Shravan 2022 Upay: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला (Shravan Month 2022) विशेष महत्त्व आहे. यंदा 29 जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. धार्मिक दृष्ट्या हा महिना अतिशय महत्त्वाचा आहे. या महिन्यात सण-उत्सव, व्रत, पूजा विधीची रेलचेल असते. भगवान भोलेनाथांना श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. या महिन्यात शिवभक्त भगवान महदेवाला प्रसन्न करण्यासाठी भाविक उपासना करत आहेत. या महिन्यात भगवान शिव प्रसन्न मुद्रेत असतात. त्यामुळे भक्ताच्या उपासनेने ते लवकर प्रसन्न होतात. श्रावणात उपासना व व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी टिकून राहते. या पवित्र महिन्यात आपण घरातील वास्तुदोषावर उपाय केले तर तो दोषही दूर होत असतो आणि आपल्याला आर्थिक, समाधानीचे दिवस येत असतात. त्यानुसार जाणून घेऊया श्रावण महिन्यातील उपायांसंदर्भात माहिती.
वास्तुशास्त्रामध्ये सुख-समृद्धीसाठी अनेक प्रकारचे नियम सांगण्यात आले आहेत, ज्याचे पालन करून घरात सकारात्मक ऊर्जा संचारते. घरातील वास्तू दोषांमुळे अनेक समस्या निर्माण होतात. ज्यामध्ये प्रामुख्याने पैशाची हानी, मानसिक छळ, अशांततेला सामोरे जावे लागते. वास्तूनुसार घरामध्ये काही वास्तुदोष असतात ज्यांना विसरूनही दुर्लक्ष करू नये. यामुळे आज आपण श्रावण महिन्यात या वास्तुदोषापासून कशी मुक्तता मिळवू शकतो यांची माहिती घेणार आहोत.
वास्तुदोषांमुळे घरात अशांततेचे वातावरण असते. अशा स्थितीत घरातील संकटांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि गृहकलह टाळण्यासाठी श्रावण महिन्यातील सोमवारी घराच्या ईशान्य कोपर्यात रुद्राभिषेक करावा.
Read Also : भंगारवाल्याच्या फॅमिलीकडे इतक्या रुपयांच्या खंडणीची मागणी
घरामध्ये वास्तुदोष असल्यास घरातील सदस्यांची प्रगती थांबते. हा दोष दूर करण्यासाठी सोमवारी शमीचे रोप घराच्या प्रवेशद्वारावर लावा आणि झाडाला नियमित पाणी द्या. यामुळे वास्तुदोष दूर होतो आणि घरातील लोकांची प्रगती होईल.
श्रावण महिन्यात घराच्या पूर्व दिशेला वेलीचे रोप लावावे. रोज सकाळ संध्याकाळ या वेलीला पाणी अर्पण करून तुपाचा दिवा लावावा. असे केल्याने गरिबी आणि आर्थिक संकट दूर होते आणि धनलाभ होतो.
Read Also : खासगी नोकरी करणाऱ्यांसच्या पगारात होणार इतकी मोठी वाढ
विवाहात अडथळे येत असतील किंवा कोणत्याही कारणाने विलंब होत असेल तर श्रावण महिन्यात कुमारी मुलीने घराच्या उत्तर दिशेला तुळशीचे रोप लावावे. असे केल्याने विवाहाची शक्यता लवकर निर्माण होते.
घरात वास्तुदोष असल्यास श्रावण महिन्यात शिवलिंग घरी आणून त्याची नित्य पूजा केल्यास वास्तुदोष दूर होतो. या उपायाने घरात सुख समृद्धी नांदते.
(टीप – या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)