How twins born: कशी जन्माला येतात जुळी मुलं? केरळच्या गावची गोष्ट वाचलीत का?

जगभरात जुळ्या मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण 33 टक्क्यांनी वाढले आहे. दर हजार मुलांच्या जन्मामागे १२ जुळी मलं जन्म घेत असल्याचं त्यातून दिसून येत आहे. केवळ भारताचा विचार केला तर गेल्या काही वर्षात जुळ्या मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. IVF सारखं आधुनिक तंत्रज्ञान हेदेखील त्यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जातं.

How twins born
कशी जन्माला येतात जुळी मुलं?  |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • जुळी मुलं जन्माला येण्याचे प्रमाण वाढत चालल्याची नोंद
  • अनुवांशिकता हे जुळ्यांच्या जन्मामागचं प्रमुख कारण
  • केरळमधील एका गावात बहुतांश मुले जुळी

How twins born: रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) नुकतीच आई झाली. तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. ईशा अंबानी ने आपल्या मुलाचे नाव कृष्णा तर मुलीचे नाव आदिया असे ठेवले आहे. ईशा अंबानी स्वतः जुळी आहे आणि तिला आता जुळी मुले झाली आहेत. जुळ्या मुलांचा जन्म होण्याचा ट्रेन गेल्या अनेक वर्षांपासून जगभरातील अनेक देशांमध्ये दिसून येतो. 2021 आली जुळ्या मुलांबाबत आलेल्या पहिल्या आणि एकमेव अभ्यासातून अनेक नव्या आणि आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. या अभ्यासानुसार जगभरात जुळ्या मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण 33 टक्क्यांनी वाढले आहे. दर हजार मुलांच्या जन्मामागे १२ जुळी मलं जन्म घेत असल्याचं त्यातून दिसून येत आहे. केवळ भारताचा विचार केला तर गेल्या काही वर्षात जुळ्या मुलांचा जन्म होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. IVF सारखं आधुनिक तंत्रज्ञान हेदेखील त्यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं जातं.

कशी होतात जुळी मुलं?

जुळी मुलं कशी होतात, असा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. डॉक्टरांनी यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार, जुळी मुलं होण्याच्या प्रक्रियेला वैद्यकीय भाषेत मल्टीपल प्रेग्नन्सी असं म्हटलं जातं. याचा अर्थ महिलेच्या पोटात एकापेक्षा अधिक बाळं असणे. त्यात पुन्हा दोन प्रकार असतात. एकाच स्पर्मपासून तयार झालेले दोन गर्भ आणि दोन वेगवेगळ्या स्पर्मपासून तयार झालेले गर्भ. यापैकी कुठल्याही प्रकारामुळे जुळे मूल होऊ शकते. 

अधिक वाचा - Relationship Tips: मुलांच्या ‘या’ पाच गोष्टींवर फिदा होतात मुली, विज्ञानानेही दिला दुजोरा

अनुवांशिकता

जर एखाद्या महिलेच्या कुटुंबात जुळी मुलं होण्याची परंपरा असेल, तर त्या अनुवांशिकतेचा परिणामही जुळी मुलं होण्यात होत असतो. बहुतांश जुळी मुलं ही अनुवांशिकता असणाऱ्या महिलांच्या पोटीच जन्माला येत असतात. एकाच अंडकोशातून जेव्हा दोन्ही बाळांचा जन्म होतो, तेव्हा त्यांना आयडेंटिकल मुलं असं म्हटलं जातं. अर्थात, अशा प्रकारच्या डिलिव्हरींची संख्या अत्यंत कमी असते. अशा प्रकारे जन्माला आलेली जुळं मुलं ही दिसायला अगदी एकसारखी असतात. 

सर्वाधिक जुळी मुलं कुठे?

ह्युमन रिप्रॉडक्शन रिपोर्ट 2021 नुसार, वैज्ञानिकांनी 2010 ते 2015 या कालावधीत विविध 165 जुळ्या मुलांचा अभ्यास केला. तुलना करण्यासाठी 1980-85 या कालावधीतील मुलांचा विचार करण्यात आला. त्यातील निरीक्षणानुसार उत्तर अमेरिका भागात जुळी मुलं होण्याचं सर्वाधिक प्रमाण असल्याचं दिसून आलं. 

अधिक वाचा - Mental impact of lay off: नोकरी जाणं मानसिक आरोग्यासाठी घातक, टेन्शन घेण्याऐवजी करा ‘हे’ उपाय

केरळमधील जुळ्यांसाठी प्रसिद्ध गाव

एका रिपोर्टनुसार केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात कोडिन्ही या गावात जन्माला येणारी बहुतांश मुलं ही जुळी असतात. 2008 साली या गावात जन्माला आलेल्या मुलांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी हा आकडा होता 280. त्यानंतर दरवर्षी हा आकडा वाढतच गेल्याचं दिसून आलं आहे. या गावात दर 1000 मुलांमागे 42 जुळी मुलं जन्माला येतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी