Female Thumb Prediction : कामाचा कानमंत्र; महिलांचा स्वभाव ओळखण्यासाठी अख्खा जन्म नाहीतर फक्त निरखून पहा त्यांचा अंगठा

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Nov 10, 2021 | 15:43 IST

Female Thumb Prediction : महिलांचं (Female) मन त्यांचा स्वभाव (Nature) ओळणं खूप कठीण असतं असं बोलताना आपण अनेक पुरुषांना ऐकलं असेल. नवऱ्याला मनातलं कळलं नाही किंवा पत्नीचा स्वभाव कसा आहे जाणून घेणं खूप अवघड काम वाटतं.

If you want to know the nature of a woman
अंगठ्यावरुनच ओळखा महिलांचा स्वभाव   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • मैत्री, लग्न किंवा व्यवसाय करण्यापूर्वी महिलांचा अंगठा पहा.
  • अख्य आयुष्य नाही तर फक्त अंगठा पहावा लागेल निरखून
  • अंगठ्याकडे पाहून महिलांमधील कमतरता आणि चांगुलपणा सहज कळेल.

Female Thumb Prediction :  मुंबई : महिलांचं (Female) मन त्यांचा स्वभाव (Nature) ओळणं खूप कठीण असतं असं बोलताना आपण अनेक पुरुषांना ऐकलं असेल. नवऱ्याला मनातलं कळलं नाही किंवा पत्नीचा स्वभाव कसा आहे जाणून घेणं खूप अवघड काम वाटतं. पंरतु गड्यानो तुमचं ही चिंता आम्ही या लेखातून मिटवणार आहोत. समुद्र शास्त्रानुसार कोणत्याही स्त्री (woman) किंवा पुरुषाच्या (Men) हाताचा अंगठा हा त्याच्या विचारांचा आरसा असतो. अशा परिस्थितीत कोणत्याही महिलेसोबत मैत्री, लग्न किंवा व्यवसाय करण्यापूर्वी तिच्या हाताच्या अंगठ्याकडे पाहून तिच्यातील कमतरता आणि चांगुलपणा सहज कळू शकतो. महिलांच्या अंगठ्याद्वारे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल जाणून घेऊ...

लांब अंगठे असलेल्या महिला तणावाखाली राहतात

समुद्र शास्त्रानुसार ज्या स्त्रियांचा अंगठा लांब असतो, त्या खूप बुद्धिमान असतात. तथापि, अशा महिलांमध्ये, आवश्यकतेपेक्षा जास्त घाई असते. लांब अंगठ्या असलेल्या स्त्रिया अनेकदा घाईघाईने सर्वकाही करतात आणि कमी संवेदनशीलता असतात. ज्या स्त्रियांचा अंगठा लांब असतो त्यांच्या वैवाहिक जीवनात विरोधाभास असतो. वयाच्या पन्नाशीनंतर अशा महिला अनेकदा घेतलेल्या निर्णयांमुळे तणावाखाली राहतात.

लहान अंगठ्या असलेल्या स्त्रियांना समाजात आदर मिळतो

ज्या महिलांचा अंगठा लहान असतो, त्यांची संवेदनशीलता कमी असते. अशा स्त्रिया अनेकदा जीवनाच्या झगमगाटात हरवल्या जातात. अशा महिलांना स्वतंत्र जीवन जगायला आवडते. त्यांना कोणाचा संयम आवडत नाही. लहान अंगठा असलेल्या स्त्रिया मोठी स्वप्ने पाहतात आणि ती सत्यात उतरवतात, त्यामुळे त्यांना समाजात खूप आदरही मिळतो.

अशा महिला पैशाच्या बाबतीत असतात खूप जागरूक

ज्या महिलांचे हात उभार आणि गुलाबी रंगाचे असतात आणि बोटे लहान अंगठ्यासह चौकोनी असतात, त्या महिला धन आणि पैशाच्या बाबतीत खूप जागरूक असतात. अशा स्त्रियांची उपस्थिती नेहमीच शानदार असते आणि त्यांना त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.

कडक बोटे असणारी महिला राहते कंजूस

ज्या महिलांचा अंगठा लहान आणि बोटे कडक आणि शंकूच्या आकाराची असतात, अशा महिला सामान्य स्त्रियांच्या तुलनेत खूप हुशार असतात. तसेच त्या पैशाच्या बाबतीत खूप कंजूस असतात. अशा महिला इतरांच्या भावनांचा आदर करत नाहीत आणि नेहमी स्वतःच्या हिताचा विचार करत असतात. त्यांच्या स्वभावाशी संबंधित काही कमतरता त्यांच्या वैवाहिक जीवनावर परिणाम करण्याचे एक मोठे कारण बनतात.

(नोट: या लेखातील माहिती सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. टाइम्स नाऊ मराठी याची पुष्टी करत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी