Chanakya Niti | चाणक्याने दिले आहे चांगले-वाईट माणसे ओळखण्याचे सूत्र, अशी करा पारख...मग यश तुमचेच !

Chanakya Niti to distinguish good and bad | आपल्या आयुष्याची बरीचशी दिशा (Direction of life) आपल्या अवतीभोवतीच्या माणसांवरच अवलंबून असते. त्यामुळे आपल्या जवळ असणारी माणसे ही नेहमीच चांगली (Good people should be around)असली पाहिजेत. मात्र त्यासाठी चांगल्या आणि वाईट माणसांची पारख करणे (Distinguishing good & bad is very difficult)खूपच आवश्यक ठरते. फसवणूक आणि संकटे यापासून बचाव करण्यासाठी माणसे ओळखण्याची कला (Art of handling people) येणे फारच महत्त्वाचे होऊन बसते.

Chanakya Niti
माणसांची पारख करण्याची चाणक्याची सूत्रे 
थोडं पण कामाचं
  • काही गुणांमुळे होते चांगल्या आणि वाईट माणसाची पारख
  • चाणक्य नितिमध्ये कौटिल्याने दिले आहे सूत्र
  • पाहा चाणक्य नितिनुसार कसे ओळखायची चांगली-वाईट माणसे

Chanakya Niti to distinguish good and bad | नवी दिल्ली : आयुष्यात इतर सर्वच महत्त्वाच्या बाबींबरोबरच माणसे ओळखता येणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. किंबहुना आपल्या आयुष्याची बरीचशी दिशा (Direction of life) आपल्या अवतीभोवतीच्या माणसांवरच अवलंबून असते. त्यामुळे आपल्या जवळ असणारी माणसे ही नेहमीच चांगली (Good people should be around)असली पाहिजेत. मात्र त्यासाठी चांगल्या आणि वाईट माणसांची पारख करणे (Distinguishing good & bad is very difficult)खूपच आवश्यक ठरते. फसवणूक आणि संकटे यापासून बचाव करण्यासाठी माणसे ओळखण्याची कला (Art of handling people) येणे फारच महत्त्वाचे होऊन बसते. जर माणसांची पारखच करता आली नाही तर आपले साधे सोपे आयुष्य हे अतिशय गुंतागुंतीचे आणि संकटमय होऊन बसते. कूटनीतीचा महामेरू असे ज्याचे वर्णन केले जाते त्या चाणक्याने (Chanakya)यासंदर्भात अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. (How to distinguish good & bad people, see the Chanakya Formula)

चाणक्य नीतिनुसार जर काही बाबींचा अंगिकार केला तर चांगल्या आणि वाईट माणसाची ओळख पटवता येते आणि त्यात कोणतीही अडचण येत नाही. अशी व्यक्ती सहजरित्या माणसांची पारख करू शकते. शिवाय वाईट माणसांपासून स्वत:चा बचावदेखील करू शकते. याचबरोबर तुम्ही चांगल्या लोकांच्या सोबतीने आपले आयुष्य सुखात आणि आनंदात जगू शकता. पाहूया चाणक्याची यासंदर्भातील सूत्रे काय आहेत.

चांगल्या किंवा वाईट माणसाची पारख-

कोणत्याही व्यक्तीची पारख करण्यासाठी त्याच्या स्वभावातील किंवा त्याच्यातील काही सवयी यांची पारख करता आली पाहिजे. यांच्या आधारेच आपल्याला हे कळते की ती व्यक्ती आपल्याला साथ देईल की आपली फसवणूक करेल.

चारित्र्य-

कोणत्याही व्यक्तीशी मैत्री करण्यापूर्वी किंवा त्याच्याशी सोबत जोडण्यापूर्वी त्याचे चारित्र्य नक्की पाहिले पाहिजे. जर त्या व्यक्तीचे चारित्र्य चांगले नसेल तर त्या व्यक्तीमुळे आपल्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात. अशा व्यक्तीपासून दूर राहण्यातच आपले हित असते.

माणुसकीचा गुण-

अशी व्यक्ती ज्यामध्ये माणुसकीचा गुण असतो आणि जो दुसऱ्यांच्या दु:खामध्ये दु:खी होतो, ज्याला इतरांच्या वेदनेने त्रास होतो, ती व्यक्ती कधीही इतरांचे वाईट चिंतत नाही. त्यामुळे माणूस जोडताना हे नक्की पाहा की त्याच्यात माणुसकी आहे की नाही.

व्यक्तीचे कर्म-

जर एखाद्या व्यक्तीचे कर्म चांगले असेल तर त्याचे विचार आणि अंतरंगदेखील चांगलेच असतात. तो माणूस प्रामाणिकपणे आणि सचोटीने पैसे कमावतो आणि शिवाय इतरांची अनेकवेळा मदतदेखील करतो. अशा व्यक्तीशी मैत्री करणे नेहमीच हितकारक असते. तर चुकीच्या मार्गाने पैसे कमावणारा व्यक्ती, आपल्या फायद्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करणारी व्यक्ती कधीही तुमचे नुकसान करू शकतो. अशा व्यक्तीपासून लांब राहिले पाहिजे.

सवयी-

खोटारडा, आळशी आणि व्यसनी असलेल्या व्यक्तीला त्याच्याच कुटुंबातील लोक गांभीर्याने घेत नाहीत. शिवाय त्याची विश्वासार्हता देखील फारच कमी असते. अशा व्यक्तींवर विश्वास ठेवल्याने किंवा त्यांच्याशी मैत्री केल्याने ती व्यक्ती तुम्हाला कधीही संकटात आणू शकते.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी