Dream Interpretation: स्वप्नशास्त्रानुसार, प्रत्येक स्वप्नाला कोणता ना कोणता अर्थ असतो. आपल्या जीवनात भविष्यात घडणाऱ्या घटनांबाबत काही स्वप्ने संकेत देत असतात. त्यासाठी स्वप्नांचा अर्थ समजून घेणे महत्त्वाचे असते. आपण सर्वांना स्वप्न पडत असते, यात दिसरणाऱ्या गोष्टीवरुन विविध अर्थ काढले जातात. काही स्वप्ने असे असतात की, ते आपल्या आर्थिक स्थिती सुधारण्याबाबत संकेत देत असतात. तर काही वाईट घटनांचे संकेत दाखवत असतात. तर काही स्वप्ने आपल्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांबाबत संकेत देत असतात. आज आम्ही आपल्याला आज अशाच काही स्वप्नांबाबत सांगणार आहोत. जर तुमच्या स्वप्ना या चार गोष्टी दिसल्या तर तुमचं नशीब बदललं म्हणून समजा. भविष्यातील दिवसात तुम्ही मालामाल होणार असल्याचे संकेत या गोष्टींवरुन दिले जातात.
स्वप्नशास्त्रानुसार, स्वप्नात परमेश्वर आणि मंदिर दिसणे शुभ मानले जाते. कुबेर आपल्यावर मुक्त हाताने उधळण करू शकतो. भविष्यात आपल्याला अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तसेच महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यापार-व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता असते.
स्वप्नात धन दिसणे खूप शुभ मानले जाते. एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पैसा किंवा धन दिसत असेल तर भविष्यात त्यांना भरपूर पैसा मिळण्याची शक्यता असते. स्वप्नात नोटांचे बंडल किंवा नाणे दिसत असेल तर धनप्राप्तीचे योग आहेत, असे समजावे.
स्वप्नशास्त्रानुसार, एखाद्या व्यक्तीला स्वप्नात पांढरे किंवा लाल फूल दिसलं असेल तर ते शुभ मानले जाते. स्वप्नात कमळाचे फूल दिसत असेल तर ती व्यक्ती भविष्यात मालामाल होऊ शकतो. व्यक्तीला स्वप्नात चमेली, गुलमोहर, केतकी किंवा केशरचे फूल दिसणे देखील उत्तम मानले जाते. भविष्यात व्यक्तीला धन-संपत्ती प्राप्त होऊ शकते.
स्वप्नात मातीची भांडी, माठ, पाणाने भरलेली घागर दिसणे शुभ मानले जाते. लवकरच आपल्याला अनपेक्षित धनलाभ होण्याचे योग आहेत, असे समजावे.
(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती गृहितके आणि माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याचे समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.)