Right way of shake hand: हस्तांदोलन करण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा सविस्तर

अनोळखी लोकांपासून ते रोजच्या सहकार्यांपर्यंत अनेकांशी आपण वेळोवेळी हस्तांदोलन करत असतो. आपल्या हस्तांदोलन करण्याच्या पद्धतीचा समोरील व्यक्तीवर चांगला किंवा वाईट प्रभाव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या पडत असतो. तुम्ही जर योग्य प्रकारे हस्तांदोलन केलं, तर तुमच्याविषयी एखाद्या व्यक्तीचं मत उत्तम होऊ शकतं.

Right way of shake hand
हस्तांदोलन करण्याची योग्य पद्धत कोणती?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • हस्तांदोलन करणं हा रोजच्या जगण्याचाच एक भाग
  • हस्तांदोलन करण्याच्या पद्धतीमुळे निर्माण होते फर्स्ट इंप्रेशन
  • योग्य प्रकारे हस्तांदोलन केल्याने होतात अनेक फायदे

Right way of shake hand: भेटल्यानंतर एकमेकांना हाय-हॅलो करणे आणि शेकहँड करणे (Shaking hands) ही आता रुळलेली आणि सर्वमान्य पद्धत आहे. एकमेकांना भेटल्यानंतर तुमची देहबोली कशी असते आणि मुख्य म्हणजे तुम्ही कसे शेकहँड करता, यावरून तुमच्या व्यक्तीमत्त्वाची छाप पडत असते. चुकीच्या पद्धतीने केलेल्या शेकहँडमुळे तुमचं फर्स्ट इंप्रेशनच खराब होऊ शकतं. अनोळखी लोकांपासून ते रोजच्या सहकार्यांपर्यंत अनेकांशी आपण वेळोवेळी हस्तांदोलन करत असतो. आपल्या हस्तांदोलन करण्याच्या पद्धतीचा समोरील व्यक्तीवर चांगला किंवा वाईट प्रभाव प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या पडत असतो. तुम्ही जर योग्य प्रकारे हस्तांदोलन केलं, तर तुमच्याविषयी एखाद्या व्यक्तीचं मत उत्तम होऊ शकतं. जाणून घेऊया, हस्तांदोलन करण्याची योग्य पद्धत कुठली आणि काय काळजी घ्यायला हवी. 

१. हस्तांदोलन करताना तुमचा हात सरळ ठेवा. कधीही हस्तांदोलनासाठी उलट्या हाताचा वापर करू नका. 

२. जर हस्तांदोलन करण्याचा तुमचा विचार असेल, तर तुमचा हात रिकामा असेल, याची खातरजमा करा. जर तुम्ही हातात काही पकडलं असेल, तर ते दुसऱ्या हातात घ्या आणि रिकाम्या हातानेच हस्तांदोलन करा. 

३. हस्तांदोलन करताना तुमचा हात घाणेरडा किंवा चिकट नसेल, याची काळजी घ्या. उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या पार्टीत असाल आणि तुमच्या हातात तुम्ही कोल्ड्रिंकचा ग्लास पकडला असेल, तर त्यामुळे तुमचा हात थंड आणि चिकट झालेला असू शकतो. या हाताने तुम्ही कुणालाही शेकहँड करणं टाळण्याची गरज आहे. 

अधिक वाचा - Fruit Personality Test: तुमचे आवडते फळ सांगते तुमच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही... पाहा कसे

४. शेकहँड करताना तुमचे दोन्ही हात दिसणं आवश्यक आहे. एका हाताने शेकहँड करताना दुसरा हात लपवू नका. उदाहरणार्थ अनेकांना शेकहँड करताना दुसरा हात खिशात घालण्याची सवय असते. याचा नकारात्मक परिणाम समोरच्या व्यक्तीवर होत असतो. 

५. बसून शेकहँड करू नका. हस्तांदोलन करण्यापूर्वी उभं राहणं आवश्यक आहे. तुम्ही जर बसलेल्या अवस्थेत असाल, तर शेकहँड करताना उठून उभे राहा. 

६. शेकहँड करताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून पाहा. चेहऱ्यावर हसूदेखील असू द्या. याचा अर्थ हसण्याचं नाटक करू नका. तुमचा चेहरा प्रसन्न असेल, याची काळजी घ्या. शिवाय समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यातील रंग दिसेल, इतपतच तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहिलं पाहिजे. 

७. शेकहँड करताना तुमचं शरीर सरळ असेल, याची खात्री बाळगा. ताठ उभे राहा आणि शेकहँड करा. 

अधिक वाचा - Emotional Detachment: मुलांचं आयुष्य बरबाद करते ‘इमोनशल डिटॅचमेंट’, वाचा सविस्तर

८. जेव्हा तुम्ही शेकहँड करण्यासाठी हात पुढे करता, तेव्हा तुमचा पायदेखील पुढे जायला हवा. तुमचा पुढचा पाय मागच्या पायापेक्षा 2 इंच पुढे असेल आणि गुडघ्यातून काहीसा वाकलेला असेल. 

९. हात पुढे करताना तुमचा हात सरळ असावा, अंगठा वर असावा आणि सर्व बोटं एकमेकांना चिकटलेली असावीत. 

१०. समोरच्या व्यक्तीच्या हाताला पूर्ण स्पर्श झाल्याशिवाय शेकहँडमधून बाहेर पडू नका. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी