Diamond fake or original : जगभरात ग्राहकांची विविध स्तरावर वेगवेगळ्याप्रमाणे फसवणूक सुरू आहे. अगदी आपण कल्पना करू शकणार नाही, अशा छोट्या मोठ्या गोष्टींतही फसवणूक केली जाते. आपली फसवणूक झाली आहे हे अनेकदा लोकांना कळत देखील नाही. आपण इथे डायमंडच्या फसवणुकीबद्दल बोलणार आहोत. डायमंड बाजारात वेगवेगळ्या किमतीमध्ये मिळतात. पण हे डायमंड असली आहे की नकली हे अनेकदा कळून येत नाही.
अधिक वाचा : Pune:डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतूक व्यवस्थेत बदल
अधिक वाचा : केडीच्या सेटवर संजय दत्त जखमी
ग्राहकाने त्याच्या समाधानासाठी रिपोर्टची पडताळणी करायला पाहिजे. रिपोर्ट ओरिजिनल आहे की नाही हे समजण्यासाठी, डायमंड ज्या लॅबमध्ये प्रमाणित करण्यात आला आहे तिथे जाऊन स्वत: तो पुनःप्रमाणित करून घ्या. आजकाल रिपोर्टमध्ये डायमंडच्या ट्रीटमेंटची कोणतीही माहिती देण्यात येत नाही.
काचेची कोटींग असलेल्या रुबी खड्याची बाजारात किंमत खूप स्वस्त आहे, मात्र त्याच्या पावतीवर ही रुबी ची ट्रीटमेंट लिहिलेली दिसत नाही. हा खडा अनट्रीटेड आहे की नाही हे रिपोर्टद्वारे समजून येत नाही. त्यामुळे ग्राहकाने स्वतः रिपोर्ट पुनः प्रमाणित करायला हवा. .