How to raise happy children: मुलांचं आयुष्य करा आनंदी, कधीच होणार नाहीत भितीची शिकार

मुलांचं पालनपोषण करण्यासोबतच त्यांचा मानसिक विकास करणं आणि त्यांना स्वावलंबी करण्याचं काम पालक करत असतात. मात्र पालकांव्यतिरिक्त मुलांचंही एक जग असतं, जिथं पालक प्रत्यक्ष पोहोचू शकत नाहीत. आयुष्याती काही प्रसंगांचा सामना मुलांना एकट्याने करावा लागतो. अशा स्थितीत पालकांचा सपोर्ट असेल आणि मुलांना विचार करण्याची योग्य पद्धत शिकवण्यात आली असेल, तर त्यांना काहीही अडचणी येत नाहीत.

How to raise happy children
मुलांमधून अशी काढून टाकायची भिती  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • मुलांना आनंदी आणि बिनधास्त करण्याचं पालकांसमोर आव्हान
  • कृतीतून दिलेला संदेश मुलांपर्यंत पोहोचतो थेट
  • पालकांनी मुलांचे ‘रोल मॉडेल’ होणं गरजेचं

How to raise happy children: आपलं मूल (Child) आनंदी राहावं आणि आयुष्यभर समाधानी असावं, असं प्रत्येक पालकालाच वाटत असतं. मुलांचं सुखी आयुष्य हेच प्रत्येक पालकाचं समाधान असतं. समाधानी आणि स्वावलंबी मुलं ही जगातील अनेक आव्हानांचा सामना करण्यासाठी तयार असतात. मुलांचं पालनपोषण करण्यासोबतच त्यांचा मानसिक विकास करणं आणि त्यांना स्वावलंबी करण्याचं काम पालक करत असतात. मात्र पालकांव्यतिरिक्त मुलांचंही एक जग असतं, जिथं पालक प्रत्यक्ष पोहोचू शकत नाहीत. आयुष्याती काही प्रसंगांचा सामना मुलांना एकट्याने करावा लागतो. अशा स्थितीत पालकांचा सपोर्ट असेल आणि मुलांना विचार करण्याची योग्य पद्धत शिकवण्यात आली असेल, तर त्यांना काहीही अडचणी येत नाहीत. आयुष्यात कधीही निराश न होण्यासाठी आणि आलेल्या प्रत्येक संकटाचा योग्य प्रकारे सामना करण्यासाठी पालकच आपल्या मुलांना योग्य ते प्रशिक्षण देऊ शकतात. 

मुलांना आनंदी ठेवण्याचा उपाय

मुलांना जर कठीण प्रसंगांचा सामना करण्याची सवय लावली आणि आव्हानात्मक परिस्थितीला धीराने तोंड देण्याचे धडे दिले, तर अशी मुलं आयुष्यभर आनंदी राहत असल्याचं संशोधनातून दिसून आलं आहे. संकटापासून पळ काढणारी माणसं ही नेहमी घाबरलेली, तणावग्रस्त आणि निराश राहत असल्याचंही दिसून आलं आहे. जाणून घेऊया, मुलांना आयुष्यात आनंदी राहता यावं, यासाठी काय करता येऊ शकतं. 

बॉंडिग बनवा

आपल्या मुलांच्या आयुष्यात काय सुरू आहे, याची पूर्ण कल्पना आईवडिलांना असणं आवश्यक आहे. यासाठी त्यांच्यात मुक्त संवाद असण्याची गरज असते. मुलांनी त्यांच्या आयुष्यातील प्रसंग मोकळेपणाने आपल्याशी शेअर करावेत, असं जर पालकांना वाटत असेल, तर मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित कऱण्याची जबाबदारी पालकांची असते. असं करण्यामुळे मुलांवरील ताण कमी होईल आणि त्यांच्या आयुष्यातील त्यांना मोठ्या वाटणाऱ्या अडचणी ते तुमच्याशी शेअर करू शकतील. 

अधिक वाचा - Vastu Tips: तुमच्या घरात पाल फिरते का? मग तुम्हाला मिळू शकते आनंदाची बातमी

रोल मॉडेल बना

तुमच्या मुलानं त्याच्या आयुष्यात जसं व्हावं, असं तुम्हाला वाटतं, तुम्हीदेखील तसेच असणं आवश्यक आहे. आयुष्यात सकारात्मक विचार करणे, मेडिटेशन कऱणे, अभ्यास करणे, संगीत, खेळ यांचा आनंद घेणे आवश्यक आहे. यामुळे तुमची मुलंही मोटिव्हेट होतील आणि आनंदी राहू शकतील. 

कृतज्ञता

कधी कधी पालकांनीदेखील मुलांचे आभार मानायला शिकलं पाहिजे. कृतज्ञता ही लादण्याची गोष्ट नसते. इतरांचं पाहूनच मुलं कृतज्ञता व्यक्त करायला शिकत असतात. त्यामुळे पालकांनी  स्वतःपासून त्याची सुरुवात करणं आवश्यक आहे. 

अधिक वाचा - Face Massage Tips: चेहऱ्याच्या मसाजसाठी वापरा 'या' पाच प्रकारचे तेल, मिळेल Natural Glow

मुलांना आनंदी करण्याचा ‘प्रयत्न’ नको

अनेक पालक मुलांना भेटवस्तू, चॉकलेट, गोळ्या अशा काही वस्तू देऊन खूश कऱण्याचा प्रयत्न करतात. मात्र हा आनंद चिरकाल टिकणारा नसतो. त्याऐवजी सकारात्मक विचार, त्यांना वेळ देणं, त्यांच्याशी खेळणं यासारख्या उपायांनी तुम्ही मुलांना आनंदी ठेवू शकता. 

डिस्क्लेमर - मुलांना आनंदी ठेवण्याबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही समस्या वा प्रश्न असतील, तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी