Holi Pre & Post Hair Care Tips : रंगांनी खेळल्यानंतर केस होत आहेत खराब ? अशी घ्या केसांची काळजी

लाइफफंडा
Updated Mar 03, 2023 | 15:13 IST | टाइम्स नाऊ मराठी

Holi 2023 Pre & Post Hair Care Tips in marathi : होळी हा सण सर्वांचा आवडीचा अगदी लहाणांपासून ते मोठ्यांपर्यत. प्रत्येकजण तेवढ्याच उत्साहाने साजरा केला जातो. पण त्याचवेळी आपली त्वचा आणि केस सुरक्षित ठेवायला विसरू नका.

Holi Hair Care Tips to Protect Hair
होळी ही नेहमी नैसर्गिक रंगांनीच खेळावी  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • होळी हा सर्वांचा आवडता सण
  • प्रत्येकजण तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो
  • होळी ही नेहमी नैसर्गिक रंगांनीच खेळावी

Holi 2023 Pre & Post Hair Care Tips in marathi : होळी हा सण सर्वांचा आवडीचा अगदी लहाणांपासून ते मोठ्यांपर्यत. प्रत्येकजण तेवढ्याच उत्साहाने साजरा करतो. पण त्याचवेळी आपली त्वचा आणि केस सुरक्षित ठेवायला विसरू नका.

होळीच्या वेळी रंगांनी खेळताना केसांची वाट लागते. आणि होळीच्या आधी केसांची केमिकल ट्रिटमेंट करणं केसांच्या सुरक्षेसाठी चांगले नाही. डॉ. रेश्मा टी. विश्नानी, कन्सल्टन्ट डर्मेटोलॉजिस्ट, ट्रायकोलॉजिस्ट आणि एस्थेटिक डर्मेटोलॉजिस्ट, कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई यांनी याविषयी अधिक माहिती दिली आहे. 

​ऑरगॅनिक आणि हर्बल रंग वापरा​

होळी ही नेहमी नैसर्गिक रंगांनीच खेळावी. चंदेरी आणि सोनेरी रंगांचा वापर करु नये त्यांनी केसांसोबतच आपल्या चेहऱ्याचीही वाट लागते. या रंगांमध्ये डायसारखे केमिकल मिसळलेले असतात त्यामुळे  ऍलर्जी होऊ शकते. तसेच रंगांनी खेळण्याआधी केसं धुणे पूर्णपणे टाळावे. केस धुतल्यावर केसाखालील त्वचा आणि केसांमधील आवश्यक तेल निघून जाते , अशावेळी केसांखालील त्वचेमध्ये अधिक पाणी आणि रंग शोषले जाण्याची शक्यता असते, साहजिकच यामुळे त्वचेचे व केसाचे नुकसान होण्याची शक्यता असते. 

अधिक वाचा : PPF मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी ‘हे’ जाणून घ्या नाहीतर बसेल मोठा फटका

केसांना तेल लावणे

रंग खेळायच्या आधी एक तास केसांना भरपूर तेल लावून ठेवा. जर तुम्हाला तेलाची  ऍलर्जी असेल तर तुम्ही लीव्ह-इन कंडिशनर वापरुन त्यावर हीट प्रोटेक्शन स्प्रे मारा. त्यामुळे रंग केसांमध्ये शोषला जात नाही आणि तो निघण्यासही मदत होते. 

अधिक वाचा : कमी बजेटमध्ये सोलो ट्रिप कशी करणार?

केस मोकळे ठेऊ नका

मालिकांमध्ये जरी केसं मोकळे ठेऊन रंगांनी खेळले जाते पण हे तुम्ही करणे टाळा. त्याऐवजी केसांचा सैलसर आंबाडा घालून त्याला एका स्कार्फमध्ये बांधून ठेवा ज्यामुळे तुमचे केस सुरक्षित राहण्यास मदत होईल. तसेच उन्हाच्या संपर्कात आल्याने केस राठ होऊ शकतात. कोरडी त्वचा, कोरडे, निस्तेज केस, केसांची टोके दुभंगणे हे केस सुरक्षित न ठेवता होणारे हानिकारक परिणाम आहेत. सणासुदीच्या काळात सूर्याच्या कडक उन्हाच्या संपर्कात येणे टाळा, भरपूर पाणी प्या.

डीप कंडिशनिंग 

होळीचे रंग केसांचे नुकसान करतात त्यामुळे केसांना डीप कंडिशनिंग करणं गरजेच आहे. रंग खेळल्यानंतर पुढचे काही दिवस केसांना डीप कंडिशनिंग करत राहा त्यामुळे केस सॉफ्ट राहायला मदत होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी