घरात सतत येणाऱ्या माश्यांनी हैराण केलंय...हा आहे रामबाण उपाय

लाइफफंडा
Updated Jul 19, 2022 | 13:49 IST | टाइम्स नाऊ मराठी

Home Remedies: घरातील माश्या दूर पळवण्यासाठी अथवा नेहमीसाठी त्यांचा खात्मा करण्यासाठी नक्की वापरून पाहा हा घरगुती उपाय

house fly
घरात सतत येणाऱ्या माश्यांनी हैराण केलंय...हा आहे रामबाण उपाय 
थोडं पण कामाचं
  • या उपायाने घरात येणार नाहीत माश्या
  • या पद्धतीने तयार करा कीटकनाशक पाणी
  • माश्या होतील गायब

मुंबई: जर तुम्ही घराच्या खिडक्या, दरवाजे उघडे ठेवत असा तर माश्या(fly) सहजपणे तुमच्या घरात पाहुण्या बनून येतात. खासकरून ज्या घरांमध्ये लहान मुले असतात तेथे दिवसातून दहा वेळा दरवाजे उघडले आणि बंद केले जातात. अशातच या माश्या बाहेरची घाण आपल्या घरात आणतात आणि आपल्याला आजारी पाडतात. जरी या आजारांचा धोका तितका वाटत नसला तरी त्या भिरभिरत असल्याने अधिकच त्रासदायक वाटतात. मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण असा एक उपाय समोर आला आहे ज्यामुळे तुमच्या घरातून माश्या दूर पळतील.How get rid of house fly 

अधिक वाचा - या चार राशीच्या लोकांचे होणार भाग्योदय आणि अकस्माक धनलाभ

माश्यांपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती उपाय

अॅपल सिडार व्हिनेगार

एका ग्लासात अॅपल सिडार व्हिनेगार घ्या. त्यात डिश सोपचे काही थेंब मिसळा. आता किचनमध्ये वापरला जाणारा प्लॅस्टिक रॅप घेऊन हे ग्लास झाका आणि ग्लासावरील प्लॅस्टिक रॅप रबरने टाईट करा. यानंतर एक टूथपिक घेऊन या प्लॅस्टिकवर काही भोके पाडा. ज्या ठिकाणी माश्या येतात त्या ठिकाणी ठेवा. जसे माश्या या ग्लासावर येतील अथवा आत जाण्याचा प्रयत्न करतील तर डिश सोपमुळे त्या बाहेर येऊ शकणार नाही आणि आतच डुबतील. 

मीठाचे पाणी

एक ग्लास पाण्यात दोन चमचे भरून मीठ मिसळा. आता हे पाणी एका स्प्रे बॉटलमध्ये भरा आणि माश्यांवर स्प्रे करा. माश्या पळवण्यासाठी चांगला उपाय आहे. 

पुदीना आणि तुळस

माश्या घालवण्यासाठी पुदीना आणि तुळशीचाही वापर करता येतो. तुम्ही या दोघांची पावडर अथवा पेस्ट बनवून पाण्यात मिसळू शकता. हे पाणी माश्यांवर स्प्रे करा. हे कीटकनाशकारसारखा परिणाम करते.

अधिक वाचा -  RBI चा 'या' सहकारी बँकेला दणका, फक्त काढता येणार इतके पैसे

दूध आणि काळी मिरी

हा उपाय करण्यासाठी एक ग्लास दुधात एक चमचा काळी मिरी आणि ३ चमचे साखर टाका. ज्या ठिकाणी या माश्या बसतात तेथे हे दूध ठेवा. माश्या याकडे आकर्षित होतील आणि लवकरच याला चिटकतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी