Hidden Camera in oyo : ओयो रूम किंवा लॉजच्या रूममध्ये कॅमेरा लपवून तर नाही ना ठेवला? अशा प्रकारे घ्या शोध

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये ओयो रूममध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद करण्यात आले होते. असे अश्लील व्हिडीओ शूट करून जोडप्यांना ब्लॅकमेल करणार्‍या टोळीला पोलिसांनी जेबरंदही केले होते. अशा प्रकारे अश्लील व्हिडीओ शूट करून ते पोर्नोग्राफी साईट्सवर विकण्याचे प्रकारही समोर आले होते. याच विषयावर आधारित कलयुग सिनेमाही आला होता.

hidden camera
छुपे कॅमेरे  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये ओयो रूममध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद करण्यात आले होते.
  • असे अश्लील व्हिडीओ शूट करून जोडप्यांना ब्लॅकमेल करणार्‍या टोळीला पोलिसांनी जेबरंदही केले होते.
  • ओयो हॉटेल किंवा लॉजमधील छुपे कॅमेरे शोधून काढू शकता. जाणून घेऊया याबद्दल खास टिप्स.

Oyo Hidden Camera : मुंबई : काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशच्या नोएडामध्ये ओयो रूममध्ये छुपे कॅमेरे लावून जोडप्यांचे अश्लील व्हिडीओ कॅमेर्‍यात कैद करण्यात आले होते. असे अश्लील व्हिडीओ शूट करून जोडप्यांना ब्लॅकमेल करणार्‍या टोळीला पोलिसांनी जेबरंदही केले होते. अशा प्रकारे अश्लील व्हिडीओ शूट करून ते पोर्नोग्राफी साईट्सवर विकण्याचे प्रकारही समोर आले होते. याच विषयावर आधारित कलयुग सिनेमाही आला होता. इतकेच नाही तर अनेक मॉल्स आणि कपड्यांच्या दुकानात महिलांच्या चेंजिंग रूममधेही काचांच्या मागे छुपे कॅमेरे  लावले गेल्याचे प्रकार समोर आले होते. असे असले तरी थोडी सावधानता बाळगून तुम्ही ओयो हॉटेल किंवा लॉजमधील छुपे कॅमेरे शोधून काढू शकता. जाणून घेऊया याबद्दल खास टिप्स.

अधिक वाचा :  Hair Care: या Natural हेअर पॅकने केस करा काळे, घरच्या घरी कसा बनवायचा Pack जाणून घ्या

हॉटेलची खोली तपासून घ्या

ओयो रूम किंवा लॉजमध्ये पोहोचल्यावर खोलीची चावी मिळाल्यानंतर संपूर्ण खोली तुम्ही तपासून घ्या. जिथे कॅमेरे लपून ठेवल्याची शक्यता आहे अशा ठिकाणी व्यवस्थित तपासून घ्या. खोलीतील्या सामानांवर जर तुम्हाला संशय असेल तर ते कपड्याने किंवा पडद्याने झाकून ठेवा. हॉटेलच्या कर्मचार्‍यांना सांगून हे सामान तुम्ही हटवू शकता. खोलीत आल्यानंतर नाईट लॅम्प, लॅप्स, गेट हँडल, फ्लॉवर पॉट, टेबलवर ठेवलेल्या वस्तू आणि सामान, घड्याळ, स्मोक डिटेक्टर, एसी पॉवर ऍडाप्टर, अलार्म सेन्सर आणि लँडलाईन टेलिफोन तपासून बघा. तसेच बाथरूम आणि टॉयलेटमधील काच, टूथब्रश होल्डर, खिडकी, टॉवेल होल्डर अगदी नळ सुद्धा तपासून पहा.

अधिक वाचा : Good Sleep Tips: या दिशेला पाय करुन झोपल्यास येईल शांत झोप, योग्य दिशा नसल्यास रात्रभर होईल तळमळ


फ्लॅश लाईटची मदत

जेव्हा तुम्ही कुठल्याही काचेवर फ्लॅश लाईट मारता तेव्हा त्याचे रिफ्लेक्शन दिसते. अशा वेळी खोलीतील सर्व लाईट्स बंद कराव्यात आणि मोबाईलची फ्लॅश लाईट ऑन करावी. मोबाईलची फ्लॅश लाईट मारल्यावर जिथे कॅमेरा लपवून ठेवल आहे तिथे त्या कॅमेर्‍याची लाईट ब्लिंक होताना दिसले. जिथे ही छोटीशी लाईट ब्लिंक होईल तिथे एकदा तपासून पहा.

ऍप्सचाही होईल फायदा

अँड्रॉईड प्ले स्टोअरवर अनेक ऍप्लिकेशन्स आहेत, जे तुम्ही इन्स्टॉल केल्यानंतर त्याच्या वापरातून तुम्हाला खोलीत कॅमेरे लपवले आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. 

अधिक वाचा : Diwali safety tips: फटाके फोडताना घ्या काळजी, चटका बसला तर करा हे उपाय

ब्ल्युटुथ किंवा वायफाय

अनेक कॅमेर्‍यात ब्ल्युटूथ किंवा वायफायची सुविधा असते. अशा वेळी तुम्ही मोबाईलचे ब्ल्युटूथ किंवा वायफाय ऑन करून तपासून पाहू शकता. तसेच तुम्ही फोन कॉलवरून कॅमेरा आहे की नाही हे तपासू शकता. कारण अशा वेळी कॉल दरम्यान एक वेगळाच आवाज ऐकू येतो आणि त्यामुळे तुम्ही लपलेला कॅमेरा शोधून काढू शकता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी