Katrina mehandi look alike : कतरिनासारखा मेहेंदी लूक हवा असल्यास फॉलो करा या फॅशन टिप्स

लाइफफंडा
Updated Dec 13, 2021 | 04:16 IST | टाइम्स नाऊ मराठी

Katrina mehandi look and tips : कतरिना कैफसारखा मेहेंदी लूक मिळवण्यासाठी काही टिप्स फॉलो करणं गरजेचं आहे. त्यामुळे लग्नासाठी खास लूक शोधत असाल तर याचा नक्की विचार करा.

If you want a mehndi look like Katrina, follow these fashion tips
मेहंदी सोहळ्यासाठी नवीन लुक शोधताय? पाहा हा लूक  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • कतरिनाच्या मेहेंदी लूकची अजूनही चर्चा
  • कतरिनासारखा लूक हवाय फॉलो करा या टिप्स
  • मेहेंदीसाठी कमी वजनाचा लेहेंगा निवडा

Perfect Mehandi look and tips : बॉलीवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या लग्नाला तीन दिवस उलटून गेले आहेत आणि आता 
हे दोघेही त्यांच्या लग्नाच्या फंक्शन्सचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत. यापूर्वी, दोघांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर लग्नाचे आणि हळदी समारंभाचे फोटो शेअर केले होते 
आणि आता मेहंदी फंक्शनचे फोटो देखील शेअर केले आहेत. यानिमित्ताने कतरिना आणि विकी दोघेही खूप छान दिसत आहेत.


जर तुमचे लग्न लवकरच होणार असेल आणि तुम्ही तुमच्या मेहंदी सोहळ्यासाठी सुंदर लुक शोधत असाल तर कतरिनाचा मेहंदी लूक तुमच्यासाठी योग्य असेल. आम्‍ही तुम्‍हाला कतरिनाच्या लूकचे खास मुद्दे सांगत आहोत.

स्टाइल टिप्‍स 

जर तुमचं वजन जास्त असेल, तर तुम्ही कमीत कमी कळ्या असलेला लेहेंगा घालावा. जास्त कळ्या असलेला लेहेंगा तुम्हाला फॅट लूक देऊ शकतो.


मेहंदी समारंभात एकूण हिरव्या रंगाचा लेहेंगा किंवा आउटफिट घालण्याऐवजी तुम्ही कतरिनासारखे मल्टी कलर निवडू शकता.

मेहंदी समारंभासाठी हलक्या वजनाचा लेहेंगा निवडा. त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्याचा आनंद घेऊ शकता.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
A post shared by Katrina Kaif (@katrinakaif)

स्टाइल टिप्‍स 

तुमचे मेहंदी समारंभाचे दागिने लग्नाच्या दागिन्यांपेक्षा हलके ठेवा, नाहीतर मेहंदीच्या लूकसमोर तुमचा वधूचा लुक फिका पडू शकतो.

जर तुम्ही लाइटवेट लेहेंगा घातला असाल तर तुम्ही हेवी ज्वेलरी कॅरी करू शकता आणि हेवी लेहेंग्यासोबत हलके दागिने कॅरी करू शकता.


कतरिना कैफचा मेकअप


कतरिनाच्या लेहेंग्यात अनेक भडक रंग दिसले. म्हणूनच तिने तिचा मेकअप थोडा साधा ठेवला आहे. तिने गडद आयब्रोसोबत ग्लॉसी पेस्टल कलरची लिपस्टिक लावली होती. 
यासोबतच केसांमध्ये लांब कर्ल बनवून त्यांना वेव्ही लुक दिला. कतरिनाने आपले केस उघडे ठेवले होते. पण तुम्हाला हवे असल्यास केसांना अर्धे पिन करून तुम्ही कोणत्याही हेअर अॅक्सेसरीज लावू शकता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी