तुमचे नाते इतरांसाठी उदाहरण आहे का? या गोष्टींवरून घ्या जाणून

लाइफफंडा
Updated Jun 29, 2020 | 18:17 IST | टाइम्स नाऊ मराठी

सध्याच्या दिवसांमध्ये रिलेशनशिपमधील विविध त्रुटी समोर येत आहे. तुमचे नाते इतके मजबूत असले पाहिजे की ते दुसऱ्यांसाठी मोठे उदाहरण ठरले पाहिजे. 

couple
तुमचे नाते इतरांसाठी उदाहरण आहे का?  

थोडं पण कामाचं

  • चांगल्या नात्याची अशी काही निशाण आहेत ज्यामुळे तुमचे नाते इतरांपेक्षा वेगळे ठरते
  • खुलेपणाने एकमेकांशी बोलणे आणि एक दुसऱ्याला स्पेश देणे नाते आणखीन मजबूत करते. 
  • भांडणाकडे दुर्लक्ष केल्याने नात्यामध्ये प्रेम कायम राहते

मुंबई: आपल्या सगळ्यांना असे वाटते की आपले नाते चांगले असावे. चांगले नाते निर्माण होण्यासाठी वेळ आणि प्रयत्न दोन्हींची गरज असते. अनेकदा हे काम करते मात्र काही वेळा चांगले नाते आपल्या हातातून निसटते. मात्र एकदा जर नात्याची गाडी रुळावर आली की नाते सांभाळणे सोपे होऊन जाते. तसेच तुमचे नाते हे इतरांसाठी उदाहरण बनते. 

कोणत्या गोष्टी चांगले नाते बनवण्यासाठी मदत करतात(good relationship)

  1. खुलेपणाने एकमेकांशी बोला - कोणत्याही नात्यात खुलेपणाने चर्चा करणे महत्त्वाचे आहे. चांगल्या नात्यासाठी आपल्या पार्टनरसोबत खुलेपणाने बोला. गोष्टी लपवू नका यामुळे विश्वास संपतो. यात घर, ऑफिस सगळं सामील असलं पाहिजे. 
  2. एकमेकांना स्पेस द्या - नात्यात जिथे अंतर कमी असले पाहिजे तिथे एकमेकांना स्पेस देणेही गरजेचे असते. ज्यामुळे नाते मजबूत होते. जिथे तुम्ही अनेक कामे एकत्र करत असाल तर एकमेकांना स्वत:च्या मनासारखे करण्यासाठी थोडी सूट मिळेल. 
  1. दुसऱ्याच्या मताचा आदर करा - अनेकदा काही निर्णयांवर तुमचे एकमत असेल मात्र प्रत्येकवेळेला एकमत होईलच असे नाही. एकमेकांचे मत शांतपणे ऐका आणि त्यातून मार्ग काढा. यासाठी काही वेळ लागेल. यामुळे तुम्ही दोघे एकमेकांच्या गोष्टी चांगल्या तर्हेने समजून घेऊ शकता. 
  2. एकमेकांच्या उणिवा ओळखा आणि स्वीकार करा - परफेक्ट पार्टनर प्रत्येकाला हवा असतो मात्र असा पार्टनर मिळण कठीण असते. याशिवाय आपल्या पार्टनरमधील उणिव ओळखा आणि त्याचा स्वीकार करा. यामुळे त्रासही कमी होईल आणि अॅडजस्टमेंट होईळ. 
  3. विश्वास ठेवा आणि इज्जत द्या - चांगले नाते हे नेहमी विश्वास आणि एकमेकांना मान दिल्यावर निर्माण होते.  कितीही राग आला अथवा कितीही मोठे भांडण झाले तरी एकमेकांना अपशब्द बोलू नका आणि आपल्या पार्टनरबाबत वाईट बोलू नका. 
  4. अनेकदा भांडणादरम्यान आपण रागाच्या भरात पार्टनरला म्हणतो की, यात तुमची चूक झाली किंवा तुझ्यासोबत लग्न करून मी खूप मोठी चूक केली. भांडणात कपल एकमेकांना दोष देतात. यावेळी एकमेकांना दोष देण्यापेक्षा समजून घ्या.    जोडपं एकमेकांना जबाबदार धरतात. अशात गरजेचं आहे की, आपण कितीही रागात असाल मात्र एकमेकांवर आरोप लावू नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी