मिळालेल्या माहितीनुसार, गर्लफ्रेण्ड भाड्याने घेण्यासाठी 1,999 युआन म्हणजेच सुमारे 22,816 रुपये खर्च करावे लागतात. हे तरुण गर्लफ्रेण्डला त्यांच्या कुटुंबाशी भेट घालू देऊ शकतात. त्यांच्यासोबत फिरायला अर्थातच डेटवर जाऊ शकतात, त्यांच्याशी चॅट करू शकतात, गप्पा मारू शकतात.
लूनर न्यू ईयर दरम्यान गर्लफ्रेण्ड भाड्याने घेणं चीनमध्ये अधिक महागात पडतं. त्यावेळी तरुणांना 3 हजार युआन म्हणजेच 34,241 ते 10 हजार युआन म्हणजेच 1 लाख 14 हजार 139 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. गर्लफ्रेण्ड भाड्यावर घेण्यासाठी इतकी मोठी रक्कम या तरुणांना मोजावी लागते.
दरम्यान, रेंटवर गर्लफ्रेंड म्हणून काम करणाऱ्या मुलीने सांगितलं की, तिची नोकरी खूप कठीण आहे कारण तिला प्रत्येक वेळी अनोळखी व्यक्तीशी मैत्री करावी लागते.