Tulsi Plant Direction:नवी दिल्ली : तुळशीचे एरवी परंपरातगत मोठे महत्त्व आहे. तुळशीला (Tulsi) पवित्र आणि पूजनीय मानली जाते. तुळशीची पूजा त्यामुळेच खास मानली जाते. प्रत्येक घरात तुळस लावली जाते. याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात तुळशीच्या रोपाची नित्य पूजा केली जाते आणि सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावला जातो. असे केल्यानंतर लक्ष्मी तेथे वास करते. घरात सुबत्ता, आर्थिक भरभराट होते. वास्तुशास्त्रात (Vastushastra) दिशा आणि स्थान यावर भर देण्यात आला आहे. घरात ठेवलेली कोणतीही वस्तू योग्य दिशेने आणि योग्य ठिकाणी ठेवल्यासच त्याचे सकारात्मक परिणाम मिळतात. तुळस कशी आणि कोठे ठेवावी यासाठी वास्तुशास्त्रात तुळशीचे रोप ठेवण्यासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत. असे केल्याने आर्थिक प्रगती होते आणि पैशांची कमतरता भासत नाही. (How to plant Tulsi to get financial growth as per Vastushastra)
अधिक वाचा : Winter Health Tips: हिवाळ्यात टाचांना तडे का जातात? ही असतात महत्त्वाची कारणे...अशी घ्या काळजी
- वास्तूशास्त्रामध्ये असे म्हटले आहे की, तुळशीचे रोप कधीही घराच्या छतावर ठेवू नये. असे केल्यास त्याचे अशूभ परिणाम होतात.
ज्योतिष शास्त्रानुसार काही लोकांच्या कुंडलीत बुध ग्रह संपत्तीशी संबंधित असतो. या राशीच्या लोकांनी तुळशीचे रोपे छतावर लावल्यावर त्यांना आर्थिक संकटाला तोंड द्यावे लागते.
अधिक वाचा : किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 219 धावांवर गारद
याशिवाय असंही म्हटलं जातं की घराच्या छतावर तुळशीचं रोप ठेवलं तर घराच्या उत्तर दिशेला मुंग्या बाहेर येऊ लागतात.
- वास्तुशास्त्रानुसार तुळशीचे रोप पूर्व दिशेला ठेवू नये. असे केल्याने व्यक्तीचे व्यवसायात नुकसान होते. याचे अशूभ परिणाम होतात.
दक्षिण किंवा दक्षिण पश्चिमेला तुळस नको
अशी तुळस लावा
- घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावल्या त्याचे चांगले परिणाम पाहायला मिळतात. याशिवाय ईशान्येला घरात सुख-सुबत्ता नांदते.
तुळशीचे गुरूवारी लावले जाते. रोप लावले जाते. तर तुळशीचे रोप शनिवारी लावल्यास आर्थिक संकटे दूर होतात.
पूजेसाठी आणि औषधी गुणधर्मासाठी तुळशीचे महत्त्व (Importance of Tulsi) मोठे आहे. आपल्याकडे तर तुळशीची वनस्पती अत्यंत भाग्यवान मानली जाते. म्हणूनच जवळपास सर्वच घरांच्या समोर किंवा अंगणात किमान एक तुळशीचे (Tulsi)रोप नक्कीच असते. तुळशीमध्ये लक्ष्मीचा निवास असतो अशी मान्यता आहे. तुळशीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचीही कृपा राहते असे मानतात.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही. तपशीलवार आणि अधिक माहितीसाठी, कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्या. मजकूर संकलित माहितीच्या आधारे तयार केला आहे. टाइम्स नाऊ मराठी कोणतीही अंधश्रद्धा पसरवू इच्छीत नाही, पण ज्यांचा या सर्व गोष्टींवर विश्वास आहे ते प्रयोग करावा की नाही याचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहेत. टाइम्स नाऊ मराठी या माहितीची जबाबदारी घेत नाही.)