Marksheet : दहावी-बारावीत काठावर पास होणारेही पूर्ण करू शकतात स्वप्न, IAS अधिकाऱ्याने शेअर केलं दहावीचं मार्कशिट, हजारो तरुणांना मिळाली प्रेरणा

कधीकधी एखादी छोटी गोष्टही आपल्याला प्रेरणा देऊन जाते आणि आपलं आयुष्य बदलतं. अशीच एक गोष्ट सध्या सोशल मीडियावर शेअर होत आहे. ही गोष्ट आहे एका अधिकाऱ्याचं दहावीचं मार्कशिट.

Marksheet
IAS अधिकाऱ्याने शेअर केलं दहावीचं मार्कशिट  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आयएएस अधिकाऱ्याने शेअर केलं मार्कशिट
  • हजारो विद्यार्थ्याना प्रेरणा
  • विद्यार्थ्यांनी शेअर केले अनुभव

Markesteet | आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल आणि आपलं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर भूतकाळात डोकावून पाहण्याची काहीच गरज नसल्याचं एका आयएएस अधिकाऱ्यानं दाखवून दिलं आहे. अनेकजण आपल्याला शाळेत किती गुण मिळत होते, दहावी-बारावीला किती गुण मिळाले होते, यासारखे निकष लावून आपली पात्रता आणि क्षमता जोखण्याचा प्रयत्न करतात. मात्र प्रत्यक्षात भूतकाळातील आपल्या शैक्षणिक गुणवत्तेचा भविष्याशी काहीही संबंध नसल्याचं वारंवार अनेकांनी सिद्ध केलं आहे. दहावी-बारावीत सुमार मार्क्स मिळवणारे अनेक विद्यार्थी पुढच्या आयुष्यात उज्ज्वल कामगिरी करत असल्याचं अनेकदा दिसूनही आलं आहे. सध्या सोशल मीडियात सतत ॲक्टिव्ह असणारे आणि लाखो फॉलोअर्स असणारे आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी आपलं दहावीचं मार्कशिट शेअर करत विद्यार्थ्यांना संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

विद्यार्थ्यांना दिला संदेश 

छत्तीसगड कॅडरचे आयएएस अधिकारी अवनीश शरण हे विद्यार्थ्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहेत. सोशल मीडियावरून ते विद्यार्थ्यांना इन्स्पिरेशनल संदेश देण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. त्यांनी आपलं दहावीचं मार्कशिट सोशल मीडियावरून शेअर केलं आहे आणि दहावी बारावीच्या गुणांवर भविष्यातील कुठलीही गोष्ट अवलंबून नसते, हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. 

अवनीश झाले काठावर पास

अवनीश शरण यांनी 1996 साली दहावीची परीक्षा दिली होती. त्यावेळी आपल्याला किती मार्क्स पडले होते, ते पाहा, असं शरण म्हणतायत. त्यांना एकूण 700 पैकी 314 मार्क्स मिळाले होते. म्हणजेच त्यांना केवळ 44.85 टक्के मार्क्स मिळाले होते. मात्र तरीही त्यांनी आपलं आयएएस होण्याचं स्वप्न जिवंत ठेवलं आणि दहावीच्या मार्कांचा आपल्या भविष्यावर कुठलाही विपरित परिणाम होऊ दिला नाही. 

हजारो विद्यार्थ्यांना प्रेरणा

शरण यांनी त्यांचं 26 वर्षांपूर्वीचं मार्कशिट जाहीर केल्यानंतर हजारो विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा मिळाली आहे. हे मार्कशिट पाहून आपला उत्साह दुणावल्याचं अनेक विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे. आमच्या दहावी किंवा बारावीच्या कमी मार्कांकडे पाहून आमच्यातील आत्मविश्वास कमी झाला होता. मात्र आमच्यापेक्षाही कमी गुण मिळवणारा विद्यार्थी जर एवढा मोठा अधिकारी होऊ शकतो, तर आम्हीही होऊ शकतो, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटू लागला आहे. 

अधिक वाचा - weight loss mistakes: वजन कमी करण्यासाठी सकाळी हे चुका करणे टाळा, नाही तर होईल उलट परिणाम

विद्यार्थ्यांच्या प्रेरणादायी प्रतिक्रिया

सोशल मीडियावर ही पोस्ट पाहून अनेकांनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं लिहिलं आहे, “सर, तुम्ही हे मार्कशिट शेअर केल्यामुळे माझ्या आयुष्यात काय बदल झालाय, याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. मलाही दहावीत तुमच्यासारखेच कमी मार्क्स होते. आपल्याला युपीएससीचा अभ्यास झेपणार नाही, असं समजून मी परीक्षा देण्याची आशा सोडून दिली होती. मात्र आता पुन्हा नव्या जोमाने मी अभ्यास सुरू केला आहे.”

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी