Chipkali Bhagane Ka Upay : पाली आरोग्यासाठी धोकादायक (Harmful For Health) असतात. पालीची विष्ठा आणि लाळेमध्ये सल्मोनेला नावाचा बॅक्टरिया (Bacteria) असतो. ज्यामुळे फूड पॉयझनिंग (Food poisoning) होऊ शकतं. याशिवाय जेवणामध्ये पाल पडली तर, असं अन्न खाल्लास मृत्यूदेखील होऊ शकतो. त्यामुळे घरांमधून पाली घालवण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. (Chipkali run away after use this remedies)
अधिक वाचा : होळीनंतर या राशीच्या लोकांना प्रत्येक पावलावर मिळणार पैसा
तुमच्या घरात पाली जास्त आहेत का? या पालींना तुम्ही वैतागले आहात का ? चिंता करू नका आम्ही तुम्हाला काही उपाय सांगणार आहोत, ज्याचा उपयोग केल्यास घरातील पाली सहज बाहेर जातील. घरातून पाली पळवण्यासाठी अनेकांनी विविध उपाय केले असतील परंतु ते कामात आले नसतील. तर घाबरू नका आम्ही जे उपाय सांगू त्याच्या माध्यमातून तुम्ही पालीच्या समस्येपासून सहज सुटका मिळवू शकतात.
अधिक वाचा : भारतात चालणार हायड्रोजन बसेस, धुराऐवजी सोडणार पाणी
जर आपण घरगुती उपायांबद्दल सांगायचे झालं तर सर्वात भारी उपाय हा काळी मिरीचा येतो. यासाठी तुम्हाला 1 लिटर पाण्यात काळी मिरी पावडर तयार करावी लागेल, त्यानंतर तुम्हाला हे द्रावण एका स्प्रे बाटलीत भरावे लागेल आणि 1 आठवड्यापर्यंत तुम्हाला ते दररोज भिंतींवर शिंपडावे लागेल.
अधिक वाचा : 25 februvary Dinvishesh : 25 फेब्रुवारीला काय आहे दिनविशेष
कॉफी पावडर आणि तंबाखू सोबत मिसळा आणि लहान लहान गोळे बनवून पाल जिथे येते तिथे ठेवा. हे मिश्रण पालीने खाल्ले तर तिचा मृत्यू होईल, अथवा पाल लांबपर्यंत पळ काढेल.
एक स्प्रे बॉटल घ्या. त्यात कांद्याचा रस आणि पाणी भरुन घ्या. या त्या पाण्यात लसुणचा रस मिसळा. जिथे जिथे पाल येते तिथे तो रस स्प्रे करा. पालीला हा वास असह्य होतो. पाल पळ काढते.
कांदा आणि लसूण यांची पेस्ट बनवा, त्याचा रस काढा आणि पाण्यात मिसळून स्लरी बनवा आणि तुम्ही ही पेस्ट रसा एका स्प्रे बाटलीत भरून 7 दिवस भिंतीवर शिंपडावे. या उपायामुळेही पाल घरातून पळून जातात. घरातील पाली पळवून लावण्यासाठी काही कीटकनाशक देखील बनवण्यात आले आहेत. हे काही ई-कॉमर्स वेबसाइटवर उपलब्ध आहेत.