वजन कमी करायचं असेल तर घरगुती मसाल्यात वापरा 'हे' पाच घटक

लाइफफंडा
भरत जाधव
Updated Apr 18, 2021 | 16:41 IST

आपल्या आरोग्यावर आहाराचा परिमाण होत असतो. शरीर आकर्षक जरी करायचं असेल तरी आपल्या आहारात संतुलितपणा असणं आवश्यक असतं. वजन कमी करायचं असले किंवा वजन वाढवायचे असेल सर्वकाही आपल्या आहारावर अवलंबून असतं.

If you want to lose weight use these five ingredients in homemade spices
वजन कमी करायचं असेल तर घरगुती मसाल्यात वापरा 'हे' पाच घटक   |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • वचन कमी करण्यासाठी भारतीय मसाले आहेत फायदेशीर
  • अद्रकामुळे होतं वचन कमी होतं
  • मसाल्यातून चरबी होईल कमी

नवी दिल्ली : आपल्या आरोग्यावर आहाराचा परिमाण होत असतो. शरीर आकर्षक जरी करायचं असेल तरी आपल्या आहारात संतुलितपणा असणं आवश्यक असतं. वजन कमी करायचं असले किंवा वजन वाढवायचे असेल सर्वकाही आपल्या आहारावर अवलंबून असतं. पण तुम्हाला माहित आहे क? तुम्ही जी भाजी खाता ती तुमच्या आरोग्यासाठी तर महत्त्वाची असतेच पण त्यात वापरलेला मसालाच्याही तुमच्या आरोग्यावर परिणाम होत असतो. विविध संशोधनातही असे आढळून आले आहे की, मसाल्यातील विविध घटक हे वजन कमी करण्यासाठी आणि चरबी कमी करण्यासाठी फायद्याचे असतात. आम्ही तुम्हाला पाच अशा मसाल्यांविषयी सांगणार आहोत, जे तुम्हाला तुमचं वजन कमी करण्यास मदत करतील...

मेथी (Fenugreek)

 

घरी तयार करण्यात येणाऱ्या मसाल्यांमध्ये मेथी वापरली जाते. अनेक अभ्यासात सांगण्यात आले की, मेथी भूख नियंत्रित करते. खानदेशातील प्रत्येक घरात हिवाळ्याच्या दिवसात मेथी मिश्रित लाडू केले जातात. हिवाळ्याच्या दिवसात सकाळी खाल्ले जातात.  एका अभ्यासात असं स्पष्ट झालं की, मेथीच्या बियांचा अर्क किंवा पाणी पिल्याने प्लेसबोच्या तुलनेत वसाची मात्रा १७ टक्क्यांनी कमी होते. कॅलरीही कमी होण्यास फायदेशीर आहे. 

लाल मिर्ची (Cayenne pepper)

ही तिखट मिरची असते. याचा उपयोग हा अनेक पदार्थांमध्ये चव वाढविण्यासाठी केला जातो. यात कॅप्सेसिन यौगिक असतं. जे लाल मिर्चीला चव देत असते. काही शोधात असं सांगण्यात आले आहे की, कॅप्साइसिन पचन क्षमता वाढविण्यासही खूप फायदेशीर असते. जे तुमच्या दिवसभराच्या जळणाऱ्या कॅलरीज् वाढू शकते. यासह कॅप्सेसिन भूख कमी करण्यास फायदेकारक असते. एका अभ्यासात असं सांगण्यात आलं आहे की,  कॅप्सॅसिन कॅप्सूल घेतल्याने परिपूर्णतेची पातळी वाढते आणि एकूण कॅलरीचे प्रमाण कमी होते. 

अद्रक (Ginger)

भारताच्या आयुर्वेदिक ग्रंथामध्ये अद्रक सर्वात महत्त्वपुर्ण वनस्पती मानला जातो. अद्रकला औषधांचा खजिना असं देखील म्हटलं जातं. पचनशक्ती सुधारण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर अद्रकचं सेवन करण्यास सांगत असतात. कारण अद्रक पचन अग्निला उत्तेजित करत असतो आणि भूख वाढवत असतो. काही शोध सांगतात की, वचन कमी करण्यासाठी अद्रक खूप फायदेशीर असते. शरीराचे वजन आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी अद्रक खूप फायदेशीर असते.

 (Oregano)ओरिगॅनो  

 ही सदाहरित असणारी वनस्पती आहे, टकसाल, तुळशी, अजवायन, दौनी या वर्गात मोडणारी वनस्पती आहे. यात कारवाक्रोल असते. ते वजन वाढविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी मदत करत असते.

काळी मिरची (Black pepper) 

हा एक घरगुती मसाल्यांमध्ये वापरला जाणारा घटक आहे. भारतात याचं उत्पादन घेतलं जातं. याची चव तिखट असते. वजन वाढविण्यासाठी आणि कमी करण्यासाठी उपयोगी असते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी