HOLI 2023 Messages : WhatsApp Status, Facebook Messages Whatsapp Images, Photos,Whatsapp Wallpaper,द्वारे प्रियजनांना मराठीतून द्या होळी दहनाच्या शुभेच्छा

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Mar 06, 2023 | 09:48 IST

 Holi 2023 Messages in Marathi  : मुंबई :  यावर्षी देशभरात दोन दिवस होळी (Holi) साजरी केली जाणार आहे. होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते आणि धूलिवंदन हा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी रंग गुलालाने साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात.

Holi 2023 Images
HOLI 2023 : प्रियजनांना मराठीतून द्या होळीच्या शुभेच्छा  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पोर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो.
  • यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 6 मार्च 2023 ला संध्याकाळी 4.17 ते 7 मार्च 2023 संध्याकाळी 6.09 पर्यंत असेल.
  • ्रियजनांना आणि कुटुंबियांना होळी दहनाच्या शुभेच्छा देऊया.

Holi 2023 Messages in Marathi  : मुंबई :  यावर्षी देशभरात दोन दिवस होळी (Holi) साजरी केली जाणार आहे. होलिका दहन दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला केले जाते आणि धूलिवंदन हा उत्सव फाल्गुन महिन्याच्या कृष्ण प्रतिपदेच्या दुसऱ्या दिवशी रंग गुलालाने साजरा केला जातो. पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो. या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजल कुळी, उकुळी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात. हिंदू पंचागनुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी 6 मार्च 2023 ला संध्याकाळी 4.17 ते  7 मार्च 2023 संध्याकाळी 6.09 पर्यंत असेल. 

होळीच्या दिवशी आपल्या प्रियजनांना आणि कुटुंबियांना होळी दहनाच्या शुभेच्छा देऊया.  आम्ही आपल्यासाठी काही शुभेच्छा संदेश तयार केली आहेत. त्या आपल्या कटुंबियांना, प्रिय व्यक्तींना व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून  द्या.  (HOLI 2023 Images : wishes your Family & friends on Holi through Photos, Wallpaper, WhatsApp Status,, Facebook Messages, Whatsapp Wallpaper )

अधिक वाचा  : महिलांना मुंबई महानगरपालिकेची अनोखी भेट 

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Holi 2023 Images

नवयुग होळीचा संदेश नवा
झाडे लावा, झाडे जगवा
करूया अग्निदेवतेची पूजा..
होळी सजवा गोव-यांनी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
Holi 2023 Images

या होळीला, तुम्हाला आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो. होळीच्या शुभेच्छा!

Holi 2023 Imagesपौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला मी व माझ्या परिवारातर्फे
होळीच्या हार्दिक शुभेच्छा

Holi 2023 Images

होळीनिमित्त प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा

Holi 2023 Images

होळीनिमित्त प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा

अनिष्ट प्रथा आणि वाईट प्रवृत्तीवर 
चांगुलपणाने मात करण्याचा दिवस
आपल्या सर्व वाईट विचारांची होळी करू या, 
दुष्टावर मात करु या...! 
आपणास होळीच्या शुभेच्छा !

Holi 2023 Imagesहोळीनिमित्त प्रियजनांना मराठीतून शुभेच्छा

वाईट सारे जळून जावे, 
चांगले ते उदयास यावे
दृष्ट प्रवृत्तींचा होवो नाश, 
सर्वांना लाभो सुख: शांती आज
सर्वांना होळीच्या शुभेच्छा...!

holiआली रे आली, होळी आली
चला, आज पेटवूया होळी
नैराश्याची बांधून मोळी
दाखवून नैवद्य पुरणपोळीचा
मारूया हाळी…
होळी रे होळी, पुरणाची पोळी
करू आनंदाने साजरी होळी
होळीच्या हार्दिक शुभेच्छा
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी