Vastu Tips: घरातील आरसा चुकीच्या दिशेला लावल्यास येईल आर्थिक संकट; जाणून घ्या आरश्याची योग्य दिशा

लाइफफंडा
Updated Jun 02, 2022 | 10:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips In Marathi | वास्तुशास्त्रानुसार घरात लावलेल्या काचेच्या आरश्याचा भाग्याशी विशेष संबंध असतो. आरसा योग्य दिशेला लावला नाही तर व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच घरातील आरसा चुकीच्या दिशेला लावल्याने आर्थिक संकट येऊ शकते.

If the mirror in the house is turned in the wrong direction, there will be financial crisis
घरातील आरसा चुकीच्या दिशेला लावल्यास येईल आर्थिक संकट  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार घरात लावलेल्या काचेच्या आरश्याचा भाग्याशी विशेष संबंध असतो.
  • आरसा योग्य दिशेला लावला नाही तर व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.
  • वास्तुशास्त्रानुसार ब्रम्हांडाची सकारात्मक ऊर्जा पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकते.

Vastu Tips In Marathi | मुंबई : वास्तुशास्त्रानुसार घरात लावलेल्या काचेच्या आरश्याचा भाग्याशी विशेष संबंध असतो. आरसा योग्य दिशेला लावला नाही तर व्यक्तीच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो. तसेच घरातील आरसा चुकीच्या दिशेला लावल्याने आर्थिक संकट येऊ शकते. दुसरीकडे आरसा योग्य दिशेला लावल्यास कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली राहते. तसेच घरात सकारात्मक उर्जा कायम राहते. त्यामुळे घरातील आरसा नेहमी स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवणे गरजेचे आहे. कारण तुटलेला अथवा फुटलेला आरसा घरात नकारात्मकता वाढवण्याचे काम करत असतो. (If the mirror in the house is turned in the wrong direction, there will be financial crisis). 

अधिक वाचा : जूनचा महिना असणार खूप खास, या राशीतील लोकांना लागणार लॉटरी

आरशाच्या संबंधित वास्तु टिप्स

  1. वास्तुशास्त्रानुसार ब्रम्हांडाची सकारात्मक ऊर्जा पूर्वेकडून पश्चिमेकडे आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकते. अशा स्थितीत आरसा पूर्व किंवा उत्तर भिंतीवर अशा प्रकारे लावावा की पाहणाऱ्याचे तोंड पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे असेल. वास्तुशास्त्रानुसार, आरसा लावण्यासाठी सर्वोत्तम दिशा पूर्व, उत्तर किंवा ईशान्य मानली जाते. या दिशेला आरसा ठेवल्याने घरात सुख-समृद्धी येते.
  2. वास्तुशास्त्रानुसार घराच्या तिजोरी किंवा कपाटासमोर आरसा लावल्याने घरामध्ये धन-समृद्धी येते. आरसा लावताना तो कुठूनही तुटणार नाही याची काळजी घ्यावी. खर तर फुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. वास्तूनुसार बेडरूममधील आरसा खोलीच्या पूर्व दिशेलाच लावावा.
  3. झोपताना शरीराचा कोणताही भाग आरशात दिसू नये. कारण त्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. लहान खोलीमुळे बिछान्यासमोर आरसा असेल तर रात्री झोपताना तो आरसा कपड्याने झाकून ठेवा. 
  4. छोट्या खोलीत आरसा रात्रीच्या वेळी झाकून ठेवल्याने त्याचा नकारात्मक परिणाम होत नाही. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला आरसा लावू नये. कारण असे केल्याने घरात संकटे वाढू लागतात. याशिवाय खोलीच्या भिंतींवर आरसा समोरासमोर ठेवू नये. त्यामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकतो.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी