Happy New Year 2022: आपल्या मित्रांना कसे पाठवाल नववर्षाच्या शुभेच्छा देणारे स्टिकर्स आणि जीआयएफ

how to send stickers and gifs । सरत्या वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून चालू होणाऱ्या नववर्षाकडून सर्वांच्याच खूप अपेक्षा आहेत आणि त्याच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत. यासाठी सर्वजण मित्रमैत्रिणींना शुभेच्छा पाठवतात.

how to send stickers and gifs of new year 2022 best wishes to friends in marathi
तयार करा नववर्षाच्या शुभेच्छा देणारे स्टिकर्स आणि जीआयएफ 
थोडं पण कामाचं
 • व्हॉट्सअॅपने याआधीच तयार केले आहेत नववर्षासाठीचे स्टिकर्स
 • मात्र गूगल प्ले स्टोअरवरून आपण मिळवू शकता काही क्रिएटिव्ह स्टिकर्स
 • आगळ्यावेगळ्या जीआयएफ पाठवूनही मित्रमैत्रिणींना देऊ शकता शुभेच्छा

Whatsapp stickers and gifs ।  मुंबई : 31 डिसेंबर हा सरत्या वर्षाचा (Outgoing year) हा शेवटचा दिवस (last day) आहे. हे वर्ष सर्वच जगासाठी (world) अतिशय खडतर (tough) आणि निराशाजनक (frustrating) असे गेले असल्याने उद्यापासून चालू होणाऱ्या नववर्षाकडून (new year) सर्वांच्याच खूप अपेक्षा (expectations) आहेत आणि त्याच्या स्वागतासाठी (welcome) सर्वजण उत्सुक (enthusiastic) आहेत. वर्षानुवर्षे नववर्षाचे स्वागत करण्यासाठी एकमेकांना शुभेच्छा (best wishes) देण्याची पद्धत (custom) आहे.

काळानुसार बदलते आहे नववर्षाच्या शुभेच्छा देण्याची पद्धत


काळानुसार आणि बदलत्या तंत्रज्ञानानुसार ही पद्धतही बदलते आहे. पूर्वी एकमेकांना पत्रे लिहून शुभेच्छा दिल्या जायच्या, मात्र आता व्हॉट्सअॅपद्वारे किंवा इंटरनेटच्या माध्यमातून सर्वजण मित्रमैत्रिणींना शुभेच्छा पाठवतात. अनेकदा लिखित किंवा शाब्दिक शुभेच्छा देण्याऐवजी चित्रे किंवा स्टिकर किंवा जीआयएफसारखे आधुनिक आणि कलात्मक मार्गही निवडले जातात. आणि सध्याच्या तंत्रज्ञानाचे वर्चस्व असलेल्या युगात यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

कसे पाठवाल मित्रमैत्रिणींना नववर्षाच्या शुभेच्छांचे स्टिकर

 1. यासाठी आपल्याला सर्वात आधी गूगल प्ले स्टोअरवर जावे लागेल
 2. आणि New Year 2022 Stickers for WhatsApp असे टाईप करावे लागेल.
 3. अॅप स्टोअरवर नव्या वर्षासाठीचे अनेक नवे स्टिकर्स आपल्याला बघायला मिळतील.
 4. आपल्या आवडीनुसार आपण कोणताही स्टिकर निवडू शकता.
 5. यानंतर आपल्याला ‘Happy New Year 2022 Sticker’ अॅप डाऊनलोड करावे लागेल. यानंतर आपल्याला सगळे स्टिकरचे पॅक उघडता येतील
 6. त्यातले आपल्या पसंतीचे स्टिकर आपल्याला निवडता येईल.
 7. हे स्टिकर आपल्या मित्रांना पाठवण्यासाठी आपल्याला ‘Add to WhatsAppवर क्लिक करावे लागेल ज्यामुळे आपण हे स्टिकर कोणालाही सहज पाठवू शकाल.
 8. हा स्टिकरपॅक व्हॉट्सअॅपला अॅड करण्यासाठी आपल्याला कमीतकमी तीन स्टिकर्स क्रिएट करावे लागतील.  


कसे पाठवाल नववर्षासाठीचे जीआयएफ

जर आपण नववर्षासाठीच्या स्टिकर्सनी संतुष्ट नसाल तर आपण आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला काही मजेदार आणि सुंदर जीआयएफ पाठवू शकता.

 1. आपल्याला फक्त giphy.com या संकेतस्थळावर जावे लागेल.
 2. इथे आपल्याला नववर्षासाठीचे अनेक जीआयएफ मिळतील.
 3. हे जीआयएफ मित्रमैत्रिणींना पाठवण्यासाठी आपल्याला त्यातील एकाची निवड करावी लागेल
 4. नंतर त्याची लिंक कॉपी करण्यासाठी कॉपी लिंकवर क्लिक करावे लागेल.
 5. हे झाल्यानंतर ही लिंक आपण आपल्या व्हॉट्सअॅप चॅटवर पेस्ट करू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी