Relationship Advice: स्त्री (Woman) असो की पुरुष (Male), लग्नानंतर (marriage) त्यांच्या वागण्यात बदल होतो. पण महिलांच्या बाबतीत असे आहे की सासरच्या घरी लग्न झाल्यानंतर त्या अनेक सवयी बदलतात. विशेष म्हणजे बायका नेहमी-नेहमी चिडचिड करत असतात. सासरी आलेल्या मुलींना सर्व काही नवीन असतं, जुन्या सवयी मोडून नवीन सवयी आत्मसात करायच्या असतात. अशात त्यांची चिडचिड होत असते. चिडचिड करणं, कटकट करणं, रागावणं यामागील इतर आणखीन काही कारणे आपण समजून घेणार आहोत.
सासरी माहेरात असलेलं वातावरण त्यांना मिळत नाही. माहेरी आई-वडिलांपासून ते सर्वजण समजून घेणारे असतात. पण असे वातावरण सासरच्या घरात सहजासहजी मिळत नाही. त्याचबरोबर महिलांना दीर्घकाळ एकटेपणाचा सामना करावा लागतो, त्यामुळे महिलांची चिडचिड होते.
Read Also : ऐनवेळेस इंदुरीकर महाराजांनी रद्द केलं किर्तन; खर्च झाला वाया
मुलगी आपले घर आणि कुटुंब दोन्ही सोडून सासरच्या घरी जाते आणि तिला सासरच्या घरात प्रेम आणि आपलेपणा मिळावा असे वाटते. पण जेव्हा सासरच्या घरात अशी वागणूक दिली जात नाही तेव्हा स्त्रिया हळूहळू रागीट आणि चिडचिड स्वभावाच्या बनत असतात. त्याच वेळी, ती तिचा राग तिच्या पतीवर काढते.
Read Also : अमित शाह भेटले ज्युनियर एनटीआरला, ट्विट करत केलं कौतुक
सर्वच मुलींचं लग्न हे त्यांचे स्वप्ने पूर्ण केल्यानंतरच होत असतं असं नाही. बहुतेक मुलींचे स्वप्नं पूर्ण होण्याआधीच लग्न होत असतात. आणि बाकीच्या गोष्टी सासरच्या घरी जाऊन पूर्ण करू, असा त्यांचा प्रयत्न असतो. पण, अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी नवऱ्याची साथ मिळाली नाही, तर तो गंभीर प्रश्न बनतो. यामुळे जोडप्यांमध्ये भांडणही होऊ शकतात.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची पृष्टी करत नाही.)