How to make Curd: हिवाळ्यात दही होतं पातळ, वाचा घट्ट दह्यासाठी सोपे उपाय

उन्हाळ्यात जसं घट्ट दही लागतं तसं हिवाळ्यात लागत नाही. हिवाळ्यात लावलेलं दही सहसा पातळ होत असल्याचा अनुभव येतो. हवा थंड असणे आणि हवेतील आर्द्रता कमी असणं, ही त्यामागची मुख्य कारणे असतात. मात्र काही सोप्या घरगुती उपायांमुळे दही घट्ट लावणं शक्य होतं.

How to make Curd
दही घट्ट होण्यासाठी सोपे उपाय  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हिवाळ्यात दही होते पातळ
  • तापमान कमी असल्याने लागत नाही घट्ट दही
  • सोप्या उपायांनी मिळवू शकता उन्हाळ्याइतकेच घट्ट दही

How to make Curd: दही (Curd) हा भारतीयांच्या आहारातील एक महत्त्वाचा खाद्यपदार्थ. कुठल्याही जेवणाची चव (Taste) वाढवणारा हा पदार्थ आपल्या ताटात असावा, असं प्रत्येकालाच वाटत असतं. रोजच्या स्वयंपाकात अनेक पदार्थांमध्ये दह्याचा वापर केला जातो. घरोघरी दररोज विरजण लावलं जातं आणि दुसऱ्या दिवशी दह्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र उन्हाळ्यात जसं घट्ट दही लागतं तसं हिवाळ्यात लागत नाही. हिवाळ्यात लावलेलं दही सहसा पातळ होत असल्याचा अनुभव येतो. हवा थंड असणे आणि हवेतील आर्द्रता कमी असणं, ही त्यामागची मुख्य कारणे असतात. मात्र काही सोप्या घरगुती उपायांमुळे दही घट्ट लावणं शक्य होतं. काही घरगुती आणि सोपे उपाय करून उन्हाळ्याप्रमाणेच घट्ट आणि चविष्ट दही तुम्ही लावू शकता. जाणून घेऊया असेच काही उपाय.

गरम दुधाचा करा उपयोग

उन्हाळ्यात दही लावण्यासाठी कोमट दुधाचा उपयोग केला जातो. मात्र हिवाळ्यात विरजण लावताना त्यापेक्षा थोड्या अधिक गरम दुधाचा उपयोग करावा. त्यामुळे दही लागण्याची प्रक्रिया सोपी होते. थंडीच्या काळात कॅसरोलचा उपयोग करावा. कॅसरोलच्या भांड्यात दही लावल्यामुळे आतील उष्णता आतच राहते. ती बाहेर पडत नाही. त्यामुळे दही घट्ट लागण्यास मदत होते. 

अधिक वाचा - Mughal Food : मांसाहारीपेक्षा शाकाहारी भोजनावर मोगल सम्राटांचा होता भर

दुप्पट विरजणाचा उपयोग

उन्हाळ्यात दही लावण्यासाठी जेवढ्या विरजणाचा वापर केला जातो, त्यापेक्षा दुप्पट विरजण हिवाळ्यात वापरणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ उन्हाळ्यात जर तुम्ही एक चमचा दह्याचा वापर करत असाल, तर हिवाळ्यात किमान दोन चमचे दही विरजण म्हणून वापरा. दुधात विरजण घातल्यानंतर ते एखाद्या बंद आणि अंधाऱ्या जागेत ठेवून द्या. तुम्ही मायक्रोवेव्हमध्येसुद्धा हे ठेवू शकता. बंद जागेत दही ठेवल्यामुळे त्याचा उत्तम उपयोग होतो. नेहमीपेक्षा दुप्पट विरजणाचा उपयोग केल्यामुळे दही लागण्याच्या प्रक्रियेला कमी कष्ट पडतात. थंडीच्या काळात तापमान कमी असल्यामुळे विरजण लागण्याच्या प्रक्रियेचा नैसर्गिक वेग कमी असतो. त्यामुळे विरजणासाठी वापरण्यात येणाऱ्या दह्याचे प्रमाण वाढवले, तर दही लागण्याची प्रक्रिया अधिक जलद होऊ शकते.

अधिक वाचा - Children's Day: बालदिनानिमित्त मराठी शुभेच्छापत्रं, Wishes, Facebook आणि Whatsapp मेसेज

दह्याच्या भांड्यात गरम पाण्याचा उपयोग

ज्या भांड्यात विरजण लावायचा आहे ते भांड गरम करून त्याच्या आजूबाजूला तुम्ही कापड गुंडाळू शकता. थंडीच्या दिवसात शक्यतो दिवसाच्या वेळी विरजण लावण्याचा सल्ला दिला जातो. रात्रीच्या तुलनेत दिवसाचं तापमान जास्त असतं. एका भांड्यात गरम पाणी घेऊन त्यावर विरजण लावलेलं भांडे तुम्ही ठेवू शकता. त्यामुळे दही लागण्याची प्रक्रिया एकदम सोपी होते.

Disclaimer: हिवाळ्यात दही लावण्याचा उपायांबाबतच्या या काही सामान्यज्ञानाच्या आधारे देण्यात आलेल्या टिप्स आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी