VASTU TIPS: चुकीच्या दिशेने घड्याळ लावल्यास, शुभ वेळ आपल्याकडे करते पाठ, संपत्ती हवी तर लक्षात ठेवा या महत्त्वाच्या गोष्टी

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Aug 09, 2022 | 14:30 IST

घराच्या भिंतीवर घड्याळ (Clock) लावल्याने भिंतीचे सौंदर्य वाढते, पण सौंदर्याच्या मागे धावताना आपण हे विसरून जातो की घड्याळ लावण्याची योग्य दिशा (direction) कोणती आहे, घड्याळ कोणत्या दिशेला लावल्याने सुख-संपत्ती (wealth), धन (money), मान-सन्मान (respect), कीर्ती इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. तर कोणत्या दिशेला लावले तर आपल्याला गरिबी येते.

If you put the watch in the wrong direction, good time become wrong
चुकीच्या दिशेने घड्याळ लावल्यास, शुभ वेळ फिरवते पाठ  |  फोटो सौजन्य: Google Play
थोडं पण कामाचं
  • घड्याळ भिंत आणि घराची सौंदर्य वाढविण्यासाठी आवश्यक वस्तू आहे.
  • घड्याळ योग्य दिशेला लावले तर आयुष्यात खूप काही साध्य करता येते.
  • भिंतीवर घड्याळ ठेवण्याची उत्तम दिशा म्हणजे ईशान्य

Right Direction to Put a Clock in The House: घराच्या भिंतीवर घड्याळ (Clock) लावल्याने भिंतीचे सौंदर्य वाढते, पण सौंदर्याच्या मागे धावताना आपण हे विसरून जातो की घड्याळ लावण्याची योग्य दिशा (direction) कोणती आहे, घड्याळ कोणत्या दिशेला लावल्याने सुख-संपत्ती (wealth), धन (money), मान-सन्मान (respect), कीर्ती इत्यादी गोष्टी प्राप्त होतात. तर कोणत्या दिशेला लावले तर आपल्याला गरिबी येते. हे माहिती राहत नाही. घड्याळ भिंत आणि घराची सौंदर्य वाढविण्यासाठी आवश्यक वस्तू आहे. सर्व कामे वेळेवर व्हावीत म्हणून लोक दुरूनच वेळ पाहून कामाला लागत असतात. दुरुन आपल्याला वेळ समजेल, अशा ठिकाणी लोक घड्याळ लावत असतात, परंतु ती दिशा घड्याळीसाठी योग्य आहे का नाही याची खात्री करत नाही.    

वास्तुशास्त्रानुसार वॉल क्लॉक लावण्याचेही नियम आहेत आणि त्यांचे पालन केल्याने आपोआपच गोष्टी चांगल्या होऊ लागतात, थांबलेली प्रगती टिकून पुढे सरकू लागते. घड्याळ योग्य दिशेला लावले तर आयुष्यात खूप काही साध्य करता येते, नाहीतर हातात आलेली संधीही निघून जाते. तर मग आपण या लेखात प्रथम जाणून घेऊया की घड्याळ कोणत्या दिशेला ठेवावे.

Read Also : कॉमनवेल्थ गेम्समध्ये खेळायला गेलेले 10 खेळाडू बेपत्ता

घड्याळासाठी ही दिशा आहे सर्वोत्तम 

भिंतीवर घड्याळ ठेवण्याची उत्तम दिशा म्हणजे ईशान्य. घड्याळ ड्रॉईंग रुममध्ये ठेवावे किंवा बेडरूममध्ये किंवा स्वयंपाकघरात किंवा पूजाघरातील ईशान्य दिशेला लावणे चांगले.जर ईशान्येच्या दिशेला जागा नसेल तर दुसरे प्राधान्य उत्तर दिशेला द्यावे आणि तिसरे प्राधान्य पूर्व दिशेला द्यावे. घड्याळ योग्य दिशेला लावल्याने त्यातील ऊर्जा म्हणजेच बॅटरीमुळे होणारी टिक-टिकमुळे  ती दिशाही सक्रिय होते.

Read Also : डोनाल्ड ट्रम्प यांच्या घरावर FBI चा छापा: टीमने फोडली तिजो

ईशान्य दिशेकडून येते कीर्ती आणि पैसा 

ईशान्य दिशा मान-सन्मान, कीर्ती, मान-समृद्धी इ. देते, म्हणजेच सर्वजण तुमची स्तुती करतात, तर उत्तर दिशा धन-संपत्ती देते  आणि करिअरमधील अडथळे दूर होतात. पदोन्नती थांबली किंवा नोकरी काही कारणाने मिळत नसेल, व्यवसायातील पैसा अडकला असेल तर अडथळे दूर होतत पैसे मिळत असतात. या दिशेमुळे मानसन्मान मिळतो, मुलांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतात आणि कुटुंबाचे आरोग्य चांगले राहते. 

विसरूनही या दिशेला लावू नका घड्याळ 

दक्षिण-पश्चिम आणि दक्षिण भिंतीवर घड्याळ लावू नये. भिंतीवरील घड्याळ घराच्या दरवाजाच्या चौकटीच्या वर ठेवू नये. दारावर घड्याळ लावणे म्हणजे घरातील लोक निघून जाण्याची वेळ आली आहे, अशा परिस्थितीत लवकरच काही अशुभ वार्ता प्राप्त होते. सेल संपल्यामुळे घड्याळ थांबणे हे देखील एक वाईट लक्षण आहे, जेव्हा असे होते तेव्हा तुमची वेळ येणे थांबते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी