मार्केटमधील दूध-घी, मावा खरा आहे की भेसळयुक्त, घरबसल्या घ्या जाणून

लाइफफंडा
Updated Mar 16, 2021 | 15:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

दूध आणि दुधापासून बनवणाऱ्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. अशी कोणतीही उत्पादने खरेदी करण्याआधी त्यांच्या शुद्धतेचा तपास करणे गरजेचे असते. 

milk
मार्केटमधील दूध-घी, मावा खरा आहे की भेसळयुक्त, घ्या जाणून 

थोडं पण कामाचं

  • दुधापासून बनवलेली उत्पादने खरेदी करत आहात ती खरी आहेत की भेसळयुक्त तर तुम्ही घरबसल्याही हे जाणून घेऊ शकता. 
  • स्टार्च आणि वनस्पती कमी भेसळीचे असतात.
  • दुधामध्ये युरियाची भेसळ केली जाते.जर तुमच्या घरात येणाऱ्या दुधात युरियाची भेसळ केली जातआहे

मुंबई: दुधाचा वापर करता का? दूधच नव्हे तर दुधापासून बनवलेली उत्पादने आपल्या आरोग्यासाठी गरजेचे असतात. भारतीय घरांमध्ये दूध कोणत्या ना कोणत्या रूपात आहारात सामील केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते. या धंद्यामधील कमाई पाहता दूध, तूप, खवा, पनीर मध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ करून लोकांना मूर्ख बनवले जाते. 

जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की दुधापासून बनवलेली उत्पादने खरेदी करत आहात ती खरी आहेत की भेसळयुक्त तर तुम्ही घरबसल्याही हे जाणून घेऊ शकता. 

दूध आणि दुधाच्या उत्पादनांमध्ये कशी केली जाते भेसळ?

दूध आणि दुधापासून बनवलेल्या उत्पादनांममध्ये पनीर, खवा, रबडी, गोड दही इत्यादी साफ आणि शुद्ध दिसण्यासाठी अनेक पदार्थ मिसळले जातात. जसे युरिया, स्टार्च, वनस्पती, फॉर्मेलिन, सल्फ्युरिक अॅसिड, कोल तार डाय आणि ब्लॉटिंग पेपर इत्यादी. स्टार्च आणि वनस्पती कमी भेसळीचे असतात. तर तारकोल डायमधील काही घटक आपल्या मेंदूला नुकसान पोहोचवू शकतात. 

दुधामध्ये भेसळ करण्याची पद्धत

पाणी

दुधामध्ये पाणी मिसळलेले आहे की नाही याचा तपास लावण्यासाठी एका भांड्यात दुधाचा एक थेंब टाका. जर दुधाने सफेद निशाण सोडत खाली पडला तर दूध शुद्ध आहे. जर दूध कोणतेही निशाण सोडण्याआधी खाली घसरले तर यात भेसळ आहे. 

स्टार्च

दुधामध्ये स्टार्च आहे की नाही हे जाणून घेण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे आयोडिन. दुधाच्या एका थेंबात आयोडिन टाका. दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्च मिसळलेले आहे. 

युरिया

दुधामध्ये युरियाची भेसळ केली जाते.जर तुमच्या घरात येणाऱ्या दुधात युरियाची भेसळ केली जातआहे तर एका भांड्यात थोडे दूध घ्या. यात एक चमचा अरहर पावडर आणि सोयाबीन मिसळा. मिश्रण चांगले एकजीव करा. पाच मिनिटांसाठी तसेच ठेवा. यात लाल लिटमस पेपर बुडवा. कागद निळा झाल्यास यात युरियाची भेसळ आहे. 

वनस्पती

दुधामध्ये वनस्पती आहे हे शोधण्यासाठी ३ मिली दुधामध्ये हायड्रोक्लोरिक अॅसिडचे काही थेंब टाका. यात एक चमचा साखर मिसळा. दूध लाल रंगाचे झाल्यास त्यात भेसळ आहे असे समजा. 

सिंथेटिक दूध

सिंथेटिक दुधाची ओळख पटवण्याचा मार्ग म्हणजे ते बोटांवर रगडणे. याशिवाय ते गरम केल्यास याचा रंग पिवळा पडतो. 

पनीरमध्ये भेसळ कशी ओळखाल

फिजीकल टेस्ट -पनीरची शुद्धता त्याच्या मुलायमतेवरून असते. पनीरचा तुकडा हातात ठेवून तो दाबून बघा. पनीरचे तुकडे झाल्यास त्यात भेसल आहे. 
केमिकल टेस्ट - थोड्या पाण्यात पनीरचे काही तुकडे उकळून घ्या. थंड झाल्यावर यावर आयोडिनचे काही थेंब टाका. हे निळे झाल्यास यात स्टार्च मिसळले आहे. 

खवा अथवा माव्यामधील भेसळ कशी ओळखाल

स्टार्च - तुम्ही जो खवा खरेदी करत आहात तो शुद्ध आहे की भेसळयुक्त हे ओळखण्यासाठी यात स्टार्च आहे की नाही ते ओळखा. यासाठी खवा उकळून घ्या. थंड केल्यानंतर आयोडिनचे काही थेंब टाका. हे निळ्या रंगाचे झाल्यास खवा भेसळयुक्त आहे. 

तूप शुद्ध की अशुद्ध असे ओळखावे

एका छोट्या चमच्यामध्ये वितळलेले तूप घ्या. यात ५ मिलि Hcl मिसळा. जर तुपाचा रंग क्रिमसन अथवा गुलाबी झाल्यास तुपामध्ये भेसळ आहे. 

वनस्पती घी

एक चमचा तुपामध्ये Hclमिसळा. यात एक चिमूटभर साखर मिसळा. तूपाचा रंग क्रिमसन रंगाचा झाल्यास या तुपामध्ये भेसळ आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी