Dahi Vada /Dahi Bhalla Recipe in marathi: दही भल्ला किंवा दही वडा या पदार्थाचे नुसते नाव ऐकले तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अतिशय चटपटीत पदार्थ अशी दही भल्ला या पदार्थाची ओळख आहे. लो कॅलरी फूड म्हणून हा पदार्थ प्रसिद्ध आहे. । लाइफफंडा ।
वाफेवर भल्ला तयार होतो. यामुळे फिटनेस जपणाऱ्यांना आणि वजन कमी करू इच्छिणाऱ्यांना अधूनमधून रुचकर नाश्ता म्हणून दही भल्ला खाण्याचा सल्ला दिला जातो. दही भल्ला खाल्ल्याने जिभेचे चोचले पुरवले जातात आणि फिटनेस सहज जपला जातो.
दही भल्ला तयार करण्यासाठी उडदाची डाळ, मूग डाळ यांचा वापर होतो. डाळींच्या माध्यमातून शरीराला व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई मिळते. तसेच दही भल्ला खाल्ल्याने शरीराला अनेक पोषक मिनरल्स (खनिजे), फायबर, प्रोटिन मिळते.
मर्यादीत प्रमाणात दही भल्ला खाल्ल्याने वजन वाढत नाही तसेच अन्न पचन सहजतेने होते. दही भल्ल्यातील दही शरीराला ऊर्जा मिळवून देते तसेच अन्न पचवण्यास मदत करते.
वेटलॉससाठी अथवा फिटनेससाठी दही भल्ला खाणार असल्यास भल्ले वाफेवर तयार करा. यामुळे शरीराला फायदा होईल.