नवरा-बायकोचं नातं टिकवायंच असेल तर पत्नीनं कराव्या 'या' गोष्टी; अन्यथा नात्यावर होऊ शकतात वाईट परिणाम

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Oct 18, 2021 | 09:49 IST

नवरा बायको म्हटलं की, प्रेम भांडण-तंटे, होत असतात. एकमेंकांना एक दुसऱ्यांपासून होत नाही. पण रुसल्याशिवाय ते राहत नाहीत. परंतु वाद वाढविण्याऐवजी मिटवले पाहिजेत.

husband-wife relationship
नवरा-बायकोचं नातं टिकवायंच असेल तर पत्नीनं कराव्या 'या' गोष्टी  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • सासू- सासरे यांच्याशी सुनेने व्यवस्थित बोलले पाहिजे.
  • नवऱ्याची तुलना दुसऱ्या व्यक्तीसोबत करू नका.
  • पत्नीने माहेरचे कौतुक करत बसू नये.

मुंबई : नवरा बायको म्हटलं की, प्रेम भांडण-तंटे, होत असतात. एकमेंकांना एक दुसऱ्यांपासून होत नाही. पण रुसल्याशिवाय ते राहत नाहीत. परंतु वाद वाढविण्याऐवजी मिटवले पाहिजेत. लग्नानंतर नवरा बायकोच्या आयुष्याची नवीन सुरूवात होते. त्यामुळे एकमेकांबद्दल काही गोष्टी त्यांना माहित नसतात, ज्यामुळे एकमेकांना समजून घेण्यापासून ते त्यांचा स्वभाव जाणून घेईपर्यंत सगळ्याच गोष्टींची नव्याने सुरूवात त्यांना करावी लागते. 

त्याचप्रमाणे काही गोष्टी न पटल्यामुळे नवरा-बायकोमध्ये भांडणे होतात, त्यात तसं फारसे नवीन काही नाही. कारण हे प्रत्येक नवरा-बायको सोबतच घडतं. त्याला आपण पूर्णपणे तर रोखू शकत नाही, परंतु थोडा समजूतदारपणा दाखवून हे घरगुती भांडण टाळता येऊ शकते. त्यासाठी बायकोला थोडं संयमाने वागावे लागेल, त्याचबरोबर आपल्याला नवऱ्याला त्याच्या प्रत्येक गोष्टीत मदत करायला तयार राहावे लागेल. आज आम्ही अशाच काही गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याची काळजी घेतल्याने नवरा-बायकोमधील भांडणे कमी होऊ शकतात.

नवऱ्याच्या आई-वडिलांविषयी वाईट बोलणं टाळा

बऱ्याच वेळा घरात सून, जाणीवपूर्वक किंवा काही वेळेला अजाणतेपणाने, सासू-सासऱ्यांशी वाईट वागते. असे केल्याने कोणत्याही मुलाला वाईट वाटू शकते. जर बायकोला तिच्या सासू-सासऱ्यांशी काही तक्रार असेल, तर तिने त्यांच्यासोबत बसून तो सोडवण्याचा प्रयत्न करावा. तसेच मुलगा आपल्या आई-वडिलांशी वाईट वागत असला, तरी बायकोने तसे करू नये कारण आपल्या आई-वडिलांना दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने बोलल्याने नवऱ्याला वाईट वाटू शकते.

नवऱ्याची दुसऱ्या व्यक्तीसोबत तुलना करू नका

आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे पाहतो आणि कधी-कधी त्यांच्या चांगल्या गोष्टी आपल्याला आवडतात. परंतु बायकोने कधीही तिच्या नवऱ्याची तुलना शेजारच्या इतर पुरुषांशी करू नये. जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल काही असेल, तर ती तुम्ही बोलून सोडवण्याचा प्रयत्न करा. परंतु हे करत असताना कोणाचेही उदाहरण नवऱ्याला देऊ नका.

माहेरची स्तुती टाळा

जेव्हा एखादी मुलगी तिच्या वडिलांचे घर सोडून तिच्या सासरच्या घरी येते, तेव्हा तिला तिच्या माहेरची आठवण येणे सहाजिकच असते. यामुळे, पत्नी अनेकदा तिच्या पतीसमोर तिच्या माहेरची स्तुती करते. परंतु असे केल्याने, कधी-कधी तुम्ही तुमच्या माहेरची तुलना तुमच्या सासरच्या लोकांशी करता. बोलण्या बोलण्यात हे तुम्हाला कळत नाही, परंतु ही गोष्टीमुळे तुमच्या नवऱ्याला राग येऊ शकतो ज्यामुळे भांडणे होतात. 

नवऱ्याकडे त्याच्या कुटुंबाची तक्रार नका करू

प्रत्येकजण त्याच्या कुटूंबावर आणि भावंडांवर खूप प्रेम करतो. ते एकमेकांशी कितीही भांडले तरी, त्यांचे एकमेकांवर खूप प्रेम असते, त्यामुळे दुसऱ्या कोणत्या व्यक्तिने आपल्या घरातल्यांबद्दल बोलणे तर ते आपण ऐकून घेत नाही, त्यामुळे तुम्ही देखील तुमच्या नवऱ्याला त्याच्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीची तक्रार करु नका.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी