Rats control: ठार न मारता घरातील उंदीर लावा पळवून, करा ‘हे’ पाच उपाय

उंदरापासून त्रास होत असला, तरी त्याला न मारता त्याच्या त्रासातून सुटका व्हावी, अशी अनेकांची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण होऊ शकते. काही घरगुती उपायांनी उंदरांना न मारताही त्यांना पळवून लावता येऊ शकतं.

Rats control
ठार न मारता घरातील उंदीर लावा पळवून  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उंदरांना न मारताही पळवून लावणं शक्य
  • सोप्या उपायांनी करा घराची स्वच्छता
  • धूम ठोकून पळून जातील उंदीर

Rats Control: उंदीर (Rats) हा प्राणी कधी कुणाच्या घरात घुसेल आणि त्या घरातील छोट्या मोठ्या गोष्टी कुरतडायला सुरुवात करेल, याची खात्री नसते. अचानकपणे उंदीर एखाद्या घरात शिरतो आणि त्या घराची दूरवस्था व्हायला सुरुवात होते. उंदराला घरातून हाकलवण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र तरीही उंदीर काही घरातून निघून जात नाही. अखेर उंदराला कुठल्या ना कुठल्या प्रकारे ठार केलं जातं आणि मगच त्यापासून सुटका मिळते. मात्र अनेकांना उंदाराला (Rat killing) मारायला आवडत नाही. उंदरापासून त्रास होत असला, तरी त्याला न मारता त्याच्या त्रासातून सुटका व्हावी, अशी अनेकांची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण होऊ शकते. काही घरगुती उपायांनी उंदरांना न मारताही त्यांना पळवून लावता येऊ शकतं. जाणून घेऊया, असेच काही साधेसोपे उपाय. 

१. नेफ्थलीनच्या गोळ्या (डांबरगोळ्या)

कपड्यांचं किडे आणि किटकांपासून संरक्षण व्हावं, यासाठी आपण पांढऱ्या रंगाच्या डांबरगोळ्यांचा उपयोग करत असतो. मात्र या गोळ्यांनी उंदीरही पळून जातात. घरातील प्रत्येक कोपऱ्यात एकेक डांबराची गोळी ठेवली, तर उंदरांचा त्रास कमी होण्यास मदत होते. काही दिवसांतच या गोळ्यांच्या वासाला त्रासून ते पळून जातात. 

२. लवंग

लवंगामुळे केवळ उंदीरच नाही, तर घरातील इतरही अनेक त्रासदायक किडे आणि किटक निघून जाण्यास मदत होते. त्यासाठी लवंग एका कापडात बांधा आणि उंदीर येण्याजाण्याच्या वाटेवर ठेऊन द्या. त्यामुळे उंदीर काही दिवसांतच तुमच्या घरातून गायब होतील. 

अधिक वाचा - Typing on laptop: लॅपटॉपवर काम करून थकतात हात आणि बोटं, असं करा रिलॅक्स

३. लसणाचं पाणी

लसणाच्या वासानं उंदीर पळून जातील आणि तुमच्या घराच्या आसपासही भटकणार नाहीत. त्यासाठी एक ग्लास पाण्यात लसूण क्रश करा. उंदीर ज्या ज्या ठिकाणी येतात, तिथं हे पाणी ठेवून द्या. तुम्ही लसणाच्या पाकळ्याही घराच्या सर्व कोपऱ्यांत ठेवू शकता. 

४. कांदा

कांद्याचा येणारा वास हा उंदरांसाठी विषारी असतो आणि त्यांना तो बिलकूल सहन होत नाही. उंदीर पळवून लावण्यासाठी घरातील कोपऱ्यांमध्ये कापलेले कांदे ठेवा किंवा कांद्याचा रस काढून तो प्रत्येक कोपऱ्यात स्प्रे करा. उंदीर पळवून लावण्याचा हा एक उत्तम उपाय आहे. 

अधिक वाचा - Relationship Tips : कोणत्याही पत्नीला पतीच्या या गोष्टी आवडत नाहीत

५. लाल मिरची पावडर

लाल मिरची पाव़डरच्या वासाने माणसांनाही ठसका लागतो. त्याचप्रमाणे उंदीरही हा वास सहन करू शकत नाहीत. त्यासाठी घरात ज्या ठिकाणी उंदीर आहेत, तिथे मिरची पावडर फवारा. त्याच्या वासाने उंदीर धूम ठोकतील आणि पुन्हा परत येणार नाहीत. 

डिस्क्लेमर - घरातून उंदीर पळवून लावण्याच्या उपायांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि निरीक्षणं आहेत. याबाबत तुम्हाला काही गंभीर प्रश्न किंवा समस्या असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी