वजन कमी करायचं असेल तर निवांत घ्या आठ तासांची झोप; जाणून घ्या काय आहे झोप आणि वजनाचा संबंध?

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Sep 23, 2021 | 11:15 IST

वाढते वजन हे अनेक आजारांना आमंत्रण देत असते. वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, ब्लड शुगर, हृदयाशी संबंधित आजार, गुडघ्यांमध्ये  आदी आजार होऊ शकतात.

If you want to lose weight, get eight hours of slee
वजन कमी करायचं असेल तर निवांत घ्या आठ तासांची झोप  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • गाढ झोपेमुळे तुमचे मेटाबॉलिज्म मजबूत होते. त्यामुळे तुमच्या शरीरात अधिक फॅट राहत नाही.
  • झोपताना पाठीवर झोपणे सर्वात चांगले आहे. त्यामुळे पाय मोडून किंवा पोटावर झोपणे बंद करा.
  • लाईटमुळे तुमच्या स्लीप हार्मोन मेलाटोनिनचा स्तर कमी करतात.

नवी दिल्ली: वाढते वजन हे अनेक आजारांना आमंत्रण देत असते. वजन वाढल्याने उच्च रक्तदाब, ब्लड शुगर, हृदयाशी संबंधित आजार, गुडघ्यांमध्ये  आदी आजार होऊ शकतात. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक प्रयत्न करत असतात. काही जण जीमच्या खेट्या मारत अ्सतील, परंतु तुम्हाला आम्ही आयडिया देणार आहोत, ज्यातून जीमला जाण्याची गरज नाही, पण वजन मात्र कमी होईल. या पर्यायासाठी तुम्हाला जास्त मेहनत देखील घेण्याची गरज भासणार नाही. हा पर्याय निश्चित झोप चांगल्या आणि गाढ झोपेमुळे तुमचे वजन कमी होऊ शकते, असं अनेक संशोधनातून पुढे आलं आहे.

गाढ झोपेने वजन कमी होतं

तुम्ही जर 7 ते 8 तासांची कोणत्याही व्यत्यया विना गाढ झोप घेतल्यास तुमचे वजन कमी होते, हे आता सिद्ध झाले आहे. गाढ झोपेमुळे तुमचे मेटाबॉलिज्म मजबूत होते. त्यामुळे तुमच्या शरीरात अधिक फॅट राहत नाही. चांगल्या मेटाबॉलिज्ममुळे अधिक कॅलरीज जाळण्यास मदत होते. अपुऱ्या झोपेमुळे शरीरात कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन तयार होतो. त्यामुळे भूक वाढते आणि झोपेच्या कमतरतेमुळे फूड क्रेविंगही होते. तुम्ही तुमच्या क्रेविंगवर कंट्रोल करत नाही. अधिक खाल्ल्यामुळे तुमचे वजन वाढू लागते. 

झोपण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा

झोपण्याची योग्य पद्धत:

झोपताना पाठीवर झोपणे सर्वात चांगले आहे. त्यामुळे पाय मोडून किंवा पोटावर झोपणे बंद करा. तुम्ही पाय उघडून डाव्या किंवा उजव्या कुशीवर झोपू शकता.

कॅमोमाईल टीचे सेवन करा

झोपण्यापूर्वी एक कपभर गरम कॅमोमाईल टी प्या. त्यामुळे चांगली झोप लागते. कॅमोमाईल टीमुळे शरीरातील ग्लाइसिनचा स्तर वाढतो. त्यामुळे झोप येते. त्यामुळे ही टी प्याच. मग बघा झोपता झोपता तुमचे वजन कसे कमी होते.


मोबाईलला करा दूर 

झोपण्यापूर्वी मोबाईल किंवा अन्य गॅझेट्सचा वापर करणे हानिकारक असल्याचे अनेक शोधातून दिसून आले आहे. त्यातून निघणाऱ्या ब्लू लाईटमुळे तुमच्या स्लीप हार्मोन मेलाटोनिनचा स्तर कमी करतात. मेलाटोनिन कमी होताच तुमची भूक वाढते आणि एक्स्ट्रा कॅलरीजमुळे वजन वेगाने वाढते. त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करू नका.

अंधारात झोपा

स्लीप हार्मोन मेलाटोनिन शरीरात ब्राऊन फॅट उत्पन्न करते. त्यामुळे एक्स्ट्रा कॅलरी बर्न होतात. जर तुम्ही अंधारात झोपाल तर शरीर अधिक मेलाटोनिनचा संचार करेल. त्यामुळे वजन कमी होण्यास मदतच होईल. त्यामुळे नाईट बल्ब किंवा लॅम्प लावून झोपण्याऐवजी अंधार करून झोपा.

घरात मिन्टचा सुगंध दरवळू द्या

झोपण्यापूर्वी रुममध्ये मिंटचा सुगंध असलेला स्प्रे करा. उशीला मिंट ऑईल लावून झोपा. जर्नल ऑफ न्यूरॉलॉजी अँड ऑर्थोपेडिक मेडिसीनच्या अभ्यासानुसार मिंटच्या सुगंधामुळे वजन कमी होण्यास मदत होते. दिवसातून दोनदा त्याचा सुगंध घेतल्यास तुमचं वजन कमी होईल.

रुम थंड असावा

झोपता झोपता वजन कमी करायचे असेल तर रुम थंड ठेवा. डायबेटिक जर्नलनुसार, जर तुमची खोली थंड राहिली तर तुमचं शरीर स्वत:ला उष्ण ठेवण्यासाठी फॅटचा वापर करते. त्यामुळे झोपताना तुमचे एक्स्ट्रा फॅट बर्न होतं. त्यामुळे वेगाने वजन घटते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी