फ्रेंडशिप डे सेलिब्रेशनसाठी व्हा तयार, जाणून घ्या या आयडियाज

लाइफफंडा
Updated Aug 02, 2019 | 15:09 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

फ्रेंडशिप डे हा मैत्रींचा दिवस मानला जातो. मैत्रीच्या नात्यात हा दिवस खूप महत्त्वाचा अशतो. जर तुम्ही प्लानिंग करत असाल ते जाणून घ्या आयडियाज

friendship day
फ्रेंडशिप डे 

थोडं पण कामाचं

 • या रविवारी आहे फ्रेंडशिप डे
 • फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुमच्या मित्राला द्या सरप्राईज
 • करा एखाद्या पार्टीचे प्लानिंग

मुंबई: प्रत्येक नात्याला एक सुंदर दिवस देण्यात आला आहे. याच नात्याने फ्रेंडशिप डे ही जगभरात साजरा केला जातो. मैत्री ही केवळ एकाच वयाच्या माणासाशी होते असे नाही. कोणत्याही वयाची माणसे मैत्रीच्या या नात्यात अडकू शकतात. त्यामुळे या फ्रेंडशिप डे च्या दिवशी आपल्या मित्रांप्रती असलेली आपली भावना व्यक्त करण्याची संधी सोडू नका. यामुळे तुमची मैत्री अधिक गाढ होईल. त्यासाठी फ्रेंडशिप डे शिवाय वेगळा दिवस असूच शकत नाही. यंदाच्या फ्रेंडशिप डेच्या दिवशी तुम्ही काहीतरी खास प्लानिंग करा आणि ज्यामुळे तुमच्या मित्रांना केवळ सरप्राईजच देऊ नका तर त्यांना तुमच्या मैत्रीचे महत्त्वही लक्षात येईल. 

मित्र आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग आहे. विचार करा जेव्हा तुम्ही स्कूल अथवा कॉलेजमध्ये होतात आणि तुमचा मित्र एखाद्या दिवशी आला नाही तर तुम्हाला कसे वाटायचे. यावेळी मित्र सोबत नसला की एकटेपणा आणि सुनेपणा जाणवायचा. मग विचार करा आयुष्यात मित्रच नसते तर काय होईल. यासाठी मित्रांचे महत्त्व ओळखा आणि समजून घ्या. त्यामुळे यंदाचा फ्रेंडशिप डे तुम्ही मित्रांसोबत खास साजरा करा. अशा अनेक पद्धती आहेत ज्याने तुम्ही हा दिवस खास बनवू शकता. फ्रेंडशिप डेचे प्लानिंग करण्याआधी आपले बजेट जरूर जाणून घ्या. एकदा बजेट ठरल्यानंतर तुम्ही त्या गोष्टींवर निर्णय घेऊ शकता. ज्याच्या माध्यमातून तुम्ही हा दिवस खास बनवू शकाल. 

स्लीपओवर पार्टी एक चांगली प्लानिंग असू शकते. या दिवशी तुम्ही मित्रांसोबत सिनेमा पाहा. अथवा स्वत: एक व्हिडिओ बनवा. तुम्ही पार्टी एन्जॉय करण्यासाठी स्नॅक्सही ठेवू शकता. चिप्स, वेफर्स,पॉपकॉर्न आणि सॉफ्ट ड्रिंक्स सारखे पदार्थ घरी आणून ठेवा. जर खूप जण असतील तर तुम्ही डीजेही ठेवू शकता. 

फ्रेंडशिप डे पार्टी प्लान करा

 1. एखाद्या नव्या रेस्टॉरंटमध्ये जा अथवा कपड्यांची काही थीम ठेवा.
 2. आपल्या मित्राला आवडत्या रेडिओ शोमध्ये त्याच्या आवडीचे एक गाणे समर्पित करा. 
 3. थिएटर जा. त्याच्यासाठी आपल्या हाताने काही बनवा. 
 4. आपल्या मित्रासाठी एखादे कार्ड भेट द्या
 5. त्या सगळ्या फ्रेंड्सना कॉल करा ज्यांच्याशी तुम्ही बोलला नाही आहात. 
 6. फोटोंचे एक कोलाज बनवून गिफ्ट करा
 7. ब्लॉग लिहा आणि आपल्या नेटवर्कमधील लोकांना सांगा मैत्रीचा अर्थ
 8. आपल्या मित्रांच्या फोटोसोबत एक स्नॅप बुक बनवा. 

ऑफिसमध्ये फ्रेंडशिप डे करा साजरा

आपल्या मित्र वा मैत्रिणीला लंच ब्रेकदरम्यान एखादी डिश स्वत: बनवून अथवा ऑर्डर करून खाऊ घाला. यामुळे त्याला स्पेशल असे फील येईल. फूल, ग्रिटिंग कार्ड अथवा एखादे गिफ्ट खरेदी करून सरप्राईज द्या.

कॉलेजमध्ये असा साजरा करा फ्रेंडशिप डे

 1. गिफ्ट, ग्रिटींग कार्ड आणि फ्रेंडशिप बँड कधी जुने होत नाहीत. आपल्या आवडीचा बँड त्याच्या हातात बांधा. 
 2. अनेक मित्र मिळून पार्टीचे प्लानिंग करा. 
 3. पार्टीशिवाय तुम्ही सिनेमा पाहण्याचा अथवा जवळपास फिरायला जाण्याचा प्लान करू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी