Honeymoon Tips: हनीमूनला गेल्यावर चुकूनही करू नका 'या' 8 चुका, अन्यथा मजा ठरेल सजा

Honeymoon mistakes: लग्नानंतर हनीमून हे नव दाम्पत्यासाठी खूपच खास असते. हनीमूनला जाण्यापूर्वी अनेकजण खूप प्लानिंग करतात तर असेही काहीजण असतात ते अजिबात प्लानिंग करत नाहीत मात्र, यामुळे त्यांना नंतर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, हनीमूनचं प्लानिंग करताना कोणत्या चुका करू नयेत.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • लग्नानंतर नव दाम्पत्यासाठी हनीमून खूपच खास असतो
  • खासकरुन तुमचं अरेंज मॅरेज असेल तर हनीमून हे तुमच्या जोडीदाराला समजण्याची चांगली वेळ असते
  • मात्र, हनीमूनला जाताना काही चुका केल्यास तुमची मजा ठरू शकते सजा

Honeymoon tips: लग्नानंतर नवदाम्पत्यासाठी हनीमून हा खूपच खास असतो आणि त्यासाठी दाम्पत्य प्रचंड उत्साही असतात. प्रत्येक दाम्पत्यासाठी हनीमून आपल्या लाईफटाईममधील एक खास आठवण असते. खासकरुन तुमचं अरेंज मॅरेज असेल तर हनीमून हे तुमच्या जोडीदाराला समजण्याची चांगली वेळ असते. हनीमूनचा उत्साह इतका असतो की, लग्न होण्यापूर्वीच कुठे जायचं त्या ठिकाणचं बूकिंग करण्यात येतं. मात्र, हनीमूनचं प्लानिंग करताना अशा काही चुका होतात ज्यामुळे संपूर्ण ट्रिप फसते. (honeymoon tips in marathi never do these mistakes otherwise you may suffer)

हनीमून प्लान करताना करू नका या चुका

लग्नानंतर लगेचच हनीमूनचं प्लानिंग नको

लग्नानंतर लगेचच हनीमूनचं प्लानिंग करू नका. यामागचं कारण म्हणजे, लग्नानंतरही काही दिवस कोणते ना कोणते विधी असतात ज्यामुळे नव दाम्पत्याला थोडा थकवा सुद्धा जाणवतो. त्यामुळे सर्व परंपरा, विधी पूर्ण झाल्यानंतर दोन-तीन दिवस आराम करा आणि त्यानंतर हनीमूनला जाण्याचं प्लानिंग करा. जर तुम्ही लग्नानंतर लगेचच हनीमूनला जाल तर थोडा थकवा जाणवेल आणि परिणामी तुम्ही ते क्षण एन्जॉय करु शकणार नाही.

हे पण वाचा : गुळाचा एक तुकडा बदलेल तुमचं आयुष्य, केवळ करावा लागेल हा उपाय

सीजन पाहून बूकिंग करा

हनीमून प्लान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जात आहात त्या ठिकाणचं हवामान सुद्धा तपासून घ्या. हिवाळ्यात डोंगराळ किंवा थंड प्रदेशात जायला दाम्पत्य उत्सुक असतात. या भागात जाणे वाईट नाहीये मात्र, तेथे जाण्याचं प्लानिंग करण्यापूर्वी तेथील तापमान आणि हवामानाची माहिती नक्की घ्या.

हेल्थ गाईडलाईन्स

हनीमूनची दाम्पत्यांमध्ये खूपच क्रेझ असते. ज्या ठिकाणी बर्फवृष्टी होत असते अशा बर्फाळ प्रदेशात किंवा उंच ठिकाणी हनीमूनला अनेकजण जातात. मात्र, अशा ठिकाणी ऑक्सिजनची लेवल खूपच कमी असते. त्यामुळे अशा ठिकाणी जाण्यापूर्वी आपल्या आरोग्याची तपासणी नक्की करुन घ्या जेणेकरुन तुम्हाला आरोग्याच्या समस्या उद्भवणार नाहीत.

हे पण वाचा : या आहेत 2023 मधील लकी राशी, होईल पैशांचा वर्षाव

हॉटेलमध्ये जास्त वेळ

हनीमूनला आपल्या जोडीदारासोबत वेळ घालवणं चांगली गोष्ट आहे मात्र, तुम्हाला एका गोष्टीची काळजी घेणं आवश्यक आहे आणि ते म्हणजे हनीमून पॅकेजसाठी तुम्ही जास्त पैसे खर्च केले आहेत आणि त्यामुळे संपूर्ण वेळ हॉटेलमध्ये थांबू नका तर आपल्या जोडीदारासोबत तेथील वेगवेगळ्या ठिकाणी फिरून तिथला आनंद घ्या.

बजेटची काळजी घ्या

प्रत्येक दाम्पत्य आपल्या हनीमूनला बेस्ट बनवू इच्छितात. त्यासाठी ते आपल्या सेविंगमधील बरिच रक्कम सुद्धा खर्च करतात. हनीमून प्लान करताना नेहमी दाम्पत्य हे बजेट पाहत नाही आणि आवश्यकतेहून अधिक खर्च करतात. हनीमूनला गेल्यावर मर्यादेत खर्च करा आणि आपलं बजेट सेट करा. त्यासोबतच हॉटेल, त्या परिसरात फिरणे, शॉपिंग आणि इतर अ‍ॅक्टिव्हिटीमध्ये खर्च होणाऱ्या पैशांचा अंदाज लावून एक लिस्ट तयार करा.

हे पण वाचा : तुम्ही सुद्धा ब्रेड खाता? मग हे वाचाच, अन्यथा....

इतर अ‍ॅक्टिव्हिटीजचं प्लानिंग

प्रत्येक व्यक्ती हा हनीमून संदर्भात खूपच उत्सुक असतो. नेहमी दाम्पत्य हे सोशल मीडियात आपले फोटो, पोस्ट शेअर करण्यासाठी अ‍ॅडवेंचर अ‍ॅक्टिव्हिटी करु लागतात. मात्र, तसे करणं टाळा. आपल्या हनीमूनच्या वेळी सर्व गोष्टींचा तालमेळ ठेवा आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. या काळात आपल्या जोडीदाराला समजून घेण्याचा प्रयत्न करा. जेणेकरुन हनीमूनवरुन परत आल्यावर तुमचं नातं एक घट्ट व्हायला हवं.

लास्ट मूमेंटला पॅकिंग

अनेकांना सवय असते की, बाहेर जाण्यापूर्वी शेवटच्या मूमेंटला आपलं पॅकिंग करु लागतात. घाई-घाईत पॅकिंग करताना अनेकदा महत्त्वाच्या वस्तू विसरुन जातात किंवा उशीर होऊ नये याच्या नादात पॅनिक होतात. मात्र, हनीमून ही एक लाइफटाइम मेमरी आहे त्यामुळे तुम्हाला घाईगडबड करुन चालणार नाही. हनीमूनला जाण्यापूर्वी एक चेक लिस्ट तयार करा आणि त्यानुसार आपल्या सर्व वस्तूंचं पॅकिंग करा.

हे पण वाचा : थंडीमुळे खरंच दात खराब होऊ शकतात का? वाचा

हवामानानुसार पॅकिंग

नेहमीच लोक हनीमूनला जाण्यापूर्वी तेथील हवामान कसं असेल हे पाहत नाहीत. त्यानंतर तेथे गेल्यावर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हनीमूनला जाण्यासाठी महिला अनेकदा शॉर्ट ड्रेस, शॉर्ट कपडे आपल्यासोबत घेतात मात्र, थंड वातावरणाच्या ठिकाणी असे कपडे घेऊन जाण्याऐवजी आवश्यक असे कपडे घेऊन जा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी