Good Sleep Tips: या दिशेला पाय करुन झोपल्यास येईल शांत झोप, योग्य दिशा नसल्यास रात्रभर होईल तळमळ

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Oct 26, 2022 | 09:09 IST

दिवसभर काम करुन माणसाचे शरीर थकत असते, हा थकवा घालण्यासाठी रात्री पुरेशी झोप आवश्यक असते. पण ती समस्या आपण काहीतरी कारण देऊन टाळत असू तर ते घातक ठरू शकते. दरम्यान चांगली झोप येत नाही यामागे अंथरुण किंवा गोंगाट जबाबदार नाही. यासाठी तुमच्या घरातील वास्तुशास्त्र आणि विशेषत: झोपण्याची दिशा दुरुस्त करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 

Good Sleep Tips
या दिशेला पाय करुन झोपल्यास येईल शांत झोप  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • जर तुम्ही घरामध्ये झाडे लावली असतील तर त्यांना रोज पाणी द्यायला विसरू नका.
  • रात्री चांगली झोप घ्यायची असेल तर दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका.
  • झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे.

Good Sleep Remedies:आपल्यातील अनेकांना रात्रीची झोप येत नाही. निम्म रात्रीपर्यंत ते आपली बाजू बदलत राहतात, परंतु त्यांना शांत झोप लागत नाही. झोप येत नसल्यामुळे बहुतेक लोक हे बाहेरील गोंगाटाला (noisy) जबाबदार मानत असतात, तर काहीवेळा अंथरुण (bed) चांगल नाही म्हणून आपल्याला झोप येत नसल्याचं म्हणतात. तर काहीजण जागा नवीन आहे, त्यामुळे झोप येत नसल्याचं म्हणून वेळ मारुन नेत असतात. परंतु झोप चांगली झाली नाही तर अनेक आजार (illness) होण्याची शक्यता असते. झोप ही आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक बाब आहे. झोपेचा आणि आरोग्याचा मोठा संबंध असतो. त्यामुळे गाढ आणि शांत झोप येणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. (If you sleep with your feet in this direction, you will get a peaceful sleep)

अधिक वाचा  : मूसेवाला हत्या प्रकरण: अफसाना खानची NIA कडून 5 तास चौकशी

दिवसभर काम करुन माणसाचे शरीर थकत असते, हा थकवा घालण्यासाठी रात्री पुरेशी झोप आवश्यक असते. पण ती समस्या आपण काहीतरी कारण देऊन टाळत असू तर ते घातक ठरू शकते. दरम्यान चांगली झोप येत नाही यामागे अंथरुण किंवा गोंगाट जबाबदार नाही. यासाठी तुमच्या घरातील वास्तुशास्त्र आणि विशेषत: झोपण्याची दिशा दुरुस्त करणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. 

हलकी वस्तू ईशान्य दिशेला ठेवा

रात्री चांगली झोप घ्यायची असेल तर अग्नीशी संबंधित कोणतीही वस्तू घरामध्ये आग्नेय दिशेला ठेवावी. तसेच घराची उत्तर दिशा, ज्याला ईशान्य कोन देखील म्हणतात, त्या दिशेला हलक्या वस्तू ठेवाव्यात. या उपायांनी मानसिक शांती आणि चांगली झोप येत असते.

अधिक वाचा  : पुलकित सम्राटच्या प्रेयसीचं फोटोशूट पाहून सगळेचं चक्रावले

रोज रोपांना पाणी द्या

जर तुम्ही घरामध्ये झाडे लावली असतील तर त्यांना रोज पाणी द्यायला विसरू नका. ती झाडं कोणत्याही स्थितीत कोरडी होणार नाहीत याची काळजी घ्या. ती झाडे सुकल्याने घरात अशांतता येते. यासोबत घरामध्ये नैऋत्य दिशेला ओव्हरहेड पाण्याची टाकी ठेवा, असे करणे शुभ मानले जाते.

खोल्यांमध्ये काटेरी पुष्पगुच्छ ठेवू नका

दरम्यान घरात जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरत असाल तर त्याची नियमित देखभाल करा. त्यात काही खराबी आली तर विजेचा धक्का लागण्याची शक्यता असते. तसेच घरातील कोणत्याच कोपऱ्यात काटेरी पुष्पगुच्छ ठेवू नका. 

 दक्षिण दिशेला तोडून करून झोपू नका

रात्री चांगली झोप घ्यायची असेल तर दक्षिणेकडे पाय ठेवून झोपू नका. जर तुम्ही या पद्धतीने झोपलात मनात अस्वस्थता वाढत असते, यामुळे झोप नीट येत नाही.  यासोबतच बेडरूममध्ये दरवाजाकडे डोके ठेवून झोपू नये.त्याऐवजी, पूर्वेकडे डोके आणि पश्चिमेकडे पाय ठेवून झोपा. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी