Chanakya Niti: चांगलं आयुष्य (Life) जगण्यासाठी पैसा (Money) खूप महत्त्वाचा असतो. आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग असतो. पैसा आपल्याला प्रत्येक नात्याचं सत्यही दाखवतो. तुमच्याकडे पैसा आणि समृद्धी असेल तर तुमचे नातेवाईक सुखात आणि दु:खात सोबत राहत असतात. परंतु जेव्हा तुमच्याकडे पैसा नसतो तर तुमच्या पाठीमागे उभे असलेले नातेवाईक देखील तुम्हाला सोडून जात असतात. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांनी संपत्ती आणि लक्ष्मी संदर्भात अनेक धोरणे सांगितली आहेत, त्यांनी सांगितले आहे की एखादी व्यक्ती दीर्घकाळ संपत्ती कशी साठवून ठेवू शकते, याचे त्यांनी उपाय सांगितले आहेत. तु्म्हालाही गरिबीपासून दूर राहायचे असेल तर चाणक्याच्या या गोष्टी अवश्य पाळा.
खर्चावर नियंत्रण ठेवणे हा पैसा वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग असल्याचे सांगण्यात आले आहे. जितका पैसा कमवायचा तितकाच तो जतन करणंही महत्त्वाचं आहे.जे धनसंपत्ती ठेवतात, त्यांना आयुष्यात कधीच कुणासमोर हात पसरावा लागत नाही. अशी माणसं वाईट परिस्थितीतही आपलं आयुष्य सामान्यपणे जगतात.
लक्ष्मी चंचल मानली जाते, त्यामुळे धनाचा वापर योग्य ठिकाणी आणि योग्य वेळेनुसार केला पाहिजे. जो माणूस पाण्यासारखा पैसा खर्च करतो, त्याला एक दिवस संकटाचा सामना करावा लागतो. चाणक्यांच्या मते, जीवनात सुख-समृद्धी टिकवून ठेवण्यासाठी आणि पैशाची कमतरता टाळण्यासाठी व्यक्तीने आपले ध्येय निश्चित केले पाहिजे, जर ध्येय निश्चित केले नाही तर त्याला यश मिळू शकत नाही. चाणक्य नुसार पैशाशी संबंधित कामांची माहिती इतर कोणालाही देऊ नये. पैशाचा वापर, सुरक्षा, दान आणि व्यवसायात गुंतवणूक म्हणून करा.
पैशाच्या मागे कधीही धावू नये, पैशासाठी अधर्माचा मार्ग निवडू नये. अनैतिक कृत्ये करून मिळवलेला पैसा फार काळ टिकत नाही.अशा कमावलेल्या पैशामुळे व्यक्तीला नंतर नुकसान सहन करावे लागते.
चाणक्य नुसार, पैसा माणसाला सन्मान देतो.म्हणून तुमच्या कमाईचा काही भाग परोपकारासाठी काढला पाहिजे.याने गरजूंना मदत होते आणि तुमचा सन्मान होतो.