Online game habit: मुलांना ऑनलाईन गेमचं व्यसन लागतंय? सोडवण्यासाठी करा हे उपाय

अनेक मुलांना आऊटडोअर गेम खेळण्याऐवजी घरात बसून ऑनलाईन गेम खेळण्यात जास्त रस असल्याचं दिसून येतं. मात्र ऑनलाईन गेम सतत खेळत राहिल्यामुळे त्याचं व्यसन जडण्याची शक्यता असते. या गेममध्ये मानसिक गुंतवणूक प्रचंड वेगाने होते आणि वेेळेचे भान मागे पडते. त्यामुळे मुलांना ऑनलाईन गेमच्या व्यसनातून बाहेर काढणं, हे एक मोठं आव्हान पालकांसमोर असतं.

Online game habit
मुलांना ऑनलाईन गेमपासून दूर ठेवण्याचे उपाय  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • ऑनलाईन गेमचे मुलांना लागू शकते व्यसन
  • मानसिक आणि शारीरिक वाढीवरही होऊ शकतात परिणाम
  • सोप्या उपायांनी मुलांना ठेवा ऑनलाईन गेमच्या व्यसनापासून दूर

Online game habit: लहान मुलं (Children) गेमची (Game) शौकिन असतात. नव्या जमान्यात मुलांना प्रत्यक्ष मैदानावरील खेळांप्रमाणेच ऑनलाईन गेम (Online games) खेळण्याचा पर्यायही उपलब्ध असतो. विशेषतः अनेक मुलांना आऊटडोअर गेम खेळण्याऐवजी घरात बसून ऑनलाईन गेम खेळण्यात जास्त रस असल्याचं दिसून येतं. मात्र ऑनलाईन गेम सतत खेळत राहिल्यामुळे त्याचं व्यसन जडण्याची शक्यता असते. या गेममध्ये मानसिक गुंतवणूक प्रचंड वेगाने होते आणि वेेळेचे भान मागे पडते. त्यामुळे मुलांना ऑनलाईन गेमच्या व्यसनातून बाहेर काढणं, हे एक मोठं आव्हान पालकांसमोर असतं. काही सोप्या उपायांनी हे व्यसन सोडवता येऊ शकतं. 

इंटरनेटचं युग

आजचं युग हे इंटरनेटचं आहे. त्यात भारतात स्वस्तात आणि सहज इंटरनेट उपलब्ध आहे. त्यामुळे लहान मुलं लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट यासारख्या डिव्हाईसवर ऑनलाईन गेम खेळत असतात. पब-जी आणि फ्री फायर यासारखे ऑनलाईन गेम त्यामुळेच प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. मात्र ऑनलाईन गेम खेळताना आपण किती वेळ गेम खेळतो आहोत, याचं भान मुलांना राहत नाही. त्याचा मुलांच्या मानसिक वाढीवर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते. काही साध्यासोप्या उपायांनी मुलांची ही सवय सोडवता येऊ शकते. 

इलेक्ट्रॉनिक गॅजेटपासून ठेवा दूर

मुलांची ऑनलाईन गेमची सवय सोडवण्यासाठी त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. फोन, लॅपटॉप, टॅबलेट यांचा वापर किती वेळ करायचा, याची मर्यादा मुलांना ठरवून द्या आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याची सक्ती करा. ठरलेली वेळ संपल्यानंतर त्यांच्या हातातून उपकरणे काढून घ्या. जर ठऱलेल्या वेळेत उपकरणे ठेवली नाहीत, तर दुसऱ्या दिवशी त्यांना उपकरणे न देण्याची शिक्षाही तुम्ही देऊ शकता. 

अधिक वाचा - Constitution Day 2022 massages : संविधान दिनानिमित्त शुभेच्छा संदेश

बँक डिटेल्स देऊ नका

ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन असणाऱ्या मुलांना बँक डिटेल्स अजिबात देऊ नका. मुलं आईवडिलांच्या बँक खात्याचा उपयोग करून वेगवेगळ्या ऑनलाईन गेम विकत घेत राहतात. त्यामुळे या गेमचं व्यसन वाढतच जाण्याची शक्यता निर्माण होते. त्यामुळे बँक अकाऊंट आणि कार्ड्स यांची माहिती मुलांपासून दूर ठेवा. 

आऊटडोअर गेम्स

मुलांनी ऑनलाईन गेम्सच्या जाळ्यात फसू नये, असं वाटत असेल, तर पालकांनी त्यांना मैदानावरील खेळांची आवड लावणे आवश्यक आहे. त्यासाठी सुुरुवातीला पालकांनीदेखील मुलांसोबत मैदानावर जाण्याची गरज असते. मुलांना हळूहळू त्या खेळांची गोडी निर्माण होते आणि मुले एकमेकांसोबत खेळू लागतात. याचा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवरही सकारात्मक परिणाम होत असतो. 

अधिक वाचा - Tattoo Risks and Precautions: अबब! जोडप्याचा शरीरावर 98 टॅटूचा विश्वविक्रम...जाणून घ्या टॅटूशी संबंधित धोके

छंद जोपासण्याची प्रेरणा

ऑनलाईन गेम्सच्या व्यसनातून मुलांना बाहेर काढण्यासाठी त्यांना त्यांचे छंद जोपासायला प्रवृत्त करा. चित्रे काढणे, खेळणे, नवनव्या गोष्टी शिकणे यासारख्या बाबी त्यांना आवडत असतील, तर त्यात अधिकाधिक वेळ घालवण्यास प्रोत्साहन द्या. 

डिस्क्लेमर - मुलांना ऑनलाईन गेमच्या व्यसनापासून दूर ठेवण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आणि सल्ले आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर समस्या असेल, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी