घरातून उंदीर, पाली आणि माशा घालवण्याचे घरगुती उपाय, एकदा नक्की आजमावून पाहा

लाइफफंडा
Updated Mar 08, 2021 | 20:18 IST | टाइम्स नाऊ मराठी

आपल्या घरात उंदीर, पाली आणि डास-माशा असलेल्या कुणालाच आवडत नाहीत. जेव्हा यांच्यामुळे घरातील वस्तूंचे आणि घरातील माणसांच्या आरोग्याचे नुकसान होऊ लागते तेव्हा परिस्थिती आणखीच गंभीर होते.

Mouse
घरातून उंदीर, पाली आणि माशा घालवण्याचे घरगुती उपाय, एकदा नक्की आजमावून पाहा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • अशी मिळवा घरातील उंदरांपासून सुटका
  • माशांना पळवून लावण्यासाठी करा हे उपाय
  • अशी मिळवा पालींपासून सुटका

आपल्या घरात (House) उंदीर (mice), पाली (lizards) आणि डास (mosquitoes), माशा (flies) असलेल्या कुणालाच आवडत नाहीत. जेव्हा यांच्यामुळे घरातील वस्तूंचे (things) आणि घरातील माणसांच्या आरोग्याचे (health) नुकसान होऊ लागते तेव्हा परिस्थिती आणखीच गंभीर होते. अशा परिस्थितीत अनेक वेगवेगळे उपाय (remedies) करूनही यांच्यापासून पूर्ण सुटका (rid) मिळत नाही आणि याचा त्रास वाढतच राहतो. आज आम्ही आपल्याला असे काही उपाय सांगणार आहोत ज्यांद्वारे आपल्याला आपल्या घरातील उंदीर, झुरळे, पालींपासून सुटका मिळेल.

अशी मिळवा घरातील उंदरांपासून सुटका

जर आपल्या घरात उंदीर झाले असतील तर पेपरमिंटचे काही तुकडे घरातील आणि स्वयंपाकघरातील सर्व कोपऱ्यांमध्ये ठेवून द्या. उंदरांना पेपरमिंटचा वास अजिबात आवडत नाही आणि त्यापासून ते दूर पळतात. यामुळे आपल्याला त्यांच्यापासून सुटका मिळते. जर तरीही ते येत असतील तर आठवड्यातून 3-4 दिवस सतत हा उपाय करा. उंदीर आपल्या घरातून निघून जातील.

माशांना पळवून लावण्यासाठी करा हे उपाय

माशांपासून सुटका मिळवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे घराचे दरवाजे शक्य तेव्हा बंद ठेवणे आणि घरात स्वच्छता राखणे. याशिवाय कुठल्याही उग्र वासाच्या तेलात कापड किंवा कापूस बुडवून ते दरवाजाजवळ ठेवा. कारण उंदरांप्रमाणेच माशांनाही उग्र वासाचा त्रास होतो. यामुळे त्या आपल्या घरातून निघून जातील.

अशी मिळवा पालींपासून सुटका

घरातील पालींपासून सुटका मिळवण्यासाठी घरातील भिंतींवर चारपाच मोरपिसे चिकटवा. मोर हे पालींना खाऊन टाकतात, त्यामुळे  त्यांची पिसे पाहून पाली घाबरतात आणि पळून जातात. या सोप्या आणि साध्या उपायांनी आपण आपल्या घरातील हे किटक घालवून देऊ शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी