Hotel Booking Tips : हॉटेल बुक करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, कमी पैशात मिळतील जास्त सुविधा

हॉटेल बुक करण्याचा आणि तिथं राहण्याचा अनुभव प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला असतो. मात्र काही मूलभूत गोष्टींची काळजी घेतली तर किफायतशीर किंमतीत चांगल्यात चांगलं हॉटेल बुक करता येऊ शकतं.

Hotel Booking Tips
हॉटेल बुक करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हॉटेल बुक करताना घ्या काळजी
  • ऑनलाईन बुकिंगसाठी ॲपचा करा वापर
  • सुरक्षेची घ्या काळजी

Hotel Booking Tips : साधारणपणे आपलं शहर सोडून बाहेर गेल्यानंतर (Out of Town) लोक हॉटेलमध्ये (Hotel) राहणं पसंत करतात. कुटुंबासोबत काढलेली सहल (Family Trip) असो किंवा कुठलंही कार्यालयीन काम (Official Work) असो, हॉटेलची रुम बुक करणं (Booking Hotel Room) आणि तिथं आराम करणं हेच अनेकांना पसंत असतं. सध्या अनेकजण ऑनलाईन पद्धतीने हॉटेलचं बुकिंग करतात, तर अनेकांना आजही ऑफलाईन बुकिंग करणंच जास्त सोयीचं वाटतं. कुठल्याही पद्धतीनं बुकिंग केलं तरी काही मूलभूत गोष्टींची काळजी घेणं महत्त्वाचं असतं. अन्यथा, अनेकदा सांगितलेल्या सुविधा प्रत्यक्षात मात्र मिळतच नसल्याचं दिसतं. अनेकदा मनपसंत रुम मिळत नाही किंवा रुममध्ये ज्या सुविधा मिळणार असल्याचं आश्वासन देण्यात आलेलं असतं, त्या प्रत्यक्षात मात्र मिळतच नसल्याचा अनुभव येतो. त्यासाठीच हॉटेल बुक करताना काही गोष्टींची काळजी घेणं आणि खातरजमा करणं आवश्यक असतं. 

वेळेची घ्या काळजी

अनेकांना अज्ञानापोटी असं वाटत असतं की सकाळच्या वेळेत हॉटेलचं बुकिंग करणं स्वस्त पडतं. प्रत्यक्षात मात्र असं घडत नाही. सकाळच्या वेळात हॉटेलच्या खोल्यांची किंमत जास्त असते. त्यामुळे आयत्या वेळी बुकिंग न करता ॲडव्हान्स बुकिंग करणं गरजेचं आहे. काही दिवस अगोदर तुम्ही बुकिंग करत असाल, तर कमी किंमतीत हॉटेल उपलब्ध होऊ शकतं. 

बेडशीट बदलायला सांगा

हॉटेलमध्ये तुम्ही प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम बेडशीट बदलण्याची सूचना व्यवस्थापनाला करा. अनेक हॉटेल्समध्ये अनेक दिवस बेडशीट बदललं जात नाही. त्यामुळे आपल्या डोळ्यांदेखत नवं बेडशीट घालून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या स्वच्छतेची अर्धी चिंता दूर होते. जुन्या आणि वापरलेल्या बेडशीटपेक्षा नवं बेडसीट सुरक्षित मानलं जातं. 

अधिक वाचा - Knotting Tie Well : टाय बांधताना चुकूनही ‘हे’ करू नका, चांगला लूकही होईल खराब

ॲपची मदत घ्या

थेट हॉटेलच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बुकिंग केलंत, तर जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता असते. मात्र ॲपवर त्याच हॉटेलचे दर सवलतीत उपलब्ध असतात. त्यामुळे तुमचे बरचसे पैसे वाचण्याची शक्यता असते. हॉटेल आणि ॲप चालवणारी कंपनी यांच्यात झालेल्या करारानुसार त्या ॲपवर हॉटेलच्या रुम स्वस्तात उपलब्ध करून देण्यात आलेल्या असतात. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या कूपन कोडचाही वापर तुम्ही करू शकता आणि हॉटेलच्या दरात आणखी घसघशीत सवलती मिळवू शकता. या सर्वांचा एकत्रित विचार केला तर हॉटेलच्या वेबसाईटवरील दरापेक्षा ॲपवर पडणारा दर फारच कमी असू शकतो. 

कोपऱ्यातील खोली निवडा

कुठल्याही हॉटेलमध्ये साधारणतः कोपऱ्यातील खोल्या मोठ्या असतात. इतर खोल्यांच्या मानाने त्यांचं क्षेत्रफळ हे अधिक असतं. त्यामुळे तेवढ्यात पैशात तुम्हाला अधिक जागा वापरता येते आणि प्रशस्त रुम भाड्याने मिळते. विशेषतः तुम्ही कुुटुंबासोबत जाणार असाल, तर हा उपाय तुम्हाला दिलासादायक आणि आनंददायी ठरू शकतो. 

अधिक वाचा - Self Dependant Child : ‘या’ वयानंतर मुलांना शिकवा 5 कामं, अनेक प्रश्न सुटतील चुटकीसरशी

सुरक्षेचा करा विचार

हॉटेल निवडताना सुरक्षेचा विचार करा. आपल्या साहित्याची पूर्ण जबाबदारी घ्या आणि ते सुरक्षित राहिल, याची खातरजमा करा. खोलीत कुठे छुपे कॅमेरे नाहीत ना, याची खातरजमा करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी