Home Tips: घरात कोळ्यांच्या जाळ्यांनी हैराण आहात तर वापरा या टिप्स

लाइफफंडा
Updated Aug 17, 2022 | 15:07 IST | टाइम्स नाऊ मराठी

Tips to remove Spider Web:साफ-स्वच्छ घरांमधील भिंतीवर लटकलेली कोळ्याची जाळी शोभा बिघडवतात. जर तुमच्या घरातही कोळ्यांची जाळी आहेत तर काही टिप्स तुमची मदत करू शकतात. 

spider web
घरात कोळ्यांच्या जाळ्यांनी हैराण आहात तर वापरा या टिप्स 
थोडं पण कामाचं
  • तुम्ही या व्हिनेगारच्या मदतीने कोळ्याच्या जाळ्यांपासून सुटका मिळू शकते.
  • लिंबू अथवा संत्र्याच्या सालीच्या मदतीने कोळ्यांची जाळी हटवता येतात.
  • कोळ्यांची जाळे हटवण्यासाठी तुम्ही निलगिरीच्या तेलाचा वापर करू शकता.

मुंबई: लोक आपले घर साफ( करण्यासाठी विविध उपाय करत असतात. फरशीवर दररोज झाडू-लादी शक्य असते. मात्र छत तसेच सीलिंगची साफसफाई दररोज करणे शक्य नसते. अशातचच अनेकदा कोळी भिंतीवर तसेच छतांवर आपले घर बवतात. कोळ्यांच्या जाळ्यांनी घर तर खूप खराब दिसते. अशातच वास्तुनुसार कोळ्यांची जाळे घरात असणे शुभ नाही. जर तुम्हीही घरात सतत येणाऱ्या कोळ्याच्या जाळ्यांनी त्रस्त आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत ज्यामुळे या त्रासापासून तुमची सुटका होईल. How to get rid of spider web

अधिक वाचा - BJP संसदीय समितीची घोषणा; दिल्लीश्वरांचा महाराष्ट्राला धक्का

सफेद व्हिनेगार

अनेक घरांमध्ये व्हिनेगारचा वापर किचनमध्ये केला जातो. तुम्ही या व्हिनेगारच्या मदतीने कोळ्याच्या जाळ्यांपासून सुटका मिळू शकते. यासाठी तुम्ही व्हिनेगार एका स्प्रे बॉटलमध्येभरा. आता हे व्हिनेगार एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. आता हे व्हिनेगार त्या ठिकाणी स्प्रे करा जेथे कोळ्यांची जाळी असतील. व्हिनेगारच्या उग्र वासाने कोळी जाळे बनवणार नाही. 

लिंबू आणि संत्र्याच्या साली

लिंबू अथवा संत्र्याच्या सालीच्या मदतीने कोळ्यांची जाळी हटवता येतात. संत्रे अथवा लिंबाला एक खास वास असतो. ज्यामुळे कोळी दूर पळतात. अशातच लिंबू अथवा संत्र्याच्या साली त्या जागी ठेवा यामुळे कोळ्यांची जाळी तयार होणार नाहीत. 

निलगिरीचे तेल

कोळ्यांची जाळे हटवण्यासाठी तुम्ही निलगिरीच्या तेलाचा वापर करू शकता. हे तेल तुम्हाला बाजारात मिळते. एका स्प्रे बॉटलमध्ये थोडेसे निलगिरीचे तेल भरून कोळ्यांची जाळी असलेल्या ठिकाणी स्प्रे करा. असे केल्याने तुम्ही कोळ्यांची जाळी कमी करू शकता. 

अधिक वाचा - आयसीसीने जाहीर केला २०२३-२७चा एफटीपी, भारत खेळणार इतके सामने

पुदीना

पुदीन्याला एक उग्र वास असतो. यामुळे तुम्ही कोळ्यांच्या जाळ्यांपासून सुटका मिळवू शकता. यासाठी तुम्हील पुदिन्याच्या पानांचे पाणी एक स्प्रे बॉटलमध्ये भरून स्प्रे करा. पाण्याशिवाय तुम्ही पुदीना ऑईलचाही वापर तुम्ही स्प्रे करू शकता. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी