लग्नानंतर रोमांच टिकवून ठेवायचा असल्यास 'ही' गोष्ट जरुर करा! 

जे जोडपं कामानिमित्त जेव्हा एकमेकांपासून दूर राहतात तेव्हा त्यांच्यातील प्रेम अधिक वाढत जातं. हे एका सर्व्हेतून समोर आला आहे. 

if you want to keep a thrill in relationships after marriage stay away from each other for 5 days
लग्नानंतर रोमांच टिकवून ठेवायचा असल्यास 'ही' गोष्ट जरुर करा!   |  फोटो सौजन्य: Thinkstock

मुंबई: पती आणि पत्नीने आनंदी राहण्यासाठी एकत्रच राहिलं पाहिजे ही गोष्ट आता काहीशी जुनी झाली आहे. एका अभ्यासात असं समोर आलं आहे की, जे कपल कामनिमित्त एकमेकांपासून दूर राहतात ते एकमेकांवर खूप जास्त प्रेम करु लागतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची जवळीक कायम असते. या गोष्टीची जाणीव त्यांना तेव्हा होते जेव्हा ते अनेक दिवस एकमेकांना भेटत नाहीत. 

असं असलं तरीही पती-पत्नीमधील हा दुरावा पाच दिवसांपेक्षा अधिक नसावा. युकेमधील ट्रॅवेलॉज हॉटेलने केलेल्या या सर्व्हेमध्ये जवळजवळ २००० लोकांनी भाग घेतला होता. या सर्वेतून असं समोर आलं आहे की, प्रत्येकी १० पैकी चार लोकं हे आपल्या रिलेशनशीपमध्ये खुश होते जे आपल्या कामामुळे आपल्या पार्टनरपासून काही दिवस दूर जात होते. 

ट्रॅवेलॉजमध्ये अकाउंटंटचं काम करणारे ३५ वर्षीय रिचर्ड स्कॉट हे आपल्या कामामुळे बऱ्याचदा आपल्या पत्नीपासून दूर असतात. त्यांचं असं म्हणणं आहे की, काही वेळा आपण आपल्या पार्टनरपासून काही दिवसांसाठी लांब राहिलं पाहिजे. यामुळे एकमेकांची नेमकी किंमत काय आहे हे दोघांनाही समजतं. 

सर्व्हेमध्ये काही जण या गोष्टीने देखील आनंदी दिसून आले की, कामानिमित्त बाहेर जाणं आणि हॉटेलमधील मोठ्या रुममध्ये एकटं राहणं यामध्ये एकप्रकारचा आनंद अनुभवता येतो. काही दिवस घरापासून दूर राहिल्याने आपला मेंदू देखील फ्रेश होतो असं अनेकांचं म्हणणं आहे. 

यावेळी दहा पैकी चार जणांचं असं म्हणणं होतं की, जेव्हा आपण काही दिवस कुटुंबीयांपासून दूर राहून आपल्या घरी परततो तेव्हा आपलं स्वागत खूपच शानदारपणे होतं. जे त्यांना खूपच आवडतं. त्यामुळे जर लग्न झालेल्या जोडप्यांनी हा फंडा वापरला तर त्यांच्यासाठी हे खूपच फायदेशीर ठरू शकतं. यामुळे त्यांचं नातं अधिक दृढ होऊ शकतं. या सर्व्हेतून देखील हेच आपल्याला दिसून येतं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...