Vastu Tips: जर तुमचेही घर पूर्व दिशेला असेल तर या वास्तु टिप्स देतील शुभ लाभ

लाइफफंडा
Updated May 05, 2022 | 09:24 IST | टाइम्स नाऊ मराठी

Vastu Tips In Marathi | संपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक ही खूप काळजीपूर्वक आणि विचार करून केली पाहिजे. कारण इथे तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा मोठा हिस्सा दावणीला लावत असता, त्यामुळे सतर्क राहून हे काम करणे गरजेचे आहे. दरम्यान आपल्या देशात वास्तुशास्त्रामधील माहिती सर्वत्र प्रचलित आहे.

If your house is facing east then these architectural tips will give you auspicious benefits
पूर्व दिशेला घर असल्यास या वास्तु टिप्स देतील शुभ लाभ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • वास्तुशास्त्रानुसार घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे.
  • घर बांधताना सर्वप्रथम स्वयंपाकगृहाचे नियोजन केले जाते.
  • पायऱ्यांना नेहमीच विकासाचा आधार मानले जाते.

Vastu Tips In Marathi | मुंबई : संपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक ही खूप काळजीपूर्वक आणि विचार करून केली पाहिजे. कारण इथे तुम्ही कमवलेल्या संपत्तीचा मोठा हिस्सा दावणीला लावत असता, त्यामुळे सतर्क राहून हे काम करणे गरजेचे आहे. दरम्यान आपल्या देशात वास्तुशास्त्रामधील माहिती सर्वत्र प्रचलित आहे. बहुतांश लोक वास्तुशास्त्राला मानतात तर काही लोक याकडे कानाडोळा करतात. वास्तुशास्त्राच्या बाबतीत मतभेद असणे आता सामान्य बाब झाली आहे, मात्र तुम्ही जर याला मानत असाल आणि पूर्व दिशेला असलेले घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला वास्तुशास्त्रातील काही उपायांबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. (If your house is facing east then these architectural tips will give you auspicious benefits). 

अधिक वाचा : RCB च्या विजयामुळे प्लेऑफची शर्यत रोमांचक

वास्तूंच्या तत्त्वांचा विचार करा

जर तुम्ही पूर्व दिशेला तोंड असलेले घर अथवा प्लॉट खरेदी केला आणि तुम्हाला वाटत असेल की यामुळे आपल्या घरात शुभ वातावरण नाही तर तुम्ही या वास्तु टिप्सचा अवलंब केला पाहिजे. लक्षणीय बाब म्हणजे आपण एक शांतीपूर्ण जीवन आणि चांगल्या आरोग्याचा लाभ मिळवण्यासाठी पूर्व दिशेला असलेल्या घरांच्या उपायाबाबत भाष्य करणार आहोत. जेव्हा आपण एखादी मालमत्ता खरेदी करतो तेव्हा आपण सर्वप्रथम स्थान आणि आजूबाजूच्या सुविधांचा विचार करतो. याशिवाय आपल्याला घराची योजना आखण्यासाठी वास्तूंच्या तत्त्वांचाही विचार करावा लागतो. 

या दिशेला प्रवेशद्वार असावे

वास्तुशास्त्रानुसार, घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी पूर्व दिशेला असले पाहिजे. बहुतांश लोक आणि तज्ञ मंडळी असा विचार करतात की, ज्या दिशेला भूखंडाचा सामना करावा लागला आहे ती दिशा शुभ घटक दर्शवते. लक्षणीय बाब म्हणजे प्रवेशद्वाराची मुख्य दिशा ही पूर्व दिशाच आहे. घराचे निश्चित शुभ म्हणजे घराचे मुख्य प्रवेशद्वार नेहमी पूर्वेकडे असावे. 

स्वयंपाकगृहाचा नेहमी विचार करा

घर बांधताना सर्वप्रथम स्वयंपाकगृहाचे नियोजन केले जाते कारण याबाबतीत गंभीरपणे विचार करण्याची आवश्यकता असते. कारण याला घरातील ऊर्जेचा प्रमुख स्त्रोत म्हटले जाते. स्वयंपाकगृहाची दिशा योग्य असेल तर घरातील सदस्यांचे आरोग्यही चांगले राहते आणि घरात सकारात्मकतेचे वातावरण राहते. त्यामुळे जर तुमचे घर पूर्व दिशेला असेल तर तुम्ही स्वयंपाकगृह उत्तर-पूर्व दिशेला बनवले नाही पाहिजे, कारण हे कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या आरोग्याला प्रभावित करू शकते. 

या दिशेला पायऱ्या असू नयेत 

पायऱ्यांना नेहमीच विकासाचा आधार मानले जाते. त्यामुळे घरातील पायऱ्या योग्य ठिकाणी असणे गरजेचे आहे. वास्तूनुसार, ज्यांचे घर पूर्व दिशेला आहे, त्यांच्या उत्तर-पूर्व दिशेला पायऱ्या असू नयेत. 

या दिशेला लावा तुळशीचे रोप

वास्तुशास्त्रानुसार, पूर्व दिशेला आपले घर असेल तर उत्तर-पूर्व दिशेला तुळशीचे रोप अवश्य लावावे. मात्र या दिशेला कोणतेही मोठे झाड लावू नये. असे केल्यास घरामध्ये नकारात्मक ऊर्जा शिरते. याशिवाय ईशान्य कोनात म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला शौचालय नसावे अन्यथा आर्थिक कष्टाचा सामना करावा लागू शकतो. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी