Vastu Tips for Married People: नवरा-बायकोमध्ये भांडणं होताय? मग हा करा उपाय दूर होतील गैरसमज, घरात येईल आनंद

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Nov 11, 2021 | 09:52 IST

Vastu Tips for Married People:  वैवाहिक (Married Life) जीवनात नवरा-बायकोमध्ये (Husband-Wife) वाद (Quarrel) होणं हे स्वाभाविक असतं. प्रत्येक गोष्टीवर मतभेद होण ही सामान्य बाब असते.

Husband-wife quarrel
Vastu Tips: नवरा-बायकोमध्ये भांडणं होताय? मग हा करा उपाय   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • घरातील भिंतीवर किंवा शोकेसमध्ये प्राण्यांचे फोटो किंवा चित्र लावल्यास घरात नकारात्मकता पसरते.
  • बेडरुमध्ये राधाकृष्णाचा फोटो लावावा.
  • घरातील शिव-पार्वतीच्या मुर्ती समोर तुपाचा दिवा लावावा.

Vastu Tips for Married People: नवी दिल्ली : वैवाहिक (Married Life) जीवनात नवरा-बायकोमध्ये (Husband-Wife) वाद (Quarrel) होणं हे स्वाभाविक असतं. प्रत्येक गोष्टीवर मतभेद होण ही सामान्य बाब असते. परंतु छोटे-मोठ्या वादातून वैमनस्य वाढणे हे चिंतेचं कारण होऊ शकते. वाद-विवादाचे रुपांतर जर नाते तुटण्यापर्यंत पोहचत असले तर हे वैवाहिक जीवनात अशांतता येत असते. याचा परिणाम पूर्ण कुटुंबावर होत असतो. जर तुम्हीही वैयक्तिक आयुष्यात अशाच संकटातून जात असाल तर आम्ही तुम्हाला काही सोपे उपाय सांगणार आहोत, ते केल्याने तुमच्या आयुष्यात पुन्हा आनंद येऊ शकतो.

घरात ठेवा शिव-पार्वतीची मूर्ती 

ज्योतिष शास्त्रानुसार, दररोजच्या भांडणापासून मुक्ती मिळवण्यासाठी शिव-पार्वतीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर नियमितपणे तुपाचा दिवा लावावा. यासोबतच रोज शिव चालिसाचा जप करताना तुमची इच्छा बोला. लक्षात ठेवा, हे उपाय श्रद्धेने करा, तरच तुमची इच्छा पूर्ण होईल.

या मंत्राचा जप करा

वैवाहिक जीवन सुखी होण्यासाठी मातंगी यंत्र घरी आणावे. यानंतर समोर बसून नियमितपणे १०८ वेळा समोर  ‘ऊं ह्रीं क्लीं हूं मातंग्यै फट्स्वाहा’ मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतील आणि घरात फक्त सुखच नांदेल.

हा उपाय शुक्रवारी करा

ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक शुक्रवारी मुलींना बोलावून तिला पांढरी गोड वस्तू खायला द्या.  शुक्ल पक्षपासून हे सुरू करा 11, 21 या 51 वेळा असे करा. 
रात्री झोपताना नवऱ्याच्या डोक्याकडील बाजुला कुंकू ठेवावा. तर स्वतःच्या डोक्याखाली कापूर ठेवावा. मग नवऱ्याने घरामध्ये कुठेही कुंकू टाकून द्यावा. तर पत्नीने कापूर जाळून टाकावा, यामुळेही घरात शांतता नांदेल.

बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावा

वैवाहिक जीवनात शांती मिळवण्यासाठी बेडरूममध्ये राधाकृष्णाचे चित्र लावा. याशिवाय घराच्या दारात तुपात कुंकू मिसळून भिंतीवर स्वस्तिक लावल्याने वास्तुदोष कमी होऊन घरात सुख-शांती नांदते.

प्राण्याचे फोटो भिंतीवर लावू नका 

वास्तूनुसार, सिंह, चित्ता इत्यादी वन्य प्राण्यांचे चित्र घरात कधीही ठेवू नये.  अशी चित्रे घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जा पसरते. घरातील लोकांवरही याचा विपरीत परिणाम होतो.

(टीप: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. टाइम्स नाऊ याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी