Clean your specs : डोळ्यांची काळजी (Eye Care) घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे वापरत असल्याचं दिसतं. गेल्या काही वर्षात चष्म्याची (Specs) मागणी वाढली असून अधिकाधिक लोक कुठल्या ना कुठल्या कारणासाठी चष्मा वापरू लागल्याचं चित्र आहे. काहीजण उन्हात बाहेर पडताना डोळ्यांची काळजी घेण्यासाठी चष्मा वापरतात, काहीजण कॉम्प्युटर किंवा कुठल्याही स्क्रीनसमोर काम करताना डोळ्यांना त्रास होऊ नये, यासाठी चष्म्याचा वापर करतात, तर काहीजणांना डोळ्यांना नंबर आल्यामुळे चष्म्याशिवाय त्यांना नीट दिसत नाही. त्यासाठीही काहीजण चष्मा वापरतात. चष्मा वापऱण्याची कारणं काहीही असली तरी तो वापरणाऱ्या सर्वांसमोर असणारी समस्या असते ती चष्मा साफ ठेवण्याची. (Cleaning the specs) चष्म्याच्या काचा वारंवार घाण होतात आणि त्या साफ केल्या नाहीत चष्मा वापरायला फारच त्रास होत असतो. वारंवार हाताच्या बोटांचा स्पर्श झाल्यामुळे किंवा धूळ बसल्यामुळे अस्वच्छ होणाऱ्या काचा साफ करण्यासाठी काही घरगुती उपाय करता येतात. या उपायांनी काचा साफ केल्या, तर काही मिनिटांतच त्या चकचकीत होतात आणि चष्म्याचा आनंद घेता येऊ शकतो.
विच हेजलचा वापर करून चष्मा साफ करण्यासाठीचं मिश्रण तयार करता येतं. त्यासाठी अर्धा कप डिस्टिल्ड वॉटर घ्या आणि त्यात अर्धा कप विच हेजल मिक्स करा. आता हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. जेव्हा जेव्हा चष्म्यावर डाग पडले आहेत, असं वाटेल, तेव्हा या बाटलीतलं पाणी काचांवर स्प्रे करा आणि माइक्रोफायबर कपड्याचा वापर करून काचा स्वच्छ पुसून घ्या.
चष्मा साफ करण्यासाठी विनेगरही फायद्याचं ठरतं. व्हिनेगरचं मिश्रण तयार करताना पावपट पाणी घ्या आणि पाऊणपट विनेगर घ्या. दोन्ही एकत्र करून मिश्रण बनवा आणि बाटलीत भरून ठेवा. चष्मा घाण झाल्यावर हे मिश्रण फवारा आणि मायक्रोफायबरच्या कपड्याने काचा पुसून घ्या. जर मायक्रोफायबरचं कापड नसेल तर कुठलंही स्वच्छ सुती कापडही तुम्ही वापरू शकता.
अधिक वाचा - Vastu tips : आर्थिक स्थैर्यासाठी करा हे उपाय, होईल धनप्राप्ती...भरलेली राहील तिजोरी
चष्मा साफ करण्यासाठी अल्कोहोलचा वापरही फायदेशीर ठरू शकतो. त्यासाठी तीन चतुर्थांश अल्कोहोल आणि एक चतुर्थांश पाणी घ्या. त्यात एक ते दोन थेंब डिशवॉश लिक्विड मिक्स करा. हे मिश्रण एका स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा आणि गरजेनुसार चष्म्याच्या काचा साफ करण्यासाठी त्याचा वापर करा. यामुळे तुमचा चष्मा स्वच्छ आणि चकचकीत दिसू लागेल.
अधिक वाचा - Today in History Tuesday, 23rdAugust 2022: आज आहे कवी विंदा करंदीकर यांचा जन्मदिन, जाणून घ्या आजचे दिनविशेष
डिस्टिल्ड वॉटरचा वापरही तुम्ही चष्मा साफ करण्यासाठी करू शकता. त्यासाठी एकसारख्या प्रमाणात विनेगर, डिस्टिल्ड वॉटर आणि अल्कोहोल घेऊन त्यांचं मिश्रण तयार करा आणि त्याचा वापर करा.
डिस्केलमर - या सर्व चष्मा स्वच्छ करण्याच्या घरगुती स्वरुपाच्या टिप्स आहेत. या उपायांनी चष्मा पूर्ण साफ होईलच, याची कुठलीही खात्री देता येत नाही.