Whiten Teeth: दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय, फक्त 5 मिनिटात येईल चमक

लाइफफंडा
Pooja Vichare
Updated Nov 05, 2022 | 13:58 IST

Whiten Teeth Naturally: अनेक वेळा पिवळ्या दातांमुळे तुम्हाला मोकळेपणाने हसता येत नाही. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास घरगुती उपाय घेऊन आलो आहोत. ते वापरल्यानंतर 5 मिनिटांत तुम्हाला दिसेल की तुमचे दात मोत्यासारखे चमकू लागले आहेत.

Whiten Teeth
दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय 
थोडं पण कामाचं
  • दात पांढरे (Teeth whitening) करणे कोणत्याही व्यक्तिच्या संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते.
  • पिवळ्या दातांमुळे बऱ्याचदा लाजीरवाणंही व्हावं लागतं. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात साफ केल्यानंतरच झोपावे.
  • दात व्यवस्थित साफ न केल्यास हळूहळू पिवळे पडू लागतात.

मुंबई:  Whiten Teeth Naturally: दात पांढरे (Teeth whitening) करणे कोणत्याही व्यक्तिच्या संपूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य वाढवते. पिवळ्या दातांमुळे (Yellow teeth) कधी कधी आपल्याला मोकळेपणाने हसताही येत नाही. त्याचबरोबर पिवळ्या दातांमुळे बऱ्याचदा लाजीरवाणंही व्हावं लागतं. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दात साफ केल्यानंतरच झोपावे. दात व्यवस्थित साफ न केल्यास हळूहळू पिवळे पडू लागतात. दरम्यान जास्त काळजी करण्याची गरज नाही कारण आम्ही तुमच्यासाठी सोपे घरगुती उपाय (home remedies) घेऊन आलो आहोत. 

अशा प्रकारे दात पांढरे करण्यासाठी पावडर तयार करा

जर दात पिवळे पडले असतील आणि खूप प्रयत्न करूनही पांढरेपणा येत नसेल तर तुम्ही हा खास घरगुती उपाय करून पाहू शकता. यासाठी प्रथम एक चमचा लवंग पावडर, एक चमचा काळे मीठ, एक चमचा ज्येष्ठमध पावडर, एक चमचा दालचिनी पावडर, वाळलेली कडुलिंब आणि पुदिन्याची पाने घ्या. या सर्व गोष्टी नीट मिसळून पावडर बनवा आणि नंतर एका बॉक्समध्ये ठेवा. त्यात तुम्ही मोहरीचे तेलही घालू शकता.

अधिक वाचा-  Hair Care Tips: केसांमधील कोंड्याच्या समस्येनं हैराण झालात?, मग अशा प्रकारे करा मेथीचा वापर

दात पांढरे करण्यासाठी पावडरचा करा वापर

दात पांढरे करणारी पावडर वापरण्यास अतिशय सोपी आहे. यासाठी सर्वप्रथम ही पावडर टूथब्रशमध्ये लावून दातांवर हलकी चोळा आणि नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे तुमच्या दातांची चमक परत येईल. यासोबतच तुम्ही तुमच्या दातांमधील पोकळी देखील टाळू शकाल. ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा.

या गोष्टींची विशेष काळजी घ्या

ही पावडर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी दातांवर लावा.
खाल्ल्यानंतर ते चांगले धुवावे जेणेकरुन कोणत्याही प्रकारचा थर दातांवर जमा होणार नाही.
स्वच्छ धुण्यासाठी तुम्ही कोमट पाणी आणि मीठ वापरू शकता.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी