Chanakya Niti: पतीने पत्नीला या गोष्टी कधीही सांगू नयेत, जाणून घ्या काय म्हणते चाणक्य नीति

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Jun 23, 2022 | 11:31 IST

आचार्य चाणक्य (Chanakya) हे महान विद्वान (scholar) असण्यासोबतच एक चांगले शिक्षक देखील मानले जातात. आचार्य चाणक्य यांनी जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि तेथील आचार्य पदावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले होते. ते केवळ एक कुशल मुत्सद्दीच नव्हते तर एक उत्तम रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते.

Chanakya Niti: Husband should not tell wife what to say
Chanakya Niti: नवऱ्यानं बायकोला काय सांगावं काय सांगू नये  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात पैसा, आरोग्य, व्यवसाय, वैवाहिक जीवन, समाज, जीवनातील यश या सर्व गोष्टींवर आपले मत मांडले आहे.
  • पतीने पत्नीला झालेल्या अपमानाबद्दल कधीही सांगू नये.
  • पतीने सर्व गोष्टी पत्नीला सांगितले तर भविष्यात त्याला वादाला सामोरे जावे लागते.

Chanakya Niti: आचार्य चाणक्य (Chanakya) हे महान विद्वान (scholar) असण्यासोबतच एक चांगले शिक्षक देखील मानले जातात. आचार्य चाणक्य यांनी जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून शिक्षण घेतले आणि तेथील आचार्य पदावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले होते. ते केवळ एक कुशल मुत्सद्दीच नव्हते तर एक उत्तम रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते. आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात विचित्र परिस्थितींचा सामना केला होता, परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि त्यांचे ध्येय साध्य केले.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात पैसा, आरोग्य, व्यवसाय, वैवाहिक जीवन, समाज, जीवनातील यश या सर्व गोष्टींवर आपले मत मांडले आहे. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात आचार्य चाणक्य यांच्या वचनांचे पालन केले तर तो जीवनात कधीही चूक करणार नाही आणि यशस्वी पदावर पोहोचू शकतो. चाणक्य नीतीने स्त्री-पुरुष संबंध तसेच त्यांच्या गुणांबद्दल काही नियम सांगितले आहेत. पती-पत्नी एकमेकांना पूरक असतात असं म्हटलं जातं. दोघेही सुख-दुःखाचे सोबती असतात तरीही आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्या कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत. तुम्हीही या गोष्टी तुमच्या पत्नीपासून लपवून ठेवाव्यात, अन्यथा तुम्हाला भविष्यात अडचणीचा सामना करावा लागू शकतो.  चला जाणून घेऊया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या पतीने पत्नीला सांगू नयेत.

Read Also : मनसेचे नगरसेवक फोडणाऱ्या शिवसेनेला आठवले राज ठाकरेंचे शब्द

अपमान झालेला सांगू नये 

आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात पतीने पत्नीला झालेल्या अपमानाबद्दल कधीही सांगू नये, असा उल्लेख आहे. महिलांबाबत असा समज आहे की, त्यांना याची माहिती मिळाल्यास त्या या अपमानाचा टोला मारत राहतात.  

गुप्तपणे देणगी द्या

आचार्य चाणक्य म्हणतात की दानाचे महत्त्व तेव्हाच असते जेव्हा ते गुप्तपणे केले जाते. हे त्याच्या पत्नीपासूनही गुप्त ठेवले पाहिजे. यामुळे तुमच्या दानाचे महत्त्व कमी होते, त्याचप्रमाणे अनेकवेळा तुमची पत्नी दानासाठी केलेल्या खर्चाचे कारण सांगून तुम्हाला चांगले-वाईट म्हणू शकते.

तुमची कमजोरी सांगू नका

आचार्य चाणक्य यांच्यानुसार जर पतीमध्ये काही दुर्बलता असेल किंवा काही कमजोरी असेल तर त्याने ती पत्नीसोबत शेअर करू नये. आचार्य चाणक्य यांच्या मते, जर तुमच्या पत्नीला तुमची कमजोरी कळली तर ती पत्नी त्याचा फायदा घेत नेहमी त्यावर टोमणा मारत तुमच्याशी भांडण करेल.

Read Also : महागाई भत्ता (DA) 3 नव्हे तर 5 टक्के वाढवणार

तुमची कमाई उघड करू नका

आचार्य चाणक्य यांच्यानुसार पतीने पत्नीला आपल्या कमाईबद्दलही सांगू नये. जर तिला तुमच्या कमाईबद्दल माहिती मिळाली तर ती त्यावर हक्क सांगून तुमचे सर्व खर्च थांबवण्याचा प्रयत्न करेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी